रविवार, ९ जून, २०२४

1206. " ब्रह्मानंद " म्हणजे शेवटी काय ? (12 आनंदांची गोळाबेरीज.)

 " ब्रह्मानंद " म्हणजे शेवटी काय ?  (12आनंदांची गोळाबेरीज.)
01▪ आई  होण्यापेक्षाही...आजी  होण्याचा आनंद !
02▪ नातवंडाच्या  कृपेने  अंगावरील  कपडे  ओले  झाल्याचा  वत्सल  आनंद ! आणि
03▪ त्यांनी  केलेले  हट्ट  पुरविण्याचा  गोड  आनंद !
04▪ सूनेने न  मागता  आणून  दिलेल्या  चहाचा व  औषध  घेतले  का? या  प्रेमळ  चौकशीचा  सात्त्विक आनंद !
05▪ वाढदिवसाला,  मुलाने  दिलेल्या  शालीचा  ऊबदार  आनंद !
06▪ आपण  कुटुंबाला  हवे  आहोत या  भावनेचा  सुप्त  आनंद  !
07▪ दुपारी  जेवणानंतर  पेपर  वाचता वाचता  लागलेली  डुलकी  परमानंद. !
08▪ रात्रीची निरव शांतता आराम खुर्चीवर डोळे मिटून पहुडलेल्या क्षणी आपली आवडती गझल रेडिओने गुणगुणावी स्वर्गीय आनंद !
09▪ एखादा लेख किंवा कविता आपण पोस्ट करावी मित्रांनी त्याला भरभरुन दाद द्यावी साहित्यानंद !
10▪ मन अशांत असतांना देवघरातल्या भजनामुळे निर्माण होणारा कैवल्यानंद !
 11▪ भेटलेल्या  जुन्या  सवंगड्यांच्या भेटीमुळे होणारा  अपार  आनंद !
12▪ नकारात्मक  विचार  सोडून  दिले  की  मिळणारा निर्भेळ  "आनंद"!
आणि  या  सर्व  आनंदाची  बेरीज  करुन ती  मनाच्या  कप्प्यात  साठविली  की पडल्यापडल्या  लागलेली  शांत  झोप  म्हणजेच.
"ब्रह्मानंद" !!!
    
🌺🌸🌺   या पोस्टला मित्रांकडून मिळालेली दाद :  आनंदीआनंद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...