गुरुवार, ११ मे, २०२३

316. प्रभु श्रीरामांची वंशावळ...

      हे माहीत नसल्यास माहिती करून घ्या. प्रभु श्रीरामांची वंशावळ : आपल्या पुराणास ठोस ऐतिहासिक पुरावे नाहीत, शेकडो पिढ्यानी मुखोद्गत करून हा ठेवा सांभाळला आहे. त्यावर कालानुरूप संस्कार झाले आहेत, त्यामुळे त्यावर वाद न घालता अधिक माहिती असल्यास ती द्यावी.
०० - ब्रह्मा
०१ - ब्रह्माचा पुत्र मरीची.
०२ - मरीची चा पुत्र कश्यप.
०३ - कश्यप चा पुत्र विवस्वान.
०४ - विवस्वान चा पुत्र वैवस्वत मनु.
       (याच्याच काळात जलप्रलय झाला)
०५ - वैवस्वत मनुचा तिसरा पुत्र इक्ष्वाकु,
       १० पैकी. (याने अयोध्याला राजधानी 
       व इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली)
०६ - इक्ष्वाकुचा पुत्र कुक्षी.
०७ - कुक्षीचा पुत्र विकुक्षी.
०८ - विकुक्षीचा पुत्र बाण.
०९ - बाणचा पुत्र अनरण्य.
१० - अनरण्यचा पुत्र पृथु.
११ - पृथुचा पुत्र त्रिशंकु.
१२ - त्रिशंकुचा पुत्र धुंधुमार.
१३ - धुंधुमारचा पुत्र युवनाश्व.
१४ - युवनाश्वचा पुत्र मान्धाता.
१५ - मान्धाताचा पुत्र सुसंधी.
१६ - सुसंधीचे २: ध्रुवसंधी व प्रसेनजित.
१७ - ध्रुवसंधी चा पुत्र भरत.
१८ - भरतचा पुत्र असित.
१९ - असितचा पुत्र सगर.
२० - सगरचा पुत्र असमंज.
२१ - असमंजचा पुत्र अंशुमान.
२२ - अंशुमानचा पुत्र दिलीप.
२३ - दिलीपचा पुत्र भगीरथ.
       (यानेच गंगा पृथ्वीवर आणली)
२४ - भागीरथचा पुत्र ककुत्स्थ.
२५ - ककुत्स्थचा पुत्र रघु.
       (अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण, पृथ्वीवरचा
       पहिला ज्ञात चक्रवर्ती. म्हणूनच इक्ष्वाकू
       कुळ हे रघुकुळ म्हणुन प्रसिद्ध झाले)
२६ - रघुचा पुत्र प्रवृद्ध.
२७ - प्रवृद्धचा पुत्र शंखण.
२८ - शंखणचा पुत्र सुदर्शन.
२९ - सुदर्शनचा पुत्र अग्निवर्ण.
३० - अग्निवर्णचा पुत्र शीघ्रग.
३१ - शीघ्रगचा पुत्र मरु.
        (याच्या सत्तेने आताचे अरबस्तान 
         मारुधर, मरुस्थान किंवा मरूभूमी
         म्हणून ओळखले जायचे)
३२ - मरुचा पुत्र प्रशुश्रुक.
३३ - प्रशुश्रुकचा पुत्र अम्बरीष.
       (राजाने कायम संन्यस्त असावे
        याचा परिपाठ यांनीच घातला)
३४ - अम्बरीषचा पुत्र नहुष.
       (यांच्यापासुन कुरुवंश सुरु होतो)
३५ - नहुषचा पुत्र ययाति.
३६ - ययातिचा पुत्र नाभाग.
३७ - नाभागचा पुत्र अज.
३८ - अजचा पुत्र दशरथ.
३९ - दशरथचे चार पुत्र
      राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न.
       ब्रह्माच्या ४०व्या पीढ़ीत श्रीराम जन्मले. चाळीस पिढ्यात असं झालं नाही, असं केलं नाही. चाळीस पिढ्या हे वाक्यप्रचार  यातुन जन्माला आले. ज्याने ही माहिती मिळवली त्याला माझे शतश: प्रणाम...

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...