" सोबत कोण आले मॅडम तुमच्या?..." ...लहान मुलाला प्रश्न विचारावा तसे मला डॉक्टर नी विचारले..
" Husband आलेत...मुलांना घेऊन बाहेर थांबले आहेत...."...मी उत्तरले
" त्यांना बोलावून घ्या...मला बोलायचे आहे त्यांच्याशी...."... त्यांनी सांगितले.. आणि मी थोडे गोंधळून त्यांच्याकडे गेले...कारण मी तेवढी mature होते की ते काय असेल तर मला सांगू शकतात...म्हणून मनात धाकधूक वाढली, की असे काय झाले मला की डॉक्टरांना माझ्या नवऱ्याशी बोलायचे आहे.... एवढा मोठा आजार झाला की काय मला? या विचाराने चिंतित झाले मी..
मी त्यांना "मला सांगा" असे बोलले....कारण माझ्यामते काही serious असेल तर माझ्या नवर्याला टेन्शन नको....म्हणून मी request केली. पण तरीही त्यांनी मला सांगण्यास नकार दिला त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना मी call करून बोलावून घेतले. तर घडले असे होते....गेला एक महिना माझा उजवा गुडघा ,उजवा खांदा आणि डाव्या हाताची तर्जनी दुखत होती....मी सर्व अंगावर काढले....तसे पण मला तेवढा वेळ खरच नव्हता की मी डॉक्टर कडे जाईन....आणि सुट्टी दिवशी मुलांना घेऊन जाण्याचे टेन्शन....त्यामुळे मी सहन केले...त्यातूनच जॉब,मुल, घर सर्व पाहत होते. पण गेले दोन दिवस husband आले...त्यांनी माझी अवस्था पाहून मला आज दवाखान्यात घेऊन गेले होते... actually मला चालायला पण त्रास होत होता...पाय वाकवता येत नव्हता....मी मुद्दामून त्यांना मुलांना घेऊन बाहेर जायला सांगितले.....आणि मी एकटीच आत गेले.... पण डॉक्टर पण ऐकायला तयार नाही मग शेवटी ते मुलांना सोबत घेऊन आत आले.
" अच्छा हे कारण आहे तर मॅडम च्या आजाराचे....ही मुलं सांभाळावी लागतात वाटत...."... Husband जसे आले तसे पटकन ते उद्गारले...त्यावर मी उसने हसले....
" हा तर,मला एक सांगा...मॅडम किती टेन्शन घेतात..."... त्यांनी माझ्या नवऱ्याला प्रश्न केला..तसे आम्ही दोघे एकमेकांना पाहू लागलो....
खरतर या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे ही संभ्रमावस्था होती...कारण वरवर पाहता मला कसलेच टेन्शन नव्हते....नवरा बिचारा एकदम छान आहे...आणि सासर चे पण काही tetion नाही....त्यामुळे मी तर एकदम बिनधास्त बोलले...
"नाही हो कसले टेन्शन."...त्याच वेळी same उत्तर माझ्या husband नी दिले....आणि डॉक्टर हसू लागले....
आम्हाला काहीच कळेना...असे काय वागतात हे डॉक्टर असा विचार येऊन गेला माझ्या मनात.पण मी चेहऱ्यावर काहीच दाखवले नाही.....
"नक्की हाडाचे डॉक्टर आहेत ना?.. की मनाचे मी मनाला प्रश्न केला
"मॅडम ना tetion आहे....तुम्ही लाख म्हणा....पण त्यांना मानसिक आणि शारीरिक आरामाची खूप गरज आहे....."...ते हसून बोलले...आणि मला आश्चर्य वाटले...
" नाही हो डॉक्टर....खरच मला कसले टेन्शन नाही..."..मी माझी हार मानायला तयार नव्हते...
वास्तविक पाहता मला दिसताना कसलेच टेन्शन नव्हते....त्यामुळे मी पण एवढ्या ठामपणे सांगत होते....
" कसं आहे ना मॅडम...हल्ली मानसिक ताण इतका नॉर्मल झाला आहे की, तो आपल्याला आहे याचे देखील भान नसते ..... आपण हल्ली त्याशिवाय जगूच नाही असे म्हणायला हरकत नाही.....तसे तुमच्यासोबत तुम्ही रोज वाहत आहात तो मानसिक ताण...."... डॉक्टरांच्या बोलण्याने आम्ही दोघेही भारावलो...खरच का मी टेन्शन खाली वावरते?. असा विचार डोकावून गेला माझ्या मनात.....
"तुम्ही म्हणता ते खरे असेलही पण मला तसे काहीच नाही.... हा मी मान्य करते ,की मला शारीरिक त्रास खूप आहे...दगदग धावपळ खूप असते माझी रोज... पण या मुलांमधून,नोकरीतून सर्व जबाबदारीतून वेळ मिळेल तसे मी स्वतःला द्यायचं पुरेपूर प्रयत्न करत असते....त्यामुळे मला स्वतःला वेळ नक्कीच देते मी..बदलीची काळजी आहे...पण तिची आशा आहे आता...त्यामुळे काहीच नाही मला मानसिक ताण..(माझ्या अहो कडे बोट दाखवून)यांनाही विचारा..."... मी माझा हेका सोडायला तयार नव्हते...त्यावरही ते उपहासात्मक हसले....
" अहो मॅडम....शारीरिक त्रास सुरू झाला की आपोआप मानसिक ताण सुरू होतो....कारण आपण शरीराच्या ,धावपळीतून सुटका कशी आणि कधी होईल याचा विचार करत रात्र घालवतो...कधी कधी या दुखण्याने आपल्याला झोप येत नाही....यामुळेच तर ताण निर्माण होतो ना....मी मान्य करतो, जर तुम्ही म्हणत असाल की काहीच कसलेच टेन्शन नाही तुम्हाला तर यापेक्षा माझ्यासाठी आनंदाची बाब नाही....असेच कायम रहा...कायम हसत....पण मला जाणवले तुम्हाला झोपेची,आरामाची, काळजी घेण्याची आणि टेन्शन कमी करण्याची जास्त गरज आहे...त्यामुळे मी तुमच्या husband ना बोलवायला सांगितले.... "... डॉक्टर शांतपणे समजावत बोलले...मला त्यांचे म्हणणे थोडेफार पटू लागले... आणि थोडी शांत झाले...
" कसे असते ना, स्त्री ही आपल्या वेदना लपवत असते... आता मी फक्त मॅडम ना सांगितले असते तर बाहेर जाऊन तुम्हाला त्यांनी काहीच सांगितले नसते....त्यांनी सर्व मनातच दाबून ठेवले असते.... पण एक जीवनसाथी म्हणून तुम्हाला ही या गोष्टी समजणे आवश्यक आहे....तुम्ही दोघे मिळून यावर उपाय शोधून काढा....जेव्हा मानसिक,शारीरिक ताण कमी होईल,झोप पूर्ण होईल तेव्हाच त्या ठीक होतील...आणि या ठीक राहिल्या तर मुलं चांगली राहतील....नाहीतर याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो....त्यामुळे मी दिलेल्या गोळ्या घेऊन दुखणे कमी होईल पण यावर खरा उपाय तुमचा स्वतः साठी वेळ देणे होय.... आराम करत जा वेळ मिळेल तसा....".... त्यांनी माझ्या नवऱ्याला खूप छान शब्दात समजावून सांगितले आणि मीही प्रभावित झाले त्यांच्या विचाराने.....एक orthopedic असूनही त्यांनी एका मानसोपचार तज्ज्ञ सारखे माझे मन जाणले होते.... धन्य ते डॉक्टर...
