गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

1846. इतना तो करना स्वामी

 🚩 पृथ्वीवरील सर्व जीवांचा कधी ना कधी अंत हा होणारच. ईश्वरी अवतारांनाही मरण टळलेलं नाही. श्रीराम-श्रीकृष्ण या अवतारांच्या चरित्राचा वेध घेतला असता लक्षात येईल की, जीवनातल्या सर्व प्रकारच्या सुख-दुःखांना सामोरं जात त्यांनी मृत्यूचा स्वीकार केला. 
🚩 ते ईश्वर असल्यामुळे मरण टाळू शकले असते; पण मरण अटळ असते हे जीवांना सांगण्यासाठी सर्वसामान्यांसारखं मरण त्यांनी स्वीकारलं.
🚩 आज-काल मरणाला कोणी घाबरत नाही असे जरी मनात असले तरी प्रत्यक्षात मात्र सगळ्यांनाच जगावेसे वाटते.
🚩 पण या जन्म-मृत्यूच्या चक्रव्यूहातून आपली सुटका फक्त आणि फक्त भगवंतच करू शकतो आणि त्यासाठी आपण नाही त्याची आराधना करायला हवी, नाही का ?
🚩 खरंतर देवाकडे सगळेच जण जगण्यासाठी काही ना काही मागतच असतात, पण आपले मरण हे कसेे असावे, हे आपले आपण ठरवू शकत नाही. पण मरण येताना जर ईश्वरच आपल्या सोबत असेल तर, मुक्ती ही मिळेलच ना?
🚩 परंतु, त्यासाठी आपण ईश्वराच्या अनुसंधानात साधायला हवे ना?
🚩 त्यासाठी आपण आपलीपण पूर्वतयारी नक्कीच करू शकतो नाही का ?
🚩 आपली पूर्वतयारी म्हणजे त्या अंतिम समयी, ईश्वराचे सतत स्मरण असावं, त्याचे अखंड नामस्मरण घडावं, त्याचीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर तरळायला हवी, म्हणजे त्याच्या शिवाय दुसरे काहीच, असायला, दिसायला, ऐकायला, जाणवायला नसावे. असे जर आपल्या अंतिम क्षणी झाले की माणूस आपसुखच गुणगुणायला लागेल.....
              इतना तो करना स्वामी... 
              जब प्राण तन से निकले...
              जब प्रान तन से निकले ... 
              गोविंद नाम लेकर ...
              तब प्राण तन से निकले...
🚩 किती सुंदर आहे या काव्य रचना अगदी आपल्या मनातलं सांगून जातात नाही का ?
🚩 भक्त आपल्या भगवंताकडे आपल्या मोक्षाची प्रार्थना करत असताना, त्यांची  कोणती इच्छा असते ते काही शब्दात वर्णन करून सांगतात की...
              इतना तो करना स्वामी ..
              जब प्रान तन से निकले ..
              गोविंद नाम लेकर ..
              तब प्राण तन से निकले..1..!!
🚩 हे भगवंता माझ्यासाठी फक्त एवढेच करा की, ज्यावेळेस माझा आत्मा या शरिरातून जाईल, त्यावेळेस मी तुझे नाव घेऊन मगच माझा देहत्याग करू इच्छितो, तुझ्या एका नामाशिवाय, माझ्या मुखातून कुठलाही शब्द निघू नये, आणि तेव्हाच माझा देहत्याग होवो.....
              श्री गंगा जी का तट हो..
              या यमुना बन्सी वट हो..
              मेरा सावरा निकट हो..
              तब प्राण तन से निकले..2..!!
🚩त्या वेळी तु पवित्र गंगेच्याकाठावर असावे किंवा यमुना नदीच्या वाटेवर असावे, पण फक्त तुच माझ्या जवळ असावे, फक्त तुच माझ्या निकट असावे, तेव्हाच माझे प्राणमोक्त व्हावे.....
              श्री वृंदावन का स्थल हो..
              मेरी मुखमे तुलसी दल हो..
              श्री कृष्ण चरण का जल हो..
              तब प्राण तन से निकले ..3..!!
🚩त्यावेळी तुझे वास्तव्य, पवित्र असे वृन्दावन स्थळ असावे आणि माझ्या तोंडात तुळशीपत्र असाव आणि तुमच् चरणोदक माझ्या मुखात असाव, तेव्हाच माझ्या प्राणाने हे शरीर सोडावे......
               सिर सोहना मुकुट हो..
               मुखडेपे काली लट हो..
               यह ध्यान मेरे घट हो..
               तब प्राण तन से निकले..4..!!
🚩मला मरण येतांना, तुझ्या डोक्यावर मुकुट असावा आणि चेहऱ्यावर कुरळ्या केसांची काली बट असावी, आणि असंच मला तुझ्या मुखाकडे पाहता पाहता मला मरण यावे.....
                मेरा सावरा खडा हो..
                मुरली मे स्वर जडा हो..
                तिरछा चरण धरा हो..
                बंसी की मधुर धुन हो..
                तब प्राण तन से निकले..5..!!
🚩 मी मरतांना तु माझ्या समोर उभे असाव,  तुमच्या हातात मुरली असावी. पाय तुमचा वाकडा असावा आणि तुमच्या मुरली तून मधुर स्वर निघावा, असे सुंदर दृश्य डोळ्यासमोर असतांना मला मृत्यू यावा. याशिवाय मरताना मला आणखी काय हवे.....
                तन छोड जाऊ सुख से ..
                तेरा नाम निकले मुखसे..
                बच् जाऊ घोर दुःख से..
                तब प्राण तन से निकले..6..!!
🚩 त्या अंतकाळी तुझेच नाव घेत असतांना, मी माझा आनंदाने देहत्याग होवो, तेव्हाच अति घोर अश्या या दुःखा पासून दूर होत जाईल, असे घडत असतांना हा देहत्याग घडावा.....
                उस वक्त जल्दी आना..
                कही श्याम मुझे भूल न जाना..
                हमें भवपार लगा देना..
                तब प्राण तन से निकले..7..!!
🚩 पण त्यावेळेस तु नक्की यावे,  की मला विसरून जाशील? मला त्या वेळी विसरू नकोस. तु आलास तरच माझा भवपार होईल आणि या संसारातून माझी मुक्तता होईल, आणि अश्याच वेळी तुझ्या संगतीत असतांना माझा प्राणत्याग व्हावा.....
                 रहे वासना न मनमे..
                 मंमता रहे ना जीवन में..
                 रहू मस्त कृष्ण नाम धूनमे..
                 तब प्राण तन से नीकले..8..!!
🚩 हे माझ्या प्राणसख्या, माझी प्राणज्योत मावळत असतांना, माझ्या मनात कुठलीही वासना राहू नये, कुठलीही माया, प्रेम, ममत्व जागे होऊ देऊ नकोस, त्या वेळी फक्त आणि फक्त तुझ्याच नामाची धुंदी राहो आणि अश्याच वेळी मला मरण येऊ दे.
🚩 म्हणूनच हे देवा मी तुझ्या चरणाशी मागतो की, तुझेच नाव घेता घेता, तुझ्या नामामध्ये रममाण असताना मला मरण यावे, आणि तेव्हाच माझा प्राण निघून जावा.
🚩 याशिवाय मला आणखी काहीच नको..!!!
🚩 याकरिता आपण वेळात वेळ काढून देवाच्या ध्यानात मग्न असायला हवं.
🚩 म्हणूनच आपण वेळात वेळ काढून देवाच्या ध्यानात मग्न असायला हवं, दिवसरात्र देवाचे नामस्मरण करायला हवं.
🚩 चालता बोलता आणि अगदी वेळ मिळेल तेव्हा देवाचे नाव घेत जावे आणि असेच देवाचे नाव घेता घेता आपल्याला मरण यावे.
     🙏🙏🙏🌹😊❤️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...