"द केरला स्टोरी" चित्रपट पाहून आले. यावर लिहिता येण्यासारखी मनस्थितीचं नाही आहे. या गोष्टी कमी - जास्त प्रमाणात मी लव्ह जिहादचं काम करतांना बघत असते, तरीही अक्षरशः रडू आणि थरकाप काही वेळ थांबले नाही. खरं तर मास्टर पीस असणाऱ्या गोष्टीवर काय लिहिणार? पण यावर प्रत्येकाने लिहिणं गरजेचं आहे, म्हणून... त्यांची धार्मिक रेषा कमी करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपली धार्मिक रेषा अजून कशी वाढवता येईल? हे बघणं गरजेचं आहे. काही गोष्टी आपण हिंदू पालक म्हणून उघडपणे बोलणं आणि स्वीकारणंही महत्वाचं आहे.
✷ सर्वप्रथम आपल्या घरात किमान प्रार्थना, पूजा करतांना आपल्या मुला - मुलींना त्याची सवय लावा. (चित्रपटात ती मुलगी तिच्या वडिलांना यात फसल्यानंतर म्हणते, किमान तुम्ही माझ्यात विदेशी विचारांसोबत आपल्या हिंदू देव - देवतांबद्दल आस्था तरी निर्माण करायला हवी होती. आणि हिंदू मुली जेवणाच्या आधी प्रार्थना म्हणणाऱ्या इतर धर्मीय मुलींकडे बघत बसतात! का आपल्या धर्मात काही मंत्र, प्रार्थना नाहीत? फक्त त्याची शिकवण त्यांना कधीच घरातून मिळालेली नसते. दुर्दैव!)
✷ लैंगिक शोषणावर घरात पालक बोलण्यास घाबरतात. मुला - मुलींसमोर हा विषय कसा बोलणार? हा न्यूनगंड पालक मनात ठेवून राहतात. खरं तर मुलींना कोणाचा स्पर्श सुरक्षित आहे अथवा नाही? याची आपसूकचं जाणीव होतं असते. हे मुलींना एक वरदानचं आहे, असं म्हणायचं. तरीही यात मुली फसतात अथवा फसवल्या जातात हे विशेषच! त्यामुळं लैंगिक शोषण (जेंडर) यावर आपल्या घरात कमीत - कमी बेसिक गोष्टींवर बोलतं चला. पुढे जाऊन मुली लैंगिक शोषणाला बळी जातांना किमान एकदा घरातील बोलण्याचा विचार करतील. समाज खूप पुढे चालला आहे, त्यामुळे यातून मुलींचे संरक्षण करायचे असेल तर असे विषय बोलण्यास पालकांना लाज वाटता कामा नयेच.
✷ एक लक्षात घ्या, या प्रकरणांमध्ये सर्वप्रथम मुलींची मानसिकता पूर्णपणे बदलण्यात येते. त्यामुळं त्यांना आधीच अशा मानसिकतेने असं बनवा, की त्या लोकांची चीड आपल्या मुलींच्या मनात निर्माण झाली पाहिजे. जशास तसं वागल्याशिवाय पर्याय नाही.
✷ शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ज्याप्रकारे त्या मुलीला ब्लॅकमेल केल्या जाते आणि त्यामुळं ती आ त्म ह त्या करते, तेव्हा... आपला जीव आपल्याला कोणामुळे घ्यावा लागेल! एव्हढा कोणाला आपल्या आयुष्याचा फायदा घेऊ देऊ नका. आणि असं करणार असाल तर समोरच्याला पण तोच धडा मिळेल याची सोय करूनच जा. त्रास देणाऱ्याला कधीही सोडायचं नसतंच.
✷ खाण्यातून काही होवू शकतं? काही ठराविक औषधं दिल्यामुळे काही होऊ शकतं? मानसिकता बदलू शकते? यावर आपल्या अती जास्त पुढारलेल्या हिंदूंचा विश्वास नसतो, त्यासाठी त्यांनी हा चित्रपट बघावाच.
✷ त्यांच्या मुली कॉलेजच्या वस्तीगृहात जाऊन एव्हढा मोठा कट रचून आपल्या हजारो मुली फसवू शकतात, तर आपण हिंदूंनी किमान आपल्या मुलींना "शास्त्रासोबत शस्त्रविद्या" शिकवणं अत्यावश्यकचं आहे.
