सोमवार, २४ जून, २०२४

1235. उष्ट आणि शिळं अन्न

       बाहेर खाताना काळजी घ्या आम्ही कधीच उष्ट आणि शिळं अन्न खात नाही. पुढल्या वेळेस हे लोकांना सांगण्या अगोदर जरा विचार करून बोला. काही दिवसांपूर्वी आमचे एक परिचित आम्हाला एका अतिशय प्रसिद्ध अशा रेस्टॉरंट मध्ये जेवायला घेऊन गेले होते. मी बहुधा नेहमीच बाहेर कुठे हॉटेलमध्ये जेवायला जाणं टाळते. परंतु सामाजिक दबावाखाली कधी कधी जावं लागतं. आजकाल जेवणात पनीरचे पदार्थ खाणं हे श्रीमंतीचे लक्षण समजलं जातं. म्हणून त्यांनी सुरुवातीला पनीरच्या काही डिशेस मागवल्या. प्लेट मध्ये ठेवलेले पनीरचे वेगवेगळ्या आकारांचे तुकडे बघून मला थोडसं विचित्रच वाटलं. असं वाटलं की त्या तुकड्यांना मुद्दाम कापून शिजवलेलं आहे. मी वेटरला बोलावून त्या हाॅटेलच्या कुकला बोलावून आणण्यास सांगितलं. कुक आल्यावर त्याला मी विचारलं, "पनीरचे तुकडे वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे का बरं आहेत?" तेव्हा तो बोलला, "ही आमची स्पेशल डिश आहे." त्यावर मी त्याला म्हटलं की मी आणखीन एक डिश माझ्याकरता पॅक करून घरी घेऊन जायचा विचार करतेय. पण मला ही तुमची स्पेशल डिश  माझ्यासमोर बनवून दाखवा. आख्ख रेस्टोरंट माझ्या वाढलेल्या आवाजानं जणू हादरून गेलं होतं. हॉटेलमधील अनेक लोक आपलं जेवण थांबवून माझ्याकडे बघू लागले. हाॅटेलचा स्टाफ वेगवेगळ्या सबबी सांगू लागला. शेवटी पोलीसच्या भीतीने वेटरनं कबूल केलं की जेवणारे लोक अनेकदा प्लेटांमध्ये अन्न, भाज्या कोशिंबीरी आणि पोळ्या वगैरे टाकून निघून जातात. हॉटेलमधल्या स्वयंपाक घरातून हे सारं फेकून दिल्या जात नाही. पनीर व भाज्यांमधील मोठे तुकडे एकत्र करून व पुन्हा त्यांची भाजी बनवून ग्राहकांना डिश दिली जाते. बशांमध्ये शिल्लक राहिलेली कोशिंबीर नवीन ऑर्डर साठी वापरली जाते. बश्यांमध्ये टाकून दिलेले सुक्या चिकन व मांसांचे तुकडे पुन्हा कापून ते करीमध्ये नव्यानं टाकले व शिजवले जातात. शिळ्या आणि सडक्या भाज्या सुद्धा करीच्या रूपाने पुन्हा वाढल्या जातात. हे मोठमोठ्या हॉटेलमधलं वास्तव आहे. यापुढे जेव्हा केव्हा हॉटेलमध्ये खायला अथवा जेवण करायला जाल तेव्हा उरलेलं अन्न एका प्लास्टिकच्या थैलीमध्ये टाकून सोबत घेऊन जा आणि बाहेर जाऊन एखाद्या जनावराला तरी खाऊ घाला किंवा मग ती पिशवी कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्हीच स्वतः फेकून मगच पुढे जा. अन्यथा कदाचित तुमचं उष्ट अन्न दुसरा कुणी खाईल किंवा तुमच्या प्लेट मधील अन्न कदाचित दुसऱ्या कुणी प्लेटमध्ये टाकून दिलेलं उष्ट अन्न असू शकेल.