पण तिथून माझ्या विचारांचे चक्र फिरले....मी थोडी मागे वळून पाहू लागले....माझा दिनक्रम,माझे काम,माझी दगदग,माझे जेवण,माझी विश्रांती.... सगळे सगळे....आणि मीही अचंबित झाले....मी एकट्या जीवावर काय काय करत होते...आणि आहे....मी नोकरी, मुलं, त्यांचे मूड,त्यांच्या इच्छा...आयुष्यात होणाऱ्या इतर गोष्टी....सगळे एकटी सांभाळते...आणि यात मी स्वतः कडे दुर्लक्ष केले.....मुलगा झोपला नाही की रात्र जागायची आणि सकाळी उठून पुन्हा कामाची सायकल सुरू.... बापरे...खरच मी शारीरिक त्रास सोबत मानसिक ताण घेऊन फिरते....होणारी चिडचिड.... डोकेदुखी..... अंगदुखी...... कधीतरी ताप येऊन गेलेला पण समजत नाही.... कामावर कधी कधी मेंगळणे...थकवा....या सर्व गोष्टी मी कशा लक्षात घेतले नाही?... याचे आश्चर्य वाटले मला.... एक स्त्री म्हणून येणारे ते दुखरे चार दिवस....कधी matter च नाही केले ....कसं काय?.. आणि केले असले तरी मी सहन केले.... अजुन काय काय सहन केले असेल मी?... विचारच नाही करवत....आठवत पण नाही.....पण आज माझे मला guilt वाटले....की मी माझ्या शरीरावर किती अन्याय करते.... माझ्या मनावर दगड ठेवून.... माझ्या भावनांना,इच्छांना मुरड घालून.....सर्व सहन करून....याचा पश्र्चाताप झाला मला....खरच एक स्त्री म्हणून किती काय करत असतो आपण....पण त्यात जास्तीत जास्त सहन करत असतो....ज्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते....पुरुष पण करतात यात काडीमात्र शंका नाही...पण जेव्हा एखादी स्त्री सहन करते त्याला मर्यादा नसतात....ती जन्माला आल्यापासून सहन करत असते....
काहीलोक मला असे भेटले...."डबा धुतला ना की बायकांना काय काम राहत नाही...त्यामुळे घरी न धुता न्यायचा डबा...."...असे एकजण म्हणाले मला
" काही काय? इथून तुम्ही धुवून नेला म्हणून ती काय धुवायची राहणार आहे का?... ती पुन्हा साबण लावून धूनार...काहीपण विचार करता तुम्ही पुरुष लोक...ती तिचे काम बरोबर करते...तुम्हाला वाटते असे...".... मी उत्तरले...
" अहो...खरच मॅडम...आमच्या बायकांना काय काम असते...नुसत्या झोपत असतात घरात...तुम्ही नोकरी करून करता hats off to you....नाहीतर आमच्या बायका......"...लगेच एकजण उत्तरला....मला त्या कौतूकाचा राग आला....का कुणास ठाऊक.....
" खर आहे sir.... घरात काहीच तर काम नसते....सकाळी उठल्यापासून नुसत्या झोपत असतात
त्या ...म्हणून तर हा डबा मिळाला तुम्हाला हातात...नाही का?..ती झोपा काढते म्हणून तर आज मुलं तुम्हाला होम वर्क साठी त्रास देत नाहीत....parents meeting साठी तुम्हाला जावे लागत नाही....तुम्हाला इत्रीचे कपडे ज्या त्या ठिकाणी उपलब्ध होते...हो ना..."... मला राग आला आणि मी थोड्या चढ्या आवाजात बोलले...तर ते सर कुत्सित हसले आणि निघून गेले....
पण मला आज सांगावेसे वाटते...कुणासाठी जगताना आपल्यासाठी पण जगा....मी आज तो विचार करते... आजवर मला वाटायचे मी स्वतःला वेळ नक्की देते....या लिखाणातून आनंद मिळतो मला...पण नाही यामुळे अजुनच मानसिक ताण निर्माण होतो....कोणता?