✷ आपण कुठल्यातरी कटाच्या रचनेत चुकून फसल्या गेलो आहोत, हे समजल्यानंतर जर त्यातून बाहेर पडायचं असेल, पण आपल्याला आपल्या घरचे, समाज स्वीकारेल का? या विचाराने घाबरून जर पुन्हा त्याच लोकांचा अ त्या चा र सहन करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. समाज स्वीकारू अथवा नाही स्वीकारू, याचा विचार करूच नये. समाज सख्याला सोडत नसतो. त्यामुळं समाज यावेळी फा ट्या वर मा रा य चा असतो. आपला हिंदू धर्म हा वि ध्वं स क वृत्तीचा नाही आहे, त्यामुळे या गोष्टींचा मुलींनी जास्त विचार करूच नये.
✷ त्यांच्या धर्मात लग्न करायचं असेल, तर आधी आपला धर्म बदलावाचं लागतो, तर असं लग्न करण्याआधी त्याचं खरंच तुमच्यावर प्रेम असेल, तर त्याला त्याचा धर्म तुमच्यासाठी बदलण्यास सांगून बघा, उत्तर मिळेल.
✷ मुली शिकण्यासाठी बाहेर जाण्यावाचून पर्याय नाही आहे. पण त्यांची काळजी घेण्याचे सगळे मार्ग आपण सतत तपासत राहिले पाहिजे. मुलीवर अविश्वास आहे म्हणून नाही तर तिला कोणत्या कसायाच्या हातात जाण्यापासून वाचवण्यासाठी. वेळोवेळी मोबाईलची ब्राऊझर हिस्ट्री, हाईड ॲप्स, ती कोणकोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरते? हे तिला विश्वासात घेवून बघणे, तिच्या संपर्कातील मित्र - मैत्रिणींशी मोजकीच पण चांगली ओळख ठेवणं गरजेचंच.
✷ मुलीला मित्र असता कामा नये, अशाही मानसिकतेचे "काही" लोकं अजूनही समाजात आहेत. तर ते पहिले इथेच चुकतात. आजच्या काळात ही गोष्ट अशक्य आहे. आपल्या मुलाला असणाऱ्या मैत्रिणी पालक ज्या सहजतेने स्वीकारतात, त्याचं सहजतेने मुलीला असणारे मित्रही पालकांना स्वीकारता आले पाहिजे. मुलींना जास्त स्वातंत्र्य (थोडक्यात स्वैराचार) देणं आणि याउलट जास्त बंदिस्त ठेवणं हे ही चुकीचंच. या गोष्टींचा मध्य साधा. मित्र वाईट असतील तर ती मैत्री कशी चुकीची आहे? हे पटवून द्या पण मुलीवर त्यामुळे बंधने घालू नका. यातून मुली हेकेखोर बनतील पण तुमचं ऐकणार नाही तो भाग वेगळाच.
✷आपल्या हिंदू मुलींना आपल्या स्त्रियांसाठी असलेले कायदे आणि त्यांच्या धर्मातील त्यांच्या स्त्रियांसाठी असलेले कायदे यांची माहिती करून द्या. गरजेचे आहे.
✷ सगळ्यांत महत्वाचं म्हणजे आपल्या मुला - मुलींना पालक म्हणून समजून घेता - घेता त्यांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करा. मुलीचा वडिलांइतका जिवलग मित्र दुसरा कोणीच नसू शकतो. फक्त समजून घेण्याचा काय तो फरक असतो.
✷ हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हांला समजेल, की यात फसणाऱ्या सगळ्याच मुली ह्या स्वतःहून फसलेल्या नसतात, तर त्यांच्या मानसिकतेत बदल करून त्यांना फसवल्या जात असतं. त्यामुळे यामधून बाहेर पडलेल्या मुलींना, त्यांच्या कुटुंबीयांना हिंदू समाजाने एका व्यापक दृष्टिकोनातून स्वीकारलं पाहिजे. उद्या वेळ कोणावरही येऊ शकते, हाच विचार मनात ठेवून फक्त हिंदू म्हणून अशावेळी याविरोधात एकत्र आलं पाहिजे...
एक स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर खरंच जर आयुष्याचा मनसोक्त आणि मनमुरादपणे आनंद घ्यायचा असेल, तर हिंदूधर्माइतका कोणताच धर्म सुरक्षित नाही, स्त्रीचं अस्तित्व मानणारा नाही. पोस्टमधील व्हिडिओमध्ये चित्रपटातील पीडित मुलगी जेव्हा हिंदू असते, तेव्हा जीवनाचा स्वच्छंदपणाने आनंद घेता येईल. ..
श्रुती संजय तुरकणे पाटील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा