गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

837. समजून घेणं

      आपल्याला मुलगी नाही ही सल मनात कुठे तरी बोचत होती . एक मुलगी असती तर बरं झालं असतं तिने तरी मला जरा समजून घेतलं असते . ह्या सततच्या पालपुदाची  माझ्या नवऱ्याला आणि १९ वर्षाच्या मुलाला सवयच झालेली  आज दुपारी तर जरा जास्तच चिडचीड चाललेली . आवडती मालिका रात्री बघता आली नाही आता रिपीट भाग बघायचा होता तर नेमके त्याच वेळी नातेवाईक घरी येणार होते वरून ऑर्डर काहितरी छान नाश्त्याला बनवा . झाला आमच्या तोंडाचा पट्टा सुरू . मुलगी असती तर बरं झालं असतं तिने नाश्ता तरी बनवून दिला असता मला मालिका बघता आली असती .पण आमचं नशीब एवढे कुठे चांगलं आयतं  काहीच नाही . स्वतःच बनवायचं आणि खायचं . खाण्यासाठी बनवून हॉल मध्ये आले. फोन वाजला. पाहुणे ट्रॅफिक मध्ये अडकलेत अजून अर्धा तास लागेल.
तेवढ्यात माझा मुलगा समोर आला आणि दोन्ही हात धरून सोफ्यावर बसवले . म्हणाला बस आपण थोड बोलूया . मी हसून म्हंटले आता तू काय माझ्याशी बोलणार क्रिकेट , बॅडमिंटन का तुमची ती मोबाइल मधली एखादी  गेम .
तो ही हसून म्हणाला आज आपण  समजून घेण  ह्यावर बोलूया?
काय ? मी आश्चर्यचकित
हो आई समजून घेण म्हणजे नक्की काय ग. आम्ही दोघे पुरुष घरात आहोत आणि तू स्त्री आहेस तर तुझ्या वेदना दुःख त्रास आम्हाला खरचं समजत नाही. असं तुला वाटू शकत पण तसं नाही
      बरं. मला सांग परवा रात्री तू खूप छान मिसळ बनवली. अर्ध्या तासाने तू म्हणालीस खूप तिखट खाल्यामुळे आता थोड गोड खावस वाटतंय पण घरी गोड काही शिल्लक नाही साखरे शिवाय त्यानंतर तू मला बाहेरून दुध आणायला सांगून आत गेलीस .बाबांकडून पैसे घेताना त्यांनी मुद्दाम २० रू. जादा दिले म्हणाले चॉकलेट घेऊन ये .मी आणून तुला दिली आणि सांगितले दूध वाल्या काकांकडे सुट्टे नव्हते म्हणून त्यांनी चॉकलेट दिले  तेव्हा तू किती खूष झालीस पटकन खावून टाकलंस. त्यानंतर आठव ८ दिवसांपूर्वी तुला उगीच अस्वस्थ वाटत होतं तुला तुझ्या आईशी म्हणजे माझ्या आज्जी शी बोलायचं होतं पण फोनच लागत नव्हता .तू सतत फोन ट्राय करत होतीस तुझं  कामात लक्षच नव्हतं. तेव्हा मी आणि बाबांनी तुला सांगितले आज मस्त गरमगरम मूगाची खिचडी खायची आहे तेच बनव . तूही पटकन खिचडी बनवून निवांत बसलीस थोडावेळ आणि रात्री बाबांनी तुला आवडतो म्हणून बाहेरून डोसा मागवला पण तू तुझ्याच विचारात हरवलेली होतीस तुझ्या लक्षातच नाही आलं . आता आजचच बघ ना तू नाश्ता करायला आत गेलीस तुझी चिडचीड चाललेली मालिकेसाठी त्यावेळात मी आणि बाबांनी हॉल आवरून घेतला टेबल पुसला . आत बेडवर पडलेल्या कपड्यांच्या घड्या घालून छान कपाटात ठेवून दिले . पण तुझ्या ते लक्षातच नाही आलं . तू मूद्दाम करतेस अस अजिबात म्हणत नाही . मला बहिण असती आनंद च झाला असता मला आणि बाबांनाही ! पण आम्ही तुला समजूनच घेत नाही असं अजिबात नाही. मला छान कॉफी बनवता येते मी रोज बनवून दिली असती पण तुला आवडत नाही तुला चहा आवडतो . तुझ्यासाठी चहा बनवायला नक्की शिकेन प्रॉमिस !  तू शांतपणे विचार करून बघ तुझ्याही लक्षात येईल. एक मुलगी आईवडिलां वर खूप प्रेम करते तेवढेच आम्ही मुलं पण करतो फक्त ते तेवढ्या सहजतेने जातायेता व्यक्त करत नाही इतकंच . तुलना करत नाही मुलगा मुलगी अशी पण मुलगी असती तरच हे सुख मिळतं  अस नाही ना ग आता बघ तुझ्याबरोबर ४ तास साड्यांच्या दुकानात बसू शकत नाही पण तुला बाईक वरून शॉपिंगला हवे तिथे घेवून जावू शकतो की नाही सांग बर ! आणि हो तुला कुठला रंग उठून दिसतो तुला काय छान दिसत हे तर सांगतोच ना. त्याचबरोबर तुला केसात गजरा माळायला  नाही आवडत पण दररोज पूजा करताना देवासाठी ताजी फुले हवीच असतात हे माहीत आहे मला. तुझी तब्येत बरी नसताना तू झोपली असशील तर मलाही नाही करमत मग मित्रांनी किती बोलावलं तरी मी बाहेर जात नाही मुद्दाम घरी थांबतो तुला सोबत म्हणून . बाहेरून घरी आल्यावर समोर बाबा असले तरी हेच विचारतो आई कुठाय का बाहेर गेली आहे हे सहजच  होतं . मुलंही प्रेम करतात आम्हीही तुम्हाला मनापासून जपण्याचा प्रयत्न करतो तुमचा कठीण काळ अडचणी आम्हालाही कळतात . तुम्ही हक्काने  समजून विश्वासात घेऊन सांगण्याची गरज असते. तुम्ही त्या नजरेने पाहण्याची गरज आहे . मुलांनाही आई बाबा कधीच ओझ वाटतं नाहीत . मला काय वाटतं सांगू तुम्हीच तुमच्या मनाशी पक्की खूणगाठ बांधलेली असते मुलगीच सगळं समजून घेवू शकते तीच आई बाबांना चांगले सांभाळू शकते तिला मनातलं सगळं कळतं किंवा मुलांना कशाशी काही घेणं देणंच नसतं त्यांना कशाचा काही फरकच पडत नाही खरं तर तुम्हाला तुमचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे . मुलांचं ही  सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावरच आहे कायम राहील .  रागवणार नसशील तर  एक सांगू ते सतत ते गळ्यात हात टाकून  लाडे लाडे गोड गोड बोलून सांगता येत नाही एवढेच आता तूच सांग तुला मुलगी असती आणि ती परदेशात स्थायिक झाली असती तर..  तर मी आहे ना जवळ  समजून घ्यायला कायम आयुष्यभर. 
 ती  स्तब्ध झाली शब्दच आठवेना  बोलण्यासाठी. हा एवढा समजूतदार कधी झाला आपल्याला कळलंच नाही.

सौ विजया देसाई
वेंकटेश सेरेनिटी
पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...