मोठा झाल्यापासुन बापाला,
कधी मिठी मारून बघितलं आहे का ?
मारून बघा, ह्रुदय स्थिर होऊन जाईल.
कधी मिठी मारून बघितलं आहे का ?
मारून बघा, ह्रुदय स्थिर होऊन जाईल.
मोठा झाल्यापासुन कधी
बापाचा मुका घेऊन बघितला आहे का?
घेऊन बघा, बापाची दाढी गालाला रुतल्यावर,
बापा पेक्षा आपण अजुन छोटच आहे, याची जाणीव होऊन जाईल.
बापाची चप्पल येते म्हणुन कोणी बाप होत नाही,
त्यासाठी आयुष्यभर दुय्यम स्थान घ्याव लागत.
कधी घेऊन बघितलं आहे का दुय्यम स्थान ?
घेऊन बघा, बापाची किंमत कळुन जाईल .
बापाला बुढा, म्हातारा अस म्हणुन बघितल,
साधु लोकांना बाबा म्हंटल,
कधी बापाला बाबा म्हणुन बघितलं आहे का ?
म्हणुन बघा,
खऱ्या संतांची ओळख होऊन जाईल.
बापाचं घरावर नाव नाही,
बापाचं हातावर नाव नाही,
बापाचं छातीवर नाव नाही,
बापाचं गाडीवर नाव नाही,
स्वतःच्या घरात असुन देखील तो परका ,
कधी परका होऊन बघितला आहे का ?
होऊन बघा, बाप किती खंबीर आहे याची जाणीव होऊन जाईल.
आई च प्रेम जास्त आणि बाबाचं कमी अस कधी नसत .
कधी सुर्य आणि चंद्र यांच्यातला साम्य बघितलं आहे का ?
बघुन घ्या, दोघ ही प्रकाश देतात फक्त वेळा वेगवेगळ्या असतात.
बाप फक्त पाया पडण्यापुरता नसतो,
त्याला कधी निरखून बघितलं आहे का ?
निरखून बघा,
ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल....ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते. आपल्या प्रगती व उन्नतीमुळे फक्त आपले "आई-वडीलच " खुश असतात.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा