मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

531. जग काही चांगल्या व्यक्तींमुळे शिल्लक आहे.

 6 वर्षांचा मुलगा आपल्या 4 वर्षांच्या लहान बहिणीसह बाजारात जात होता.
अचानक त्याच्या लक्षात आले की आपली बहीण तर मागे राहिली आहे.
तो थांबला, मागे वळून पाहिले तर त्याच्या लक्षात आले की बहीण खेळण्यांच्या दुकानासमोर उभी असून एकटक दुकानाकडे काहीतरी पाहत होती.
मुलगा परत येतो आणि बहिणीला विचारतो, "तुला काही हवे आहे का?"
मुलगी बोट उंचावून बाहुली दाखवते. 
एक जबाबदार व्यक्तीसारखे भावाने बहिणीचा हात धरून दुकानात आला आणि त्याने बहिणीला बाहुली दिली. बहिणीला खुप आनंद झाला. 
दुकानदार हे सर्व काऊंटरला बसून मोठ्या कुतूहलाने पाहत होता. 6 वर्षाच्या मुलाचा व्यवहारिकपणा पाहून आश्चर्यचकित झाला. 
तो मुलगा आपल्या बहिणीला घेऊन काऊंटरला आला. दुकानदाराला विचारले, "काका, ह्या बाहुलीची किती किंमत आहे?"
दुकानदार एक शांत व्यक्ती होता. त्याने आयुष्यात कितीतरी चढ उतार पाहिले होते. 
दुकानदाराने प्रेमाने आणि आपलेपणाने त्या लहान मुलाला विचारले , तु किती देणार?? 
मुलाने आपल्या खिशातील सर्व शिंपले काढून त्या दुकानदाराला दिले. जे काही वेळापूर्वी बहिणी बरोबर त्या मुलाने समुद्र किनाऱ्यावरून जमा केले होते. 
दुकानदार ते सर्व शिंपले गोळा करून असे काही मोजत होता की, जसे पैसे मोजले जातात. 
शिंपले मोजून झाल्यावर त्याने मुलाकडे पाहिले तर मुलगा बोलला, "काका किती कमी आहे?"
दुकानदार - "नाही नाही, हे तर ह्या बाहुलीच्या किंमतीपेक्षा पण जास्त आहे. जेवढे जास्त आहे ते मी परत देतो. 
असे बोलून दुकानदाराने 4 शिंपले ठेवून बाकीचे त्या मुलाला परत केले. 
मुलाने मोठ्या आनंदाने ते शिंपले खिशात ठेवून बहिणीला घेऊन निघून गेला. 
हे सर्व दुकानदाराचा नोकर पाहत होता. 
त्याने आश्चर्याने विचारले, "मालक ! एवढी महाग बाहुली तुम्ही फक्त 4 शिंपल्याच्या बदल्यात दिली. 
दुकानदार हसत बोलला, " आपल्यासाठी हे फक्त शिंपले आहेत. परंतु हेच त्या 6 वर्षाच्या मुलासाठी खुप मौल्यवान आहे. आणि त्याच्या ह्या वयाला माहित नाही की पैसे कशाला म्हटले जाते?? 
परंतू जेव्हा तो मोठा होईल, आणि त्याला आठवण येईल की, मी शिंपल्याच्या बदल्यात बहिणीला बाहुली घेऊन दिली होती, तेव्हा त्याला माझी आठवण नक्की येईल. 
तो क्षणभर का होईना, विचार करेल हे जग काही चांगल्या व्यक्तींमुळे शिल्लक आहे. 
हीच गोष्ट त्याच्या अंतर्मनात सकारात्मक दृष्टीकोन वाढविण्यास मदत करेल आणि तो देखील एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...