शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या.
भुत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून अजरामर व्हावे.
भुत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून अजरामर व्हावे.
आयुष्य खूप छोटं आहे, भांडत नका बसू
डोक्यात राग भरल्यावर, फुटणार कसं हसू ?
डोक्यात राग भरल्यावर, फुटणार कसं हसू ?
अहंकार बाळगू नका, भेटा बसा बोला.
मेल्यावर रडण्यापेक्षा, जिवंतपणी बोला.
मेल्यावर रडण्यापेक्षा, जिवंतपणी बोला.
नातं आपलं कोणतं आहे, महत्वाचे नाही
प्रश्न आहे कधीतरी, गोड बोलतो का नाही ?
प्रश्न आहे कधीतरी, गोड बोलतो का नाही ?
चुका शोधत बसाल तर, सुख मिळणार नाही.
चूक काय बरोबर काय, कधीच कळणार नाही.
चूक काय बरोबर काय, कधीच कळणार नाही.
काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू.
आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू.
चल निघ चालता हो, इथे थांबू नको.
हात जोडून विनंती आहे, अशी भाषा नको.
दारात पाय नको ठेऊ, तोंड नाही पहाणार
खरं सांगा असं वागून, कोण सुखी होणार ?
सुखाचा अभास म्हणजे खरं सुख नाही.
आपलं माणूस आपलं नसणे दुसरं दुःख नाही.
करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु.
आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू.
एकतर्फी प्रेम करून उपयोग आहे का ?
समोरच्याला आपली आठवण तरी येते का ?
नातं टिकलं पाहिजे असं दोघांनाही वाटावं.
कधी गायीने कधी वासराने एकमेकाला चाटावं.
तुमची काहीच चूक नाही असं कसं असेल?
पारा शांत झाल्यावरच सत्य काय ते दिसेलच.
पण काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू.
आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू.
पारा शांत झाल्यावरच सत्य काय ते दिसेलच.
पण काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू.
आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा