मंगळवार, ९ मे, २०२३

312. एकच दिवस जगलास तरी वाघासारखा लढ...

 पन्नाशी झाल्यावर मित्रा जरा थांबलास का रे ?
की वाहू लागलेत तुझ्या डोक्यात निवृत्तीचे वारे. 

इतक्या लवकर मित्रा का रे मोजू लागलास श्वास.
वार्धक्याच्या भीतीने झालास का रे उदास ? 

कशासाठी धावायचं, आता येऊ लागलेत सल्ले.
आयुष्याचे आता काय थोडेच राहिलेत पल्ले. 

मित्रा अशा विचारांच्या जाळ्यात, नको चुकून सुद्धा पडू.
त्यांना सांग सोबत आपण, पंख लावून उडू.

मात्र वेळेप्रमाणे थोडासा चेंज करू फॉरमॅट.
बर्न करू आपण आता नको तेव्हडे फॅट. 

जगता जगता आपण आता जोपासूही छंद.
मनोसोक्त हुंगता यावा कलेचाही गंध.

मित्र आणि मैत्रिणींची जमवू खुशाल मैफिल.
जगू आपण सारे अगदी जिंदादिल.

सोबत धरू आपल्या ध्येयाची रे कास.
सहवासाने आपल्या घडत राहावा विकास.

घरी बसल्यावर सुरु होतात विचारांचे खेळ.
जगायचं म्हणता म्हणता निघून जाते वेळ. 

चिंतेच्या भुताला नको बसू देऊ मानेवर.
नकारात्मक विचारांना चांगलंच धर धारेवर.

नव्या इनिंगचा मित्रा पुन्हा एकदा स्टान्स घे.
हुक मारून बॉल तू सीमेबाहेर फेकून दे. 

जगताना कधीही नको लावूस रड.
एकच दिवस जगलास तरी वाघासारखा लढ. 

-- चंद्रहास गोपिनाथ रहाटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...