मंगळवार, ९ मे, २०२३

315. नामस्मरण मात्र विसरु नकोस...

 रोज शक्य होईल तेवढा थोडावेळ  नामस्मरण केल्यावाचून राहू नकोस.
परमेश्वर  पाहत आहे  तुला,  नामस्मरण मात्र विसरु नकोस. || धृ  ||

तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील.
त्यांना घाबरून तुझं, उभं राहणं सोडू नकोस.
परमेश्वर  पाहत आहे  तुला , नामस्मरण मात्र विसरु नकोस. ||1||

तुझं कौतुक प्रत्येकाला इथं, रुचेलच असं नाही.
कौतुकासाठी तुझं नांव, सूचेलच असं नाही.
तू मात्र इतरांचं कौतुक, करण्यास  कचरु नकोस.
परमेश्वर पाहत आहे  तुला, नामस्मरण मात्र विसरु नकोस. ||2||

तुलासुद्धा मन आहे, हे माहीत आहे मला.
पण परमेश्वर हृदयात, असताना काय रे कमी तुला.
इतरांना भरभरून देणं मात्र, कधी सोडू नकोस.
परमेश्वर पाहत आहे  तुला, नामस्मरण मात्र विसरु नकोस. ||3||

रडावंसं वाटतं तेव्हां, रडून तू मोकळा हो.
कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हां, लढून तू मोकळा हो.
रडण्यामध्ये मात्र तुझे, कार्य विसरू नकोस.
परमेश्वर पाहत आहे तुला, नामस्मरण मात्र विसरु नकोस. ||4||

तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे, द्यायची गरज नाही.
कुणासाठी तुला कार्य, सोडायची गरज नाही.
परमेश्वर संकल्पासाठी पुढे, चालणं तू सोडू नकोस
परमेश्वर पाहत आहे  तुला, नामस्मरण मात्र विसरु नकोस. ||5||

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...