तसा मी माझ्या वकिली व्यवसायाच्या निगडीत काहीही लिहित नाही.पण एक अनुभव तुमच्या बरोबर वाटुन घ्यायला मला आवडेल. काही दिवसांपूर्वी मला एक फोन आला. एक महिला होती. ती म्हणाली "सर मला तुम्हाला भेटायचं आहे. तुमचे मित्र शरद यांनी तुमचं नाव सुचवलय. मला घटस्फोट घ्यायचा आहे. कधी भेटू?" ती महिला एका दमात सगळं बोलून गेली. शरद माझा बालमित्र पण मी वकिल आहे इतकंच त्याला माहिती होतं. पण मी कोणत्या केसेस घेतो हे त्याला माहिती नव्हतं. तशी चर्चा करण्याची वेळच आली नाही. मी कौटुंबिक केसेस घेत नाही पण तो माझा चांगला मित्र आणि माझं नाव सुचवलय म्हणून मी पटकन नाही म्हणू शकलो नाही. मी मनात विचार केला एकदा बोलून घेऊ आणि मग कोणत्यातरी सहकाऱ्याला ती केस देऊन टाकू. मग मी तिला म्हंटलं ठीक आहे आपण भेटू तुम्ही तुमची केस मला सांगा सविस्तर. मग आपण कसं करायचं ते ठरवू. कधी येऊ शकाल आपण माझ्या अॉफीसला? " तशी ती म्हणाली "मी उशीरा घरी येते रोज कामावरच उशीर होतो. निदान ८.३० ते ९ होतात रोज आणि मी रहाते विमाननगरला. तुमचं अॉफीस सिंहगड रोडला आहे ते मला शरद ने सांगितलं आहे. त्यामुळे इतर दिवशी शक्य नाही रविवारी चालेल का?" तसं मी रविवारी टाळतो पण इथे पर्यायच नव्हता म्हणून मी हो म्हंटलं. झालं मी माझ्या कामाला लागलो.
अचानक मधे कामा निमित्ताने नगररोडला गेलो होतो. वेळपण साधारण ८ ची होती विचार केला अनायसा आलोच आहे ह्या बाजुला तर विचाराव त्या महिलेला आणि घरी असेल तर भेटून घ्यावे म्हणजे तिची चक्कर वाचेल आणि माझी सुट्टी. म्हणून फोन केला तर ती म्हणाली मी पोहोचते सर पण साधारण ८.४५ होतील. बर होईल तुम्ही थांबत असाल तर घरी मुलगा आहे मी त्याला कळवते आणि तुम्हाला पत्ता पाठवते. please तुम्ही बसा. मी येतेच तो पर्यंत." मी तिच्या घरी गेलो बेल वाजवली तसा एक साधारण १४-१५ वर्षाच्या चुणचुणीत मुलाने दरवाजा उघडला. या काका. मी पार्थ. मला आईने तुम्ही येणार ते सांगितलं होतं. बसा तुम्ही. मी तुमच्यासाठी पाणी आणतो. असं म्हणुन तो पाणी आणायला आत गेला सुद्धा. मला तो खूपच भावला. मी बसलो. विचार करत होतो इथूनच सुरुवात करावी का माहिती घ्यायला कारण मुलगा तर हुशार दिसतोय. तो पाणी घेउन आला मी पाणी घेतलं आणि काहीतरी बोलायचं म्हणून thanks म्हंटलं आणि त्याला बसायला सांगितलं. तो बसला. मी त्याला म्हंटलं तुला थोडा वेळ आहे का ? अभ्यास नाही ना? जरा गप्पा मारणार का आई येई तोपर्यंत ? तो म्हणाला हो काका. एकदम काही विचारायला नको म्हणून इकडचे तिकडचे चार प्रश्न विचारले. मुलगा एकदम प्रगल्भ वाटला. मग मुद्याला हात घेतला. तुला माहिती आहे का मी कोण आहे? तो म्हणाला हो काका आईने सांगितलं तुम्ही वकिल आहात म्हणून आणि तिचे काहीतरी काम आहे तुमच्याकडे. बर मग काय काम आहे तिने सांगितलं आहे का? तो " नाही सांगितलं पण मला अंदाज आहे बहुतेक आई-बाबा वेगळे होताहेत. आता मात्र खरंच मला त्याचं कौतुक वाटलं. मी म्हणालो तू काही सांगितलं नाहीस का त्यांना. मला माहिती आहे तू लहान आहेस पण आता तुला परिस्थिती लक्षात घेऊन ती हाताळायला हवी. तसं तो म्हणाला " मी खूपदा सांगतो पण ते ऐकतच नाहीत म्हणतात तू लहान आहेस आणि मला बेडरूम मधे पाठवतात आणि स्वतः भांडत बसतात." मला त्याचं वाईट वाटलं तो रडवेला झाला होता मी आणखी थोडं पुढे जात त्याला विचारलं." मला खरं सांगशील नक्की काय कारण आहे भांडणाचं?" तसं तो म्हणाला "कशावरूनही भांडतात. विशेष असा विषय नाही. नुकतीच चिडचिड. मलाच कारण कळत नाही." मी विचार केला काहीतरी नाजुक कारण असावे जे ते ह्याला सांगत नसावे लहान असल्यामुळे. मग मी बोलणं थांबवणारच होतो तेवढ्यात तोच म्हणाला "काका माझं observation सांगू का? ते दोघेही action ला लगेचच reaction देतात. दोघेही सबुरीने घेत नाहीत. office tension दोघांनाही आहे आणि त्यामुळे संयम संपलाय. कोणीच कोणाच काहीही ऐकण्याचा मनस्थितीत नसत. एखाद्या गोष्टीवर एकमत होतं नाही आणि मग भांडण वाढत जातं. आणि शेवटी मारामारी पर्यंत प्रकरण जाते काय करू समजत नाही." मी त्याच्याकडे बघतच राहिलो इतक्या लहानपणी कुठून आली ह्याला ही समज नक्कीच आई-वडीलांकडून नाही. कारण तसं असतं तर त्याच्यात भांडण झालीच नसती. तो रडवेला झाला होता. मी म्हणालो "बाबा कुठे आहेत ?" तो म्हणाला "२-३ दिवस झाले त्यांच्या मित्राकडे गेले आहेत रहायला." मी म्हणालो "ठिक आहे बघू आपण काय करायचे ते. तू घाबरू नकोस. मला त्याचे खूप वाईट वाटले.

वरकरणी प्रश्न एवढा गंभीर नव्हता. संयमाचा अभाव आणि समजून सांगायला कोणीच नाही. कमीपणा कोणी घ्यायला तयार नाही आणि त्यात कामाचा ताण. दोघेही working. दोघांनाही स्वातंत्र्य. नवीन पिढी एकीकडे भरपूर कष्ट करते पण दुसरीकडे संवाद हरवत चालला आहे आणि ताणतणावाने विसंवाद वाढतो आहे. त्यातच स्वावलंबी असल्याने दुसऱ्याची गरजच नाही हा भाव वाढत चाललाय. सुबत्ता असताना मनशांती हरवून गेलीये आणि कमी सहवासाने संवाद संपलाय आणि मग छोट्या छोट्या कारणाने वेगळे व्हायचे प्रमाण वाढते आहे. मी आता वेगळा प्रयोग करायचे ठरवले पार्थला म्हंटलं आपण एक आयडीया करू या. तू आता आई-बाबांचा पालक व्हायचे. "ते कसं" तो म्हणाला. मी म्हणालो सांगतो आई आल्यावर फक्त तू तयार रहा. त्याची आई आली. तिनं मला सांगितलं त्यांचं एकमेकांशी पटत नाही मला लगेचच घटस्फोट हवाय. मी त्यांना म्हणालो ती legal process आहे त्याला वेळ द्यावा लागतो. सगळ्या steps घ्याव्या लागतात. तो पर्यंत तुम्ही एकत्र रहा. ती म्हणाली "शक्य नाही रोजची कटकट भांडण. कंटाळून गेलेय मी. आता तोंड सुद्धा बघायला नको वाटतं" मी म्हणालो "थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. तसेही कोर्टात लगेच घटस्फोट मिळणार नाही ते सुद्धा counseling करतात. नात टिकावे म्हणून प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही थोडा संयम ठेवा आणि अजिबात वादविवाद करू नका. लक्षच देऊ नका. काय वाटलं तर तुम्ही पार्थला सांगा तो बोलेल त्यांच्याशी. तुम्ही बोलूच नका फारतर. फार तुमचं म्हणणं लिहून ठेवा. मी कागदपत्रे तयार करतो सध्या थोडी धावपळ आहे. पुढच्या आठवड्यात बघू तोपर्यंत तुम्ही मी सांगतो तसं करा आणि त्यांना बोलावून घ्या आणि पार्थला handled करू द्या." मी निघालो आणि पार्थला हाक मारली आणि त्याला सांगितलं "तुला आता सांभाळून घ्यावे लागेल. दोघांनाही काय बरोबर ते सांग कारण ते आता भांडणार नाहीत. तुला वेळ मिळेल आणि चिडचिड पण होणार नाही. असं आठवडाभर कर बघूया काय होतय ते" तो खूष झाला त्याचा चेहरा खुलला मला thanks म्हणताना त्याचे डोळे पाणावले होते. खरंच समजूतदार होता तो. त्याला काहीही झालं तरी आई-वडील दोघेही हवे होते. मी त्याला bye केलं.
मला घटस्फोट नकोच होता पण मी किंवा पार्थने force करुन नाही तर त्या दोघांनी तो निर्णय घ्यायचा होता. मी पुढच्या आठवड्यात फोन केला madam कागदपत्रे हवी आहेत काही कधी येताय ? तशी ती म्हणाली "सर मी सध्या थोडी busy आहे नंतर दिली तर चालेल का?" मी म्हंटलं "पण त्याशिवाय case file होणार नाही" ती म्हणाली "चालेल, तुमची fees किती पाठवायची ते सांगा मी पाठवते. मी म्हणालो "त्याची चिंता नाही मी सांगतो, बरं तिथे पार्थ आहे का? द्या त्याला. अरे पार्थ काय परिस्थिती आहे ?" तो म्हणाला "काका एकदम मस्तच, आता भांडण होतं नाहीत आणि मी त्यांना समजावतो काय dispute झालं तर, वादविवाद न झाल्याने आरडाओरडा कमी झाली आणि पर्यायाने चिडचिड पण. माझा पण वट वाढलाय, माझं ऐकतात ते" मी पण खूष झालो म्हंटलं wel done. आणखी आठवड्याने परत फोन केला तसं त्या म्हणाल्या "मला पार्थ ने सांगितलं सगळं, खरचं आता खूपच भांडण कमी झाली आहेत. आपण नंतर बघूया चालेल." मी म्हंटलं "पळेल, अहो पार्थ सारखा मुलगा तुम्हाला मिळाला हे तुमचं भाग्य आणि वेळीच तो मला भेटला आणि त्यानं सगळं सांगितलं, तो खरंच great आहे. त्याला सांभाळा. मला थोडं भरून आलं. चला आता भांडण मिटली आता संवाद वाढवा ठेवतो." तसं त्या म्हणाल्या "थांबा सर, तुम्ही अगदीच योग्य वेळी भेटला. नाहीतर आमचा संसार मोडला असता. तुमचे आभार कसे मानू कळत नाही. पार्थ पण तुमची खूप आठवण काढतो. सर एक विचारू तुमची fees किती द्यायची?" मी म्हणालो, "अहो मी कुठे काय केलय, केस file च झाली नाही तर fees कसली? फक्त एक करा पार्थला काळजीपूर्वक सांभळा." हे सांगताना माझा आवाज जड झाला आणि तिकडून देखिल काहीसा नरम स्वर आला "हो सर नक्कीच"
मला काहीही पैसे मिळाले नाहीत पण मनापासून आनंद झाला आणि हो एक मित्र मिळाला "पार्थ". खरंच नवीन पिढी किती प्रगल्भ आहे आणि कोणतीही परिस्थिती हाताळण्याची हातोटी जन्मजात त्यांच्याकडे आहे. तो माझ्यावर प्रभाव टाकून गेला. आजकाल असतो fb वर कधीकधी मला फोन करतो आणि खुशाली विचारतो. मलाही बरं वाटतं त्याच्याशी बोलून. ही नवि पिढी खूपच समजूतदार आहे पण त्यांना जपायला हवं. योग्य त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा ऐकायला हवं. संस्कार आपण करतो आणि त्याच फळ आपल्यालाच मिळतं. मित्रांनो ही खरी घडलेली गोष्ट आहे. वकिलीत भरपूर पैसे मिळाले पण त्याचबरोबर मनाला समाधान आणि चांगला मित्र मिळाला म्हणून तुम्हाला सांगितलं. एवढंच

- ॲड. विनोद दरेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा