आज एक मुलगी रेल्वे स्टेशन ला ५ रू मीटर नी ताजेतवाने तोरण विकत होती...
बाजूचे सगळे २०/३० रू ला विकत होते,
मी तीला विचारलं, सगळे २०/३० रूपयांनी विकत आहेत, तुझा शेवटचा माल शिल्लक राहिला आहे म्हणून पाच रुपयांनी विकतेस का..?
ती थोडं थांबली व मला म्हणाली...
दादा, आयुष्यात पहिल्यांदाच रस्त्यावर बसून विकतेय फुल ..बाप नाही. आई निघून गेली.. आजी सांभाळते मला.
सकाळी ₹१००/- दिले आजीने डाळ तांदूळ आणायला...
विचार केला, म्हातारीला गिफ्ट द्यावं...
म्हणून ट्रेन पकडून इकडे आले दुपारी ३ वा फुल दोरा सुई विकत घेतली ₹८०/- खर्च झाले ...
पहिले मी पण विस रुपयांना विकले,
आजीने दिलेल्या १००/- रुपयाचे ३००/- रुपये केले. आता उरलेले पाच तोरण विकले, तर ठिक! नाहीतर, घराला बांधीन! पहिली कमाई म्हणून...
मी शांत पणे खिशात हात घालता १०० रुपये काढून तिला दिले आणि म्हंटले पोरी हे पैसे ठेव, मला तोरण नको माझ्या कडून तुला तुझ्या मेहनतीचे गिफ्ट, घरी जा ह्यातील एक तोरण तू दरवाजाला लाव आणि हो हे घे अजून ५० रुपये, जाताना तुला अणि आजीला काहीतरी गोड घेऊन जा...
कालंच बायको म्हणत होती...
देवीची ओटी जरा वेगळ्या पद्धतीने भरू...
आज तिची इच्छा पूर्ण झाली.🙏
-रामदास यादव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा