माझा एक प्रश्न आहे ? जर सुख व दुःख आपल्या मध्ये आहे ठिक आहे मग कोणी आपल्याला सतत टाँचर करत असेल, आपल्या मनात सारखे आघात होत असतील तर आपण प्रवाह च्या विरुद्ध दिशेने किती काळ टिकणार आम्ही कोलमडून पडणार बाहेर जगात कोण साथ देणार मग सुख दुःख शोधणे लाबच पिंजऱ्यात पक्षी किती काळ तग धरून राहील माझी विनंती आहे आम्हाला मार्गदर्शन वेळ असे ल तेव्हा करावे?
@@@
सुख दुःख आपल्या मध्ये नाहीत, त्याचे निर्माते आपन आहोत, एकच दुःख म्हणून सर्वांसाठी समान नसत, कोणी 100 मध्ये एक मार्क कमी मिळाला म्हणून दुःखी असतो तर कोणी 35 मार्क मिळून पास झाला म्हणून खुश असतो, सुख दुख तुमच्या दृष्टिकोनवर अवलंबुन आहे.
तुम्ही म्हणता कोणी आपल्याला सतत टॉर्चर करत असेल आणि आपल्या मनावर सतत आघात होत असतील तर.... पण टॉर्चर ची व्याख्या काय आहे, आणि मनावर आघात आपल्या मर्जीशिवाय कोणी करू शकत नाही, तसे करणे कोणालाच शक्य नाही. कोणी तुमचा अपमान केला, तुम्हाला बंदिस्त करून कारागृहात ठेवले, तरी ही तुमच्या मर्जीशिवाय कोणी तुम्हाला दुःखी करू शकत नाही.
व्हिक्टर फ्रँकलला दुसऱ्या महायुध्दाच्या काळात नाझी छळछावणीत राहावं लागलं, तिथला अमानुषपणे केला जाणारा छळ, दिवसभराचे कष्टाचे काम, जनावरांसारखी वागणूक, थकल्या भागल्यावर कामात जरा देखील दुर्लक्ष झाले तर हंटरचे फटके, अतोनात कष्ट, आणि इतकं सगळं सहन करून, रात्री भोजन म्हणून फक्त दोन ब्रेड चे तुकडे आणि थोडेसे सूप, अपुरी जागा, झोपायला अंथरून नाही, डोक्याखाली उशी नाही. आजूबाजूला दुर्गंधी कुबट वास, काम करण्यास असमर्थ ठरणाऱ्या लोकांचे गॅस चेंबर मधील दर्दनाक मरण, प्रेताची, मृत शरीराची दुरावस्था, दुसऱ्या दिवशी जिवंत राहू अथवा नाही याची अनिश्चितता, या सर्व कठीण परिस्थीतीत अनेकांनी जगण्याची आशा सोडली काही जणांनी आत्महत्या केली. पण ज्यांनी या परिस्थीतीत ही तग धरला, जे जिवंत राहिले त्यांना त्या स्थितीत देखील का बरं जगावं अस वाटलं असेल?
व्हिक्टर ने एक मनोवैज्ञानिक म्हणून त्याचा शोध घेतला, तेव्हा त्यांच्या अस लक्षात आलं की जे जिवंत राहिले आणि हे सर्व छळ सोसले त्यांचा अभ्यास करताना कळलं की प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी उद्दीष्टे होती, कोणालातरी आपले अपुरे राहिलेले संशोधन पूर्ण करायचे होते, कोणाला भविष्यात आपल्या पत्नी व मुलांची काळजी घ्यायची होती.कोणाला आपल्या प्रिय व्यक्तीला भेटायचं होत, आणि ते साध्य करण्यासाठी त्यांना जगावस वाटत होतं, आणि त्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टांमध्येही त्यांना अर्थ वाटत होता.
जेव्हा तुम्ही परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा तुम्हाला स्वतः बदलावं लागत. तुम्ही माणसांकडून सार काही हिरावून घेऊ शकता, अगदी त्याला कारागृहात बंदिस्त केलं तरी देखील एक गोष्ट अशी आहे जी कोणी हिरावून घेऊ शकत नाही ती म्हणजे परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आपले स्वातंत्र्य, फ्रँकलने निष्कर्ष काढला जगण्याचा अर्थ शोधण्याची इच्छा माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. त्यांनी छळछावणीत आलेल्या अनुभवावरून स्वतःची एक मनोवैज्ञानिक थेरपी विकसीत केली ज्याला 'logotherapy' या नावाने प्रसिद्ध झाली.
तुम्ही म्हणता प्रवाहाच्या विरुद्ध आपण किती काळ टिकणार, कोलमडून पडणार, कोण साथ देणार? मृत्यू पुढे तर एक न एक दिवस सर्वच कोलमडून पडणार आहे, प्रश्न हा नाही आहे की तुम्ही किती काळ टिकणार प्रश्न आहे तुम्ही टिकण्यासाठी जो संघर्ष केला, जो सामना केला तो कसा केला. आणि कोणी कशाला साथ द्यायला हवी आणि का? तुम्ही कोणाकडून ती अपेक्षा तरी का करता?
वेंडरली कोर्डेरियो दे लीमा (Vanderlei Cordeiro de Lima) याच नाव तुम्ही ऐकले असेल 2004 च्या समर ऑलंपिक मध्ये मैराथन पाळण्याच्या शर्यतीत तो सर्वात पुढे होता. ज्या पद्धतीने तो धावत होता ते पहाता स्वर्ण पदक त्यालाच मिळणार यात कोणता संदेह नव्हता. असा मौका जीवनात क्वचित येतो, त्याचे मित्र, परिवार आणि देशासाठी ती खूप मोठी जीत ठरली असती. तो फिनिशिंग लाइन वर पहुचणार इतक्यात दर्शका मधील एक व्यक्ति अचानक त्याच्या समोर आला आणि त्याचा रस्ता अडवला त्या व्यक्ति ने हजारों लोकां समोर जाणीवपूर्वक त्याच्यावर हमला केला. त्यामुळे वेंडरली च्या धावण्यात अवरोध निर्माण झाला. काही सेकांदाचीच घटना होती पण ती घटना वेंडरलीचे ध्यान भंग करण्यास पर्याप्त होती. वेंडरलीची मानसिक आणि शाररीक लयबद्धता तुटली. जी लांब पल्याच्या धावपत्तूसाठी खूप आवश्यक असते.या घड्बडीत त्याचा मागील धावपटू त्याच्या पुढे निघून गेला. वेंडरली आपली धाव कायम ठेवत तीसऱ्या स्थानावर आला आणि त्याने कांस्य पदक प्राप्त केले.
या घटनेत सर्वात अनूठी गोष्ट ही होती ती म्हणजे फिनिशिग लाइन पार करताना वेंडरलीच्या चेहऱ्यावर हास्य होते काही क्षणापूर्वी स्वर्ण पदक पलक झपकन्यापुर्वी त्याच्या हातातून निसटल होत. विचार करून पहा तुमच्या जीवनात कठोर परिश्रम करून तुम्ही एक स्वप्नपूर्तीच्या जवळ पोहचता आणि कोणी अवरोध निर्माण करतो आणि ध्येयाच्या निकट असताना तुमच्याकडून कोणी ते हिरावून घेतो. त्या दिवशी वेंडरलीला स्वर्ण पदक मिळाले असते तर त्याच नाव इतिहासात दर्ज झाले असते. शिवाय त्याला मिळणारा आनंद आणि समाधान तर वेगळच असल असत. ज्याचा हिशोब करता येणार नाही. ध्येयाच्या इतके निकट पोहचल्यावर नियतीने इतकी क्रूर थटा का करावी? तुम्ही असता तर हाच विचार केला असता ना, की काय होणार होत आणि काय झाल? नियतीने माझ्या बाबतीतच अस का कराव ? कदाचित अस ही झाल असत. की वेंडरलीने आपली दौड रोकली असती. आणि त्या व्यक्तिवर खूप क्रोधित झाले असते त्याला मारहाण देखील केली असती. त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली असती. झालेल्या घटनाचा आधार घेऊन ओलाप्म्पिक अधिकार्यांजवळ योग्य निर्णय बदलण्याची विनंती ही केली असती. पण तो सावरला धावला आणि आपली दौड पूर्ण केली. इतक सगळ होऊन देखील त्याच्या होठावर त्या व्यक्ती बद्दल अपमानस्पद शब्द नव्हते. त्याचा प्रती राग नव्हता दोषी व्यक्तीला त्याने असेच जावू दिले. त्याच्या मागे धावणाऱ्या धावपटूला वाईट वाटलं त्याने आपल स्वर्ण पदक वेंडरलीला देवू करण्याची विनंती केली. पण वेंडरली ने ते नाकारल व आपल्याला मिळालेल्या कान्स्पद्कावर समाधान व्यक्त केल. यामुले त्याच सर्वत्र खूप कौतुक झाल. नंतर त्याला बरेच पुरस्कार मिळाले. 2016 ची रियो ऑलंपिकची मशाल त्यानेच प्रज्वलित केली.