      दूसरा किस्सा भगवान कृष्णाची जन्मभूमि वृंदावन येथील आहे. वृंदावनवा पोहोचल्यावर, मी मंत्रमुग्ध होऊन तिथल्या पवित्र भूमीकडे पाहात होते. दिल्लीहून लांबचा प्रवास करून आल्यावर आम्हा सर्वांनाच कमालीची भूक लागली होती. म्हणून एका स्वच्छ दिसणाऱ्या उपहारगृहामध्ये आम्ही प्रवेशलो. उगीच ऑर्डरला वेळ लागू नये म्हणून आम्ही डिश ऐवजी जेवणाच्या थाळ्या मागवल्या. एका स्वच्छशा ट्रे मधून वरण, भाजी,भात, रायतं व सोबतच एक टोपलीतून चपात्या आणल्या गेल्या. सुरुवातीचे काही घास घेताना लक्षात आलं नाही, पण मग नंतर मला काहीतरी चुकतंय असं वाटू लागलं. मग लक्षात आलं की पोळी थोडी आंबूस लागते आहे. मग भाजीकडे माझं लक्ष गेलं तेव्हा लक्षात आलं की भाजीतील प्रत्येक तुकड्याचा रंग वेगळा आहे. मग भाताची चव घेऊन बघितली. तिथेही काहीतरी गडबड वाटली. सगळं जेवण तसेच टाकून आम्ही उठलो आणि मग काउंटर वर मी जेवणाचं बिल किती झालं म्हणून विचारलं तर हाती साडेसहाशे रुपयांचे बिल ठेवल्या गेलं.
मी म्हटलं, "भाऊ! पैसे तर मी देईन. पण एकदा मला तुमचा भटारखाना दाखवा." तो एकदम गडबडून गेला आणि मला विचारू लागला, "कां? काय झालं?"
मी म्हटलं, " जो पैसे देतो त्याला जेवण साफ बनतंय की नाही हे पाहण्याचाही हक्क आहे." 
तो काही बोलण्या आधीच मी हॉटेलच्या भटारखान्यात शिरले. आत शिरल्यावर स्वयंपाक घरात कसलाही पदार्थ शिजत नाहीये हे पाहून माझ्या आश्चर्याला काही पारावार उरला नाही. एका टोपलीत कांही पोळ्या ठेवल्या होत्या. फ्रिज उघडून बघितला तर आंत उघड्या भांड्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या शिजलेल्या भाज्या ठेवलेल्या दिसत होत्या. कांही भाज्यांना तर चक्क बुरशी लागली होती. फ्रिजमधून सडका वास बाहेर पडत होता. आचाऱ्याला दरडावून विचारल्यावर ह्या साऱ्या भाज्या एक आठवड्याइतक्या शिळ्या असल्याचं त्यानं कबूल केलं.  वाढताना याच शिळ्या भाज्यात तेल टाकून  व कढईत गरम करून आपण त्यात कोथिंबीर व टमाटू टाकून डिशमध्ये ग्राहकांना सर्व्ह करीत असतो हेही त्यानं मान्य केलं. कणिक आपण केवळ एक दिवसाआडच मळतो. किती किती तास वीज जाते तेव्हा खाद्यपदार्थ खराब होऊ लागतात. ते लपविण्यासाठी त्यांत तिखट आणि भरपूर मसाले टाकून डिशेस सर्व्ह केल्या जातात. तिंबलेली शिळी कणिक खराब झाली असेल तर तीच नान साठी सर्रास वापरली जाते.
मी रेस्टॉरंटच्या मालकास बोलले "तुम्हीही कधीतरी यात्रा करीत असालच, ईश्वर करो, जेव्हा पुढील यात्रेच्या वेळेस तुम्ही भुकेनं अगदी व्याकुळ झाला असाल तेव्हा तुम्हाला बिलकूल असंच जेवण मिळावं जसं तुम्ही तुमच्या ग्राहकांना खाऊ घालता." माझं हे बोलणं ऐकून त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला. 
     आज आपल्याला संकटं, धोके व फसवणूकीपासून केवळ आपली जागरूकताच वाचवू शकते. कारण आता देवालाही दुष्टांनी घेरलेलं आहे. भारतातून योग्य आणि अयोग्य यांतील फरक संपत चालला आहे. प्रत्येक दुकानात वा प्रतिष्ठानात एका कोनाड्यात देवाचं मोठं वा लहान मंदिर पहायला मिळेल, व्यापारी सकाळी येताच देवाच्या मूर्ती समोर धूप, दीप लावतो, गल्ल्याला नमस्कार करतो आणि मग दुकानातील सामानासोबतच स्वतःचा आत्मा विकण्याचा धंदा सुरू होऊन जातो. देवाजवळ मागणं मागताना दुकानदार हा विचार करीत नाहीत की ते स्वतः जगाला काय देतायत !
       ही परिस्थिती सर्वच ठिकाणी असेल असे नाही. कारण काही ठिकाणी अनेक हॉटेल्स प्रामाणिकपणे त्यांच्या स्वकष्टावर चांगला व्यवसाय करत असतात. परंतु बऱ्याच अनोळखी ठिकाळी कदाचित तुम्हाला असा वाईट अनुभव येईल. त्यामुळेसावध व्हा !जागरूक रहा !  बाहेरचं हाॅटेलचं खाणं टाळा. 🙏
घरचं अन्न सर्वात चागलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...