अपेक्षांचे ओझे....खूप भयानक ....यात मी स्वतःला असे झोकून दिले होते ,की यामुळे माझी झोप अपूर्ण होत राहिली.... प्रत्येकाच्या इच्छेचा विचार करू लागले..आणि स्वतःच्या शरीराची मागणी विसरले....त्याला विश्रांती हवी होती ती देऊ नाही शकले....आणि पूर्वी निरोगी असणाऱ्या माझ्या शरीराला व्याधींनी ग्रस्त गेले....माझे वयच ते काय?.. आणि या वयात काय काय करते मी? आणि कुणासाठी?.. स्वतःसाठी? नाही... मुलांसाठी..... माझ्या कुटुंबासाठी....पण जर डॉक्टर म्हणाले तसे ,मीच नाही राहिले तर?...या घराला, कुटुंबाला कुणाचा आधार?.. आईचे छत्र हरपले तर ते कितीही जुळावले तरी गळतेच....त्यात पूर्वी सारखी माया,प्रेम नाही राहत.... मला एकाने खूप छान सांगितले....एकवेळ कारवाई झाली तरी चालेल....पण तू गाडी सावकाश चालव...नाहीतर लवकर निघत जा...एखादे काम राहू दे...खरच मोलाचा उपदेश आणि तो मी पाळतेच...तुम्ही पण पाळा.. मला एवढेच सांगायचे होते...स्त्री जीवन खूप कठीण आणि सहनशीलतेची कसोटी असते....सहन करा पण मर्यादेपर्यंत.....त्या नंतर उठा....स्वतःच्या मनाची,शरीराची साद ऐका...आणि मस्त रहा....जेवढे जमेल तेवढेच करा..त्यातून आपल्यासाठी वेळ काढा....नोकरी,घर हे गरजेचे आहे...आज जगण्यासाठी पैसा नक्कीच गरजेचं आहे.....पण मर्यादित..पैसा जसे सुख देतो..त्यापेक्षा जास्त दुःख देतो....म्हणून नोकरी सोडून घरी बसा असे मी अजिबात म्हणणार नाही...एकाला दोघांनी हातभार लावणे गरजेचे असते...कधी काय प्रसंग येईल सांगता येत नाही.... जर पैसा कमावणारा नवरा नाही राहिला तर आपले घर कशावर चालणार...त्यासाठी स्त्रीने पण कमावते असले पाहिजे...हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे त्यावरून बोलते...स्त्रीने कमावते असले पाहिजे....हातात काहीतरी कौशल्य असावेच...हल्ली पैसा आहे तर सर्व आहे हेही तितकेच खरे आहे.....त्यामुळे सर्व करता करता आपल्या आवडी निवडी जपा...पण त्यात आपला आराम हरवू नका.. माझ्या सारखा....
मी बघा... काल पोस्ट लिहायला घेतली होती....आज पूर्ण करते....निवांत राहते सध्या...काय करणार.... तन हैं तो मन हैं... मन हैं तो धन हैं....और धन हैं तो सब हैं...शेवटचे वाक्य सगळ्यांना पटेल असे नाही... I know...प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत..माझा खरा अनुभव मी share केला..... जो मला काल आला......त्या डॉक्टरांचे मी शतशः आभार मानते..माझे डोळे उघडण्यासाठी.तिथे मानलेच पण इथेही.
काळजी घ्या...मस्त रहा....खुश रहा....
जीवनात नाती नक्कीच महत्वाची
त्यातील पहिले नाते असावे स्वतःशी
जप सर्व नाती तू, जीव ओवाळूनी
पण तुझे नाते स्वतःशी,घट्ट कर आराम करूनी
तू आहेस तर सर्व नाती आहेत सखी
तुझ्याविना ग राणी, सर्व नाती राहतील सुखी
कर विचार तू जरा,मनाची साद घाल
शरीराला दे विश्रांती, मग निवांत कर धावाधाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा