गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

1834. याला जीवन ऐसे नाव

 राधिकाबाई हल्ली खूप चिडचिड करायच्या. अगदी लहानसहान गोष्टींवरून वाद घालत असत. त्याला कारण म्हणजे त्यांच्या पतीचं एकाएकी हार्ट अटॅकने निधन होणं हे होतं. खरंतर राधिकाबाई खूप शांत स्वभावाच्या होत्या. कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्या कधीही जीवनात डगमगल्या नाही. पण आता त्यांच्या नव-याच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या वागण्यात, बोलण्यात थोडा फरक पडला होता. त्यांच्या मुलाला जो विवाहित होता, त्याला तर कळतच नव्हते की आपल्या आईला अचानक झालं तरी काय. राधिकाबाई कधीकधी रात्री अचानक उठून एकट्याच बडबड करत बसायच्या. कधी रडायच्या. प्रकाश आणि त्याच्या बायकोने आजपर्यंत अनेकदा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. नव-याच्या विरहाने त्यांचा मानसिक तोल ढासळला होता. त्या स्वतःला एकट्या समजू लागल्या होत्या. त्यामुळेच त्यांची खूप चिडचिड व्हायची.
         एक दिवस प्रकाशची बायको त्याला म्हणाली, "मला आईंची चिडचिड होण्याचं कारण सापडलं आहे. बाबा गेल्यानंतर त्या अशा वागतात आहे. मला माहित आहे त्यांना बाबांची खूप आठवण येते. त्यांची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे. आपण त्यांना कुठेतरी व्यस्त ठेवायला पाहिजे. मी उद्या त्यांना काही पुस्तके वाचायला आणून देते. सोबतच त्यांना अधेमधे देवळात पाठवत जाईल. त्यांना बागकामाची आवड आहे. त्यामुळे त्यांना आपल्या बागेतील झाडाझुडुपांना पाणी टाकणे, त्यांची काळजी घेणे, त्यांना खत घालणे अशी कामेही करता येतील. त्या जेव्हढं स्वतःला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतील तेवढ्याच त्या आनंदात राहतील." प्रकाशला त्याच्या बायकोचे म्हणणे पटले. दुस-या दिवशी प्रकाशाच्या बायकोने तिच्या सासूबाईंसाठी काही पुस्तके वाचायला घेऊन आली. राधिकाबाई आता रोज घराजवळच्या मंदिरात जाऊ लागल्या. घरातून बाहेर पडल्यामुळे त्यांची देवळात येणा-या काही लोकांशी ओळख झाली.त्यांच्याशी बोलून राधिकाबाईंना खूप छान वाटत असे. पतिवियोगाचे दु:ख त्या आता विसरल्या होत्या.त्या आता पूर्वीसारख्याच आनंदी आणि हसतमुख राहू लागल्या. त्यांना आनंदी बघून प्रकाश आणि त्याची बायको खूप आनंदात होते. प्रकाश त्याच्या बायकोला म्हणाला, आई आता पूर्वीसारखी झाली आहे. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. थॅंक्स." यावर प्रकशची बायको त्याला म्हणाली, "आई होत्या तशाच आहेत. पण कधीकधी काही परिस्थितीमुळे माणूस चिडचिड करतो. बाबांच्या अचानक जाण्याने आई थोड्या चिडचिड करत होत्या. पण आता त्या अगदी पूर्वीसारख्या हसतमुख राहतात आणि मला याचा खूप आनंद आहे. चला, स्वयंपाक तयार आहे. आपण तिघे मिळून आता जेवण करू."
                
लैलेशा भुरे 
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...