गुरुवार, ११ मे, २०२३

318. गेटटूगेदर हे एक औषध आहे...

        गेटटूगेदर हे एक औषध आहे. आपल्याला पटणार नाही, पण हे नक्की वाचा. त्यातील १०% जरी  जमले तरी  तुम्ही आनंदाने उड्या मारायला लागाल. 
      का असावे... गेट टुगेदर? गेट टूगेदर चे महत्त्व...वरचेवर मित्रांच्या, मैत्रीच्या संपर्कात जरूर रहा, मनसोक्त पैसे-वेळ खर्च करा. आयुष्य मर्यादित आहे, आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल, तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही. मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे. ज्या गोष्टींतून आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. आपण गेल्यानंतर पुढे काय होणार, याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल, तेव्हा... कुणी आपले कौतुक केले काय  किंवा टीका केली काय? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल. तुमच्या मुलांची खूप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या, स्वतःचे भविष्य घडवू द्या.  त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका. मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तूही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडी निवडीवर करा. जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसते राबराब  राबणे म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा. तुम्ही साठीत आहात, आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही. या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल. तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमीन असली, तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते?
तुमच्याकडे अनेक घरे असली, तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली  पुरेशी असते.
     एक दिवस आनंदाशिवाय गेला, तरआयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला, तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या. आणखी एक गोष्ट... तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल, तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल, तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे...आजूबाजूला जे जे उत्तम आहे,  उदात्त आहे त्याकडे पहा, त्याची जपणूक करा.आणि हो...तुमच्या मित्रांना/मैत्रीणींना कधीही विसरु नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले, तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल. मित्र-मैत्रीणी नसतील, तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. त्यासाठी रोज व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात रहा. हसा आणि हसवत रहा. मुक्त दाद द्या! म्हणूनच म्हणतो...  आयुष्य खूप कमी आहे,  ते आनंदाने जगा...! प्रेम मधूर आहे, त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका! संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा..! डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण ....माथ्या आड गेलेले "जिवलग" परत कधीच दिसत नाहीत ..! !! मित्र जपा - मैत्री जपा!!
जमेल तसं, जमतील तेव्हढे, मात्र गेट टूगेदर करीत रहा.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...