धावताना जे अनुशासन अतूट विश्वास आणि आत्मबल जरुरी असत ते सर्व त्याच्याजवळ होत. पण त्याच वेगळ पण यात होत की झालेल्या दुर्भाग्यपूर्ण घटना त्याला विचलित करू शकली नाही. तो देवाला भाग्याला दोष देत बसला नाही. तो तक्रार करत बसला नाही. या घटने नंतर १४ वर्ष झाले लोक २००४ च्या गोल्ड आणि सिल्वर जिंकणाऱ्या धावपटूंना लोक विसरून गेले. पण आज देखील ब्रॉंज मेडल विजेता वेंडरलीला लोक आठवतात.
कोणी तुम्हाला साथ द्यावी ही अपेक्षा का करावी? तुम्ही लोकांना मदत करा त्याचा आनंद घ्या पण कोणी तुम्हाला मदत करायला समोर येत नसेल तर रडत बसू नका, आसमंतात पहा हवा तुम्हाला श्वास देत आहे, जल तुमची तृष्णा मिटवते, पृथ्वी तुम्हाला जीवन देते, आकाश तुम्हला स्थान देत, सूर्य तुम्हाला प्रकाश देतो कोणत्याही मोबदल्याशिवाय, अजून अधिक कोणती साथ तुम्हाला हवी आहे. जे मिळालं आहे त्याचा आनंद घ्या जे नाही त्याचे दुःख उगाळत बसू नका.
सुख दुःख शोधायला कुठे जायची गरज काय? तुम्ही जिथे जाल सोबत तुमचे सुख दुःख तुम्ही घेऊनच जाणार, तुमच्या दुःखाला जर तुमचा स्वभाव कारणीभूत असेल तर तुम्ही कुठेही गेला तर तुमचा स्वभाव तुमच्या बरोबर असणारच त्यामुळे जिथे कुठे तुम्ही आहात स्वतः बदलण्याचा प्रयत्न करा, लोकांनी आपल्याला त्रास देऊ नये, यासाठी लोकांनी बदललं पाहिजे ही अपेक्षा करण्यापेक्षा आपण आपल्यात असा बदल घडवून आणला पाहिजे की त्यांचा त्रास आपणास त्रास वाटला नाही पाहिजे.
दुःखाची झळ परिस्थितिवर नाही तर मनःस्थितिवर अवलंबून असते, कोणी टोचुन बोलल तर मनाला लागत एक वेळ शाररिक पातळीवरचे दुःख व्यक्ती सोसायला तयार होतो, पण मानसिक पातळीवर हे जड़ जात, तुम्हाला कोणी तुम्ही आजारी दिसता अस बोलल तर तुम्हाला राग येत नाही पण कोणी तुम्हाला मानसिक आजार आहे अस म्हंटल तर तुम्हाला राग येतो, कोणी तुमच्यावर शाररीक अत्याचार केले ते एक वेळ तुम्ही त्याला माफ करता विसरून जाता, पण मनावर आघात केले तर तुम्ही प्रचंड अस्वस्थ होता. मन तुमच्या देहाचाच एक भाग आहे, मन तुमच्या इतर इंद्रिया प्रमाणेच एक इंद्रिय आहे. तुमची मनाची एकरूपता इतकी प्रगाढ असती की मनावरील आघात तुमच्यावरच होत आहे अस तुम्हाला वाटत, त्यासाठी तुम्हाला तुमच्या साक्षीवर काम करावे लागेल. साक्षी भाव जितका स्थिर होत जाईल तितके लवकर तुम्ही या प्रश्नातून बाहेर पडाल. शेवटी तुम्ही विचारत आहात पिंजर्यातील पक्षी किती काळ तग धरणार. आपण सर्व पिंजर्यातील पक्ष्या प्रमाणेच आहोत शरीराच्या पिंजर्यात चैतन्याचा पक्षी कैद आहे. पण उदास होण्याच कारण नाही, निद्रेत तुम्ही स्वप्न पाहता की तुम्ही पिंजऱ्यात कैद आहेत, स्वप्नातून जागे होण्याची आवश्यकता आहे. एकदा का जागे झालात तर स्वप्नात बघितलेले काय बंधन आणि काय मुक्ती एकच आहे. जागे व्हा साक्षीत स्थिर व्हा मग न सुख आहे न दुःख न बंधन न मुक्ती, तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही विस्तीर्ण आकाश आहात, तुम्ही असीम आहात. आणि हेच वास्तव आहे.
प्रेम आणि शुभेच्छेसह ... !
मैत्रेय
आत्मकला
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा