एक अनोळखी युवक एका बादशहाच्या दरबारात नोकरी मागायला आला. बादशहाने विचारलं, "तुला काय येतं?" तो म्हणाला, "माझं नाव आहे चतुर. मला काम देऊन पाहा, म्हणजे ते योग्य आहे की नाही हे आपोआप कळेल."बादशहाला त्याचा तरतरीतपणा आवडला. त्याने त्याला घोड्यांचा पागेदार बनवला. काही दिवसांनी बादशहाने त्याला विचारलं, "अश्वशाळेतल्या सर्वात महागड्या जातिवंत घोड्या बद्दल तुझं काय मत आहे?" चतुर म्हणाला, "माफ करा हुजूर, पण तो काही श्रेष्ठ जातीचा घोडा नाही." बादशहा भडकला. म्हणाला, "हे खोटं निघालं तर तुझी जीभ कलम होईल." चतुर फक्त हसला. बादशहाने तो घोडा आणून देणाऱ्या व्यापाऱ्याला बोलावून घेतलं. तो म्हणाला, "हुजूर, घोडा श्रेष्ठ वंशाचाच आहे, मात्र, तो जन्मल्या बरोबर त्याची आई मरण पावली, त्यामुळे याला गायीचं दूध पाजून लहानाचा मोठा केला आहे." बादशहाने चतुरला बोलावून विचारलं, "तुला कसं कळलं की घोडा श्रेष्ठ जातीचा नाही." चतुर म्हणाला, "हा घोडा गायी सारखा चाऱ्यात तोंड घालून खातो. जातिवंत घोडा चारा तोंडात धरून तोंड वर उचलून खातो." बादशहा खूष झाला. त्याने चतुरकडे तूप, धान्य, उत्तम प्रतीचं मांस अशा महागड्या भेटी पाठवून दिल्या. शिवाय त्याची पदोन्नती करून पट्टराणीच्या महालाचा प्रमुख म्हणून त्याला नेमून टाकलं.
काही दिवसांनी बादशहाने त्याला आपल्या बेगम बद्दल विचारलं. चतुर म्हणाला, "त्या राणी सारखं वागतात, बोलतात, पण त्यांच्या अंगात काही शाही रक्त नाही." बादशहा म्हणाला, "ही गोष्ट खोटी निघाली तर शिरच्छेद होईल." चतुर फक्त हसला. बादशहाने ताबडतोब सासुरवाडी गाठली. सासू डोळे टिपत म्हणाली, "तुमच्या वालिदसाहेबांनी आमच्याकडे मुलगी जन्मली हे कळताच तुमच्यासाठी तिचा रिश्ता ठरवून टाकला. सहा महिन्यांनी आमची मुलगी मरण पावली तेव्हा तुमच्याशी रिश्ता कायम राहावा म्हणून आम्ही ही मुलगी गुप्तपणे दत्तक घेतली." बादशहाने चतुरला विचारलं, "तुला कसं कळलं?" चतुर म्हणाला, "खानदानी मुला-मुली मध्ये एक जातिवंत अदब असते. ती नोकर चाकरांशी बोलतानाही बदलत नाही. बेगमसाहिबा नोकरांवर ज्या भाषेत डाफरतात, त्यातून मला त्यांची पैदाइश कळून गेली."
बादशहाने खूष होऊन चतुरकडे पुन्हा धान्य, मेंढ्या, शेळ्या, गायी, म्हशी इनाम म्हणून पाठवून दिल्या आणि त्याला दरबारात नेमलं. काही काळाने बादशहाने चतुरला बोलावलं आणि म्हणाला, "आता माझ्या विषयी सांग?" चतुर म्हणाला, "संपूर्ण अभयदान दिलंत तर बोलतो." बादशहाने अभय दिलं. चतुर म्हणाला, "तुमचा तर जन्मही बादशहाच्या कुळात झालेला नाही आणि तुमच्यात बादशहाचं चलनही नाही." बादशहा संतापाने थरथरत आपल्या आईकडे गेला. त्याची क्रुद्ध नजर पाहताच आई काय ते समजली आणि म्हणाली, "बेटा, तू एका गुराख्याचा मुलगा आहेस. आम्ही तुला दत्तक घेतलं होतं." बादशहाने चतुरला विचारलं, "हे तुला कसं कळलं?" चतुर म्हणाला, "बादशहाचं रक्त असतं तर तुम्ही मला दरवेळी हिरे, मोती, सोनं, नाणं, जमीनजुमला, महाल अशा गडगंज भेटी दिल्या असत्या. तुम्ही मला फुटकळ गायी, म्हशी, बकऱ्या, खाण्या पिण्याच्या किरकोळ गोष्टी इनाम देत राहिलात. ही लक्षणं बादशहाची नाहीत, गुराख्याचीच आहेत.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा