सोमवार, ३ जून, २०२४

1195. एका महिलेचा तरुण मुलींना सल्ला

    22 व्या वर्षी जेंव्हा मुलीचं लग्नाच वय होतं. मलाही वाटलं होतं लग्न करावं. पण तेंव्हा खरं तर मला स्वतः चे करिअर आधी नीट सेट करायचं होतं. त्यानंतर 23 व्या वर्षी आजी मागे लागली. आता हिचं लवकर लग्न करा. मला देवाघरी जायच्या आधी जावयाचं तोंड बघायचं आहे. पण मी माझ्या करिअर बद्दल जास्त सिरीयस होते. नाही नाही म्हणता माझं वय 28 वर्षे झालं. आता माझी आई, माझ्या लग्नासाठी मागे लागली, ती म्हणायला लागली,  आता काय म्हातारी झाल्यावर लग्न करणारेस का? मी तिच्याशी वाद घातला. माझं वय फक्त 28 आहे. इतक्या लवकर कोणी लग्न करतं का? 
     Actually, याचं कारण असं होतं, की मी रोज social media वर मोठ-मोठ्या हिरोईन चे रील्स बघायचे. ज्यात त्या सांगायच्या, तुमची शारीरिक आणि मानसिक तयारी व्यवस्थित असेल तेंव्हाच लग्न करा आणि या गोष्टी डोक्यात इतक्या पक्क्या घुसल्या की मी ठरवलं. आधी करियर मगच बाकीच्या गोष्टी. आता माझं वय 31 झालं. आता मला मासिक पाळीचे प्रॉब्लेम चालू झाले. जेंव्हा डॉक्टर कडे गेले तेंव्हा त्यांनी औषधे दिली आणि सांगितलं. लग्न योग्य वयातच करावं नाहीतर पुढे मुले होण्यासाठी प्रॉब्लेम येतात. मी घरी येऊन याबद्दल internet वर search केलं, तेंव्हा मला कळालं की मोठ्या मोठ्या actresses, egg freeze करतात. ज्यामध्ये गर्भयाशात तयार होणारे eggs काढून त्याला बरीच वर्ष freeze करता येते. त्यामुळे मला जेंव्हा आई बनायचं आहे. तेंव्हा मला ही पद्धत वापरता येईल. अजून एकदा फिल्मी आणि internet च अर्धवट ज्ञान मिळाल्याने मी खूश झाले. आता मला वाटायला लागलं की मी आधी egg freeze करेन आणि मग लग्न करेन. म्हणून मी मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि डॉक्टरांशी बोलले तेंव्हा मला समजले की eggs चा दर्जा 25 ते 27 च्या दरम्यान सर्वोत्तम असतो. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे मी आता 31 वर्षांचे झाल्यामुळे माझ्या eggs चा दर्जा घसरला आहे. मला eggs फ्रीज करण्यासाठी दरमहा ३०,००० रुपये द्यावे लागतील हे ऐकून माझी अवस्था अजूनच वाईट झाली. माझ्या लक्षात आले की लग्नाचे आणि कुटुंब सुरू करण्याचे वय निघून गेले आहे. मी लग्नासाठी स्थळे बघायला सुरुवात केली आणि वयाच्या 33 व्या वर्षी मी 36 वर्षाच्या माणसाशी लग्न केले. आज आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली पण आम्हाला  आई-वडील होण्याचा आनंद अजून मिळाला नाहिये. आज मला माझ्या आजीने सांगितलेले आठवतेय की लग्न लवकर कर नाहीतर लग्नाला फार उशीर होईल. जे करियर सेट करण्यासाठी मी इतकी वर्ष वाट पाहिली, जे पैसे कमावले ते आता उपचार आणि हजारो चाचण्यांना खर्च होत आहेत. 
     मला सर्व मुला-मुलींना हे सांगायचे आहे की करीअर नंतरही करता येते. आपल्या शरीरासाठी प्रत्येक गोष्टीची वेळ निसर्गाने ठरवलेली असते जसे की पहिली मासिक पाळी साधारण 12 वर्षांपासून येते आणि 50 व्या वर्षी संपते. त्याचप्रमाणे मुलं होण्याची एक वेळ असते. ही वेळ चुकली की परत मिळवता येत नाही आणि आपले वयही पुन्हा कमी करता येत नाही. टीव्हीवरील नायिका आणि 55 वर्षांच्या अभिनेत्रींना पाहून कधीही तुमच्या आयुष्याबाबत निर्णय घेऊ नका कारण त्या पैशाच्या जोरावर तरुण दिसतात. पैशाच्या बळावर ते दुसऱ्याचा गर्भ भाड्याने घेतात आणि स्वतः ची मुले जन्माला घालतात. त्या सामान्य लोकांसाठी ब्रेनवॉशचे काम करतात आणि आमच्यासारख्या मुली त्यांना पाहून शरीर आणि वेळ दोन्ही वाया घालवतात. वेळेवर लग्न करा आणि मूल जन्माला घाला. कारण जर तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत तर तुमचे संपूर्ण आयुष्य फक्त पश्चातापाने भरून जाईल बाकी काही नाही.

साभार: स्वर्णा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...