गुरुवार, ६ जून, २०२४

1199. कोल्हाटी

       जगन्नाथ पुरी इथल्या कोल्हाट्याची गोष्ट अतिशय सुंदर अशी आहे. ऐकणाऱ्याला आपल्या डोळ्यासमोर  उभे राहते चित्र हृदयस्पर्शी आहे की परमेश्वर हा भक्तासाठी किती काम करतो कोणत्या कोणत्या रूपाने तो उभा राहतो. फक्त तुमची निस्सीम श्रद्धा भक्ती मात्र तो पाहतो तुमचाभाव आधी परीक्षा पाहतो. तुमची भक्ती कशी आहे ते पाहतो. ज्या वेळेला असं वाटतं की भक्त संकटात सापडला आता याला आपण मदत करायला हवी आहे आता याला कोणी मदत करत नाहीये त्या वेळेला तो तिथे त्याच्याही नकळत मदतीसाठी उभा राहतो त्याची ही गोष्ट आहे हा खरंतर डोंबारी. त्याची अशी इच्छा होती की मी ह्या देवळाच्या समोर माझा जो खेळ करतो ती देवाच्या दारी सेवा म्हणून डोंबाऱ्याचा खेळ ही परमेश्वराची एक सेवाच करतोय मी या भावनेने तो करत होतो. मला काही त्यातनं जास्त मिळावं किंवा मला काही खूप मिळावं यासाठी मी करत नाही. माझ्या समाजासाठी परमेश्वरांची सेवा म्हणून मी हे काम करतोय अशा भावाने हा लाखा कोल्हाटी तिथे डोंबा-याराचा खेळ करत असे. छान ढोलकी वाजवायचा  त्याची जी पत्नी होती ती त्या दोरी वरती उभे राहून त्या थाळ्यामध्ये पाय ठेवून सुंदर असा खेळ करत असे. अतिशय देखणी होती. सगळे लोक छान मंत्रमुग्ध होऊन तो खेळ बघत असे. गर्दी होत असे, त्यानंतर जे काय मिळेल त्याला त्याच्यामध्ये तो लाखा त्याची पत्नी समाधानी होते .जी का मीठ भाकरी मिळेल जे काही तांदूळ मिळतील जे काय पैसे मिळतील त्याच्यामध्ये त्याला काही खूप मिळावं अशी अपेक्षाही नव्हती. समाधान जास्त होते. तिथे जवळ बाजूला एक झोपडी बांधून राहत होते. असेच काही दिवस गेले. त्यांच्या पत्नीने गोड मुलीला जन्म दिला. ती मुलगी पण तितकी सुंदर होती जशी तिची आई होती. त्याही पेक्षा सुंदर गोड अशी मुलगी ती. लावण्य रतीशी दूर  लोटी ! त्याच्या घरामध्ये हळूहळू मोठी होत होती. थोडीशी ती मोठी झाली. तिची आई मात्र देवा घरी गेलो. लाखाच्या घरात  काहीच नाही. आता कोण करणार खेळ? मुलगी तर लहान आहे. परंतु ती मुलगी इतकी चपळ होती सुंदर होती दिसायला  ती. तिला जसं समजेल तसं ती आपली उड्या मारायची. खेळ करायची. हळूहळू ती मोठी होत गेली. तशी तशी तिचं लावण्य अधिकच खुलत गेलं. चंद्राची चपळता तिचं लावण्या तिच्या हालचाली अतिशय मोहक नेत्रदीपक असल्यामुळे त्यांच्या खेळासाठी गर्दी वाढू लागली. गर्दी इतकी वाढली की जगन्नाथाच्या दर्शनाला जाण्यासाठी रस्ताच मिळेनासा झाला. तशा गर्दीमध्ये एक दिवस तिथला राजकुमार आपल्या रथातून जगन्नाथाच्या दर्शनासाठी आला. ती गर्दी बघून त्याने विचारले  की एवढी गर्दी का आहे? त्यांनी विचारलं का गर्दी एवढी तर लोकांनी सांगितलं कोल्हयाटाचा खेळ चालू आहे. रस्ता नसल्यामुळे तो रथातून खाली उतरला.  रस्त्या काढत काढत मार्ग काढत काढत त्या खेळापर्यंत त्या  तिथे त्या खेळापर्यंत पोहोचला. पोहोचल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या चंद्राकडे पाहिलं तेव्हा तो एकदम तिच्यावरती मोहित झाला. त्यांनी मनाशी पक्के ठरवलं "लग्न करीन तर हिच्याशीच ! चंद्राच लक्षात नव्हतं, तिचं लक्ष खेळात होत. तिचा खेळ झाल्यावर ती खाली उतरते. जे काय मिळाले पैसे ते घेतले. शांतपणे अशी समुद्राच्या काठावरती एका खडकावर जाऊन बसली. छान गोड आवाजामध्ये  गाणं म्हणत बसली. समुद्राच्या लाटा सौंदर्य न्याहाळत होती.
     ती पाठमोरी बसलेली असताना समुद्राकडे बघत होती. सुरेल गात होती. त्याच वेळेला तिथे तो राजकुमार होता. तो उभा राहिला.  तिचं गाणं संपल्यानंतर तो तिच्याशी बोलायला संवाद साधू लागला की किती छान गाते. सुंदर. कानतृप्त झाले नाही. खूप छान ! तुम्ही कोण ? तिने  विचारलं की तुम्ही कोण आहात तर त्यांनी सांगितलं की मी एक राजकुमार आहे इथला. तेव्हा ती म्हणली मी तुम्हाला ओळखत नाही  !परंतु तरी त्या राजपुत्राने सांगितलं की मी तुझ्याशीच लग्न करणार असं मी ठरवलं. तुला पाहिल्यानंतर मला तू खूप आवडलीस. करशील ना  माझ्याशी लग्न? तुला खूप सुखात ठेवीन ! काही कमी पडू देणार नाही ! ती म्हणते मी असं कसं  हो म्हणणार? पितळ्याच्या स्वाधीन मी नाही. स्वातंत्र्य जावया कोठे !  तू एक राजकुमार आहेस आणि मी एक साधी कोल्हाटी. नाही... कसं शक्य आहे?  राजकुमार तिला पुन्हा पुन्हा सांगायला लागला की मी तुला खूप सुखात ठेवीन तुला कशाचीच गरज नाही ! कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तू माझ्याशी लग्न कर. तेव्हा ती चंद्रा सांगते की पित्याच्या स्वाधीन मी नाही. स्वातंत्र्य जावया कुठे. मला कुठे जायला स्वातंत्र्य नाही. माझ्या वडिलांनी सांगितले तर मी  येऊ शकते परंतु राजकुमार तिला तरी वारंवार भेटत राहिला. तिला सांगत राहिला की तू माझ्याशी लग्न कर. तेव्हा तिने सांगितलं की उद्या तू एखादी चांगली राजकुमारी घेऊन आला. तिच्याशी लग्न केले तर मी काय करू? तर तो म्हणला असं नाही होणार. मला तू खूप आवडलीस ! मला तुझ्याशीच लग्न करायचे. अशा त्यांच्या वारंवार भेटी होत असतानाच त्यांने एक दिवस तिला सांगितलं की मी तुला रथातून घेऊन जाईन. तू माझ्याशी लग्न कर मी तुला घ्यायला येतो. एक दिवस रात्री आपल्या वडिलांना न सांगता रथामध्ये बसून त्या राजकुमार बरोबर चंद्रा निघून जाते.
       लाखाच्या हळूहळू लक्षात येते असतं. लाखा दाखवत नाही. चंद्राची वाट बघत बसून राहतो. बराच वेळ गेल्यानंतर मात्र त्याचा धीर सुटतो. खूपच अस्वस्थ होतो रडू लागतो. काही करू शकत नाही. असेच आठदहा दिवस जातात. लाखाला कळत नाही. खूपच बेचैन होतो. अस्वस्थ होतो  त्याला काही समजत नाही की आता काय करावं? त्याच्या लक्षात आलेलं असतं की, काहीतरी गडबड आहे म्हणून त्याला याची कुणकुण लागलेली असते परंतु त्याला असं वाटत नाही की असं घडेल म्हणून  खेळ बंद होतो. त्यामुळे कोणीही तिथे येत नाही. हा काही खेळच करू शकत नाही. कारण मुलगी नाहीये तर  कोण खेळ करणार? याची उपासमार व्हायला लागते.  त्याचं मन अस्वस्थ असतं. खूप तो देवाला सांगतो की देवा तुझी मी सेवा करत होतो. तुझ्या पुढे मी माझा खेळ करून माझ्या मनाचा समाधान करत होतो. ती तुझीच सेवा होते पण आता काहीच करू शकत नाही. अशा प्रकारे त्याचे आठ आठ दिवस जातात. उपासमार व्हायला लागते.
      मग देव विचार करतो. त्यावेळेला रुक्मिणी भगवंताच्या डोळ्यात पाणी पाहून विचारते की काय झालं ? तू काही करू शकत नाहीस. नेहमी करू शकते. तुम्ही मला सांगा ज्या वेळेला देव तिला सांगतात की असं कोल्हाट्याचं झालेलं आहे म्हणून. तो बिचारा उपाशी आहे. काय करायचं आता? मी करते काहीतरी. कोल्हाट्याच्या बहिणीच्या रूपाने त्या चंद्राच्या राजवाड्यामध्ये तिच्या महालामध्ये जाते. तिच्यासमोर उभी राहते. तिला खूप बोलते. तुला काही वाटत नाही, तुझा बाबा आज उपाशी आहे. तो रडतोय तुझ्यासाठी. त्याचा खेळ बंद पडला आहे. तू आरामात पडलीस तेव्हा ती सांगते की नाही मी माझ्या बाबाला डबा पाठवला होता. परंतु बाबांनी तो स्वीकारला नाही. परत पाठवला. त्यामुळे मी काहीच करू शकले नाही. रुक्मिणी देवी परत भगवंताकडे येतात त्याला भगवंताला  सांगतात की मी नाही करू शकले. मला नाही जमलं !  
      तू चंद्राच्या रूपाने लाखाच्या घरी जा. असे भगवंत रुक्मिणी देवीने सांगतात रुक्मिणी देवी चंद्राच्या रूपाने लाखाच्या घरी जातात. मग शेवटी दारावरती चंद्राच्या रूपामध्ये रुक्मिणी देवीं जातात. अतिशय सुंदर अशी लावण्यवती प्रत्यक्षदेवीहोती ती ! काय विचारायचं ! चंद्राच्या रूपामध्ये लाखाच्या घराशी उभी राहिली. देवीने दारावरती टकटक केलं. चंद्राला पाहून लाखा चकित होतो. ही पटकन त्याच्याजवळ जाऊन बसते. त्याला समजावते. सांगते, खूप रडते. तेवढ्यात पुन्हा दारावरती टकटक असा आवाज येतो कोण आहे म्हणून विचारल्यावर एक तरणाबांड अतिशय देखणा असा तरुण उभा असतो लाखा विचारतो तू कोण आहे ? 
"सावळ्या "आहे. कोल्हाट्याचा रूप घेतलेला अतिशय सुंदर असा हा भगवंत सावळ्याच्या रूपाने दारात उभा होता. मी तुला मदतीला आलोय असं सांगतो. तुझा खेळ बंद पडलाय ना?  तुला मदत करायला आलोय. तू आठदहा दिवस झाले खेळ करू शकला नाहीस. उपाशी आहेस, थकला आहेस. खूप म्हणून तुला मदत करायला आलो. डोक्याला मुंडासे अर्धा पंचां नेसलेला अत्यंत उत्साही अंगाला काव लावलेला अशा सुंदर सावळ्याला पाहून लाखाला खूप नवल वाटत. त्याच्या डोळ्यात चमक येते तुला काय वाजवता येणारं रे ! ठीक आहे तर. सावळ्या आपल्या गळ्यामध्ये असलेली ढोलकी वाजवून दाखवतो. लाखाची खात्री पटली ढोलकीच्या आवाजाने की हा नक्की छान पैकी खेळ करू शकतो. लाखाच्या दारासमोर पूर्वीसारखाच बांबू रोवून तो त्याच्यावरती दोरी छान पक्की बांधतो. थाळी छान घासून तयार ठेवतो. चंद्रा त्याच्यावरती  खेळ मांडते. तयार होऊन बाहेर येते. लाखा बाजूला बसून बघत असतो सावळ्याने ढोलकी वाजवून त्याच्यावर चंद्रा चढून आपल्या पतीच्या भक्ता करतात खेळ सुरू करते. आता हा खेळ चालू असताना हळूहळू खूप गर्दी वाढत जाते. तिचं रूप लावण्या तिची चपळता असते. ती बघून सगळेजण अचंबित होतात. गर्दी वाढायला लागते एक दिवस पुन्हा राजकुमार तिथे जगन्नाथाच्या दर्शनासाठी येतो. एवढी गर्दी पाहून चकित होतो. तो विचारतो काय चाललंय ? एकजण सांगतो कोल्हाट्याचा खेळ चाललाय. गर्दीत ना वाट कडून तो राजपुत्र त्या खेळापर्यंत कसाबसा पोहोचतो चंद्राला पाहून संतापतो, चंद्र इथे कशी?
     तिथे चंद्राला पाहिल्यावर त्याला अतिशय राग येतो. खूप चिडतो. तो त्याच पावली तडक राजवाड्यात जातो महालात जातो. चंद्रा राजवाड्यात आपल्या महालामध्ये असते. याचा अवतार पाहून तिला काही कळतच नाही. ती विचारते काय झालं तर तिच्याशी एकही शब्द न बोलता  तिचा हात धरून चालू लागतो. चंद्राला काहीच कळत नाही काय झाले. तिला काहीच माहिती नसतं असं आपलं रुप घेऊन तिथे कोणीतरी काम करत आहे.  तो चंद्राला तिला तसाच तरातरां रथामध्ये घालून त्या जगन्नाथाच्या देवाजवळ त्या खेळाच्या ठिकाणी घेऊन येतो. जेव्हा तो ती दोघेजण त्या चंद्राला पाहतात हे वेगळे काहीतरी आहे.  ती चंद्रारुपी रुक्मिणी देवी तिथून नाहीशी होते. तेव्हा तिला समजतं की परमेश्वरानेच हा आपला अवतार घेऊन इथे खेळ केलेला आहे. लक्षात येते की हा परमेश्वर आहे. लाखा त्याला सावळ्याच्या पायाला धरुन घट्ट मिठी मारतो. साष्टांग नमस्कार करतो. त्याच्या पायावर डोकं ठेवून आपलं जीवन संपवतो. 
    अशी कहाणी आहे ही त्या जगन्नाथाच्या देवळासमोर घडलेली.  लाखा फक्त परमेश्वरासाठी म्हणून तिथे खेळ करत असतो तेव्हा त्याच्यासाठी देवाचा धावत येतो आणि त्याचा रक्षण करतो. जगन्नाथपुरी मध्ये भक्तासाठी डोंबारी तो झाला.  यादव राणा अशी कथा. अतिशय सुंदर असं भक्तांसाठी प्रत्येक वेळेला परमेश्वराने आपलं रूप दाखवलं दामाजीसाठी तो महार झाला. भक्तांच्या रक्षणासाठी त्यांची निस्सीम भक्ती पाहून तो त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...