गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

1849. रुग्णालयात जाण्यापूर्वी

 सध्या पुण्याचे रुग्णालय गाजत आहे.  त्यावर अनुभवानुसार अनुसरायच्या बाबी खालील प्रमाणे.
1 आरोग्य विमा काढून ठेवा तो असायलाच पाहिजे.
2 तुमची पैशाची अडचण नसेल तर हॉस्पिटल मध्ये आरोग्य विमा आहे हे सांगू नका. डिस्चार्ज मिळाल्यानंतर विमा कंपनीकडे क्लेम करावा.
3 जीवनात एक आपल्याला नीट ओळखणारा नात्यातील किंवा सबंध प्रस्थापित केलेला एक तरी उच्च शिक्षित डॉक्टर असावा मग
 तो कोणत्याही शाखेचा असला तरी चालेल.
4 तब्येत नॉर्मल असेल तर शक्यतो आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी उपचार पसंत करावे. अगदी शेवटच्या क्षणी असे उपचार टाळावेत. कित्येक आयुर्वेद पारंगत डॉक्टर आलोपथी रुग्णालयात जीव सोडलेले मी अनुभवले आहेत.
5 फेस बुक व्हॉट्स अँप व येणाऱ्या औषधी उपाय योजना संपूर्ण सत्य नसतात व त्याची जबाबदारी कोणीही घेत नाही. त्या मुळे त्या उपाय योजना कडे दुर्लक्ष करावे.
6 रुग्णालयात होणाऱ्या रक्त व इतर महत्वाच्या चाचण्या शक्य असेल तर आपल्या चांगली ओळखीच्या लॅब मध्ये पुन्हा टेस्ट करणे.
7 डायरेक्ट सुपर स्पेशालिस्ट डॉ कडे जाणे 90 टक्के टाळावे.
8 आधी साधा फिजिशियन नंतर एक्सपर्ट व त्या नंतर सुपर स्पेशालिस्ट असा क्रम असावा.
9 हॉस्पिटल गाठायची वेळ आल्यानंतर आपली मेडिकल फाइल पूर्ण भरलेली न नेता त्यातील मागील दीड दोन वर्षांपूर्वीचे कागद घरी ठेऊन जावे.
10 MRI ची पाळी आल्यास MRI मशीन किती टेस्ला चे आहे ते पहावे. साधारण 1.5 टेस्ला प्लस या पुढील व्हर्जन चे मधून क्लॅरिटी बरोबर येते. माझ्या बाबतीत पुण्याच्या रुबी हॉल ने आपल्या अश्विनी चे CT व MRI फिल्म व रिपोर्ट फेकून देऊन नवीन काढून त्यातील फरक मला स्वतः ला दाखवला होता.
11 कोणत्याही स्थितीत दुसऱ्या गावच्या डॉ चे सेकंड ओपिनियन जरूर घ्यावे.
12 आरोग्य विमा घेताना डायरेक्ट कंपनी कडूनच घ्यावा एजंट मार्फत नको कारण यात कंपनीचे एजंट चे खूप मोठ कमिशन रक्कम आपण वाचवत असतो व ते कंपनी पसंत करत असते कारण एजंट कमिशन व जाहिराती यात कंपनी 40 ते 50 टक्के खर्च करत असते.
13 वेळोवेळी आपल्या शहरातील आपल्या आरोग्य विमा कंपनीचे टाय अप कोणत्या कोणत्या हॉस्पिटल बरोबर आहे हे गरज नसली तरी चेक करत राहावे.
14 वय वर्षे 60 नंतर शक्यतो विमा कंपनी पोर्ट करू नये त्रास होतो व घर का कुत्ता न घर का न घाट का अशी अवस्था होते.
15 सध्या केयर व टाटा ए आय जी ह्या विमा कंपन्या उत्तम आहेत.
16 फ्री हेल्थ चेक अप च्या भानगडीत पडू नये. नसलेले आजार मागे लागतात.
17 सुपर स्पेशालिस्ट त्याच्या क्षेत्राचे खडा न खडा द्न्यान ठेवतो पण त्याला शरीराच्या इतर भागाची काळजी नसते.
तर स्पेशालिस्ट सुद्धा त्याचाच भागाची काळजी घेतो इतर माहीत असूनही सांगत नसतात.
फिजिशियन ला शरीराच्या सर्व भागाचे उत्तम जाण असते व रोगाची शक्यता आणि पुढील उपचार कोणत्या फील्ड च्या डॉ कडे घ्यायचे याचे मार्गदर्शन मिळत असते.
18 एका साध्या MBBS डॉ चे हात गुण हे सुप्रर स्पेशालिस्ट च्या भारी औषध पेक्षा जास्त परिणामकारक असतात.
19 औषधे नेहमी एकाच केमिस्ट कडून घेऊन ओळख वाढवून ठेवावी कारण आणिबाणीत खूप उपयोग होतो.
20 शहरातील एक दोन रक्त पेढी संचालक किंवा मंडळ यांची ओळख जरूर असावी ती ही आणीबाणी मध्ये फार उपयोगी ठरते.
21 मधुमेह असलेल्या नी वर्षातून एकदा इ सी जी टू डी इको व TMT टेस्ट, तीन महिन्यातून शुगर चेक ( लॅब मध्ये ) व वर्षातून दोनवेळा HbA 1c टेस्ट करून घ्यावीच.
22 शेवटी काहीही त्रास असेल तर तो घरच्या व्यक्ती , मित्र यांना जरूर शेअर करावा अंगावर काढू नये.
23 या उन्हाळ्यात भरपूर व गरज नसताना पाणी प्या आणि प्रवास शक्यतो टाळा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...