" चला.. बाहेर व्हा. चालते व्हा माझ्या घरातून... आऊट
कोणाची गरज नाही मला...." एकदम चौधरी काकांच्या आवाजाची पातळी वाढली.. आणि चिरागच्या काळजात भीती उमटली.
10 ऑक्टोबर होता त्या दिवशी. चिरागच्या मावशी चा वाढदिवस. त्याचे औचित्य साधून तिने आई-बाबांना आणि लाडक्या भाच्याला आपल्या दादरच्या हिंदू कॉलनीतल्या घरी बोलवलं होते. तसं म्हटलं तर मावशीचे हे दुसरं लग्न. सात महिन्यापूर्वी लग्न झाल्यानंतर प्रथमच तिने आई-वडिलांना आपल्या नव्या घरी बोलवलं होतं. चिराग चे आणि त्याच्या मावस बहिणीचं दिव्याचं चांगलं जमायचं. दोघे जवळजवळ एकाच वयाचे. म्हणूनच मावशीकडे जायचं म्हटल्यावर चिराग सकाळपासूनच आनंदात होता. दिव्याला काहीतरी द्यायचं म्हणून नवा व्यापार चा नवीन सेट पण त्याने खरेदी करून पॅक करून आणला होता.
पण आता जे काही घडलं ते पाहुण्यांना अनपेक्षित होतं. गेल्या अर्ध्या तासापासून त्यांचं औपचारिक स्वागत करून मावशीचे नवे यजमान जे आत गेले ते बराच वेळ बाहेर आले नव्हते. मग थोड्याच वेळापूर्वी आज स्वयंपाक घराच्या दिशेकडून काहीतरी धुसपुस.. कुरबुर ऐकू येऊ लागली. पण असेल नवरा बायकोचं काहीतरी म्हणून चिरागच्या आजी-आजोबांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
पण आता चिरागच्या या काकांनी चौधरी काकांनी वेगळच रूप धारण केलं होतं. नक्की काय घडलं होतं ते कोणालाच कळलं नव्हतं. पण जे घडतंय ते योग्य होत नाहीये याचा अंदाज सर्वांनाच अगदी लहान चिरागला आणि दिव्याला सुद्धा आलेला होता.
चिरागच्या मीनल मावशीचे पहिले मिस्टर दिव्याच्या जन्मानंतरच एका रेल्वे अपघातात वारले. बँकेत काम करायचे ते. त्यांच्या मृत्यूनंतर चिरागच्या बाबांनी अनेक खटपटी हेलपाटे घालून मावशीला अनुकंपा तत्त्वावर तिच्या मिस्टरांच्या जागेवर नोकरी मिळवून दिली. मावशी मग माहेरी म्हणजे डोंबिवलीला आई-वडिलांबरोबर आणि लहान दिव्याबरोबरच राहायची. बँकेत नोकरी असल्याने पुढचं सगळं निभावून गेलेले इतके दिवस. मग चौधरी काकांकडून मावशीला लग्नाचा प्रस्ताव आला रीतसर. का त्या आधीच मीनल ने चौधरींबरोबर बाहेरच जमवलं कळायला मार्ग नाही.
चिरागची मीनल मावशी होतीच तशी. गोऱ्या वर्णाची, उंची ने चांगली, उफाड्या अंगाची आणि नाकी डोळी नीटसं... टीप टॉप राहणारी, अगदी व्यवस्थित. कोणाही पुरुषाला भुरळ पाडेल असेच व्यक्तिमत्व.. कोणी म्हणणार नाही की एका मुलीची आई आहे म्हणून. संतूर गर्ल्स च्या गटात मोडणारी. चौधरींचे स्थळ पण एकदम चांगलं म्हणावं असं. प्रतिष्ठित कंपनीत मॅनेजर पदावर होते चौधरी. मीनल ला शोभेल अशी उंची, दादरचा हिंदू कॉलनी चा मोठा फ्लॅट, झालंच तर दारात कंपनीने दिलेली फोर व्हीलर... आणि अर्थात चांगली वेतन प्राप्तीची हमी होती.
त्यामुळं मीनल च्या आई बाबांनी सुद्धा आनंदाने होकार दिला आणि चांगल्याशा सुमुहूर्तावर मीनल आणि चौधरींचा विवाह रजिस्टर पद्धतीने झाला. अगदीं बोटांवर मोजता येतील अशी नातेवाईक मंडळी दोन्हीकडून आलेली.
त्यानंतर मात्र दोघांच्या संसारात नेमकं काय घडलं ते तर मावशीला माहीत असेल किंवा आपल्या नव्या घरी राहायला गेलेल्या दिव्याला. सर्वजण तर चला मावशी लग्न होऊन नवीन श्रीमंत घरी राहायला गेली.. सासरी.. सुखातच असणार असं धरून चालले होते.
आता स्वयंपाक घरातल्या भांडणांचा आवाज चांगलाच तापू लागला होता. तशी चिरागच्या घरात पण आई-बाबांमध्ये भांडण होत. आता नवरा बायको मध्ये भांडण जगाच्या पाठीवर कुठे होत नसतील..?? पण घरात तिसरी व्यक्ती मग ती चिरागच्या आईचा भाऊ ..चिरागचा मामा असेल किंवा मग वडिलांची बहिण रंजू आत्या तिच्यासमोर ही भांडणे कधीच होत नसत. पण इथे तर आतील भांडण आता धक्क्याबुक्क्यांवर येऊन पोहोचलेलं.
इतक्यात फाडकन कोणीतरी कानशिलात मारण्याचा आवाज आला आणि थोडा वेळ सगळंच स्तब्ध शांत झालं. मग थोड्या क्षणातच मीनल लालेलाल झालेल्या डोळ्यांनी स्पुंदत .. डोळ्यात अश्रू घेऊन बाहेर आली आणि म्हणाली.
" एक क्षण सुद्धा थांबायचं नाही आपण इथे. माझ्या माहेरच्या माणसांचा अपमान करतो हा माणूस..." असं म्हणून तिने बॅग भरायला सुरुवात केली. आजोबांनी पण आपल्या या नव्या जावयाने घातलेला शिमगा स्वतः च्या डोळ्यांनी पाहिलेला होता.
चौधरी बाहेर आले. थोड्या वेळापूर्वी आजोबांनी दादर च्या डी दामोदर मिठाई वाल्याकडून आणलेली सुतरफेणीची पिशवी त्यांच्या अंगावर भिरकावत चौधरी गुरकावले.
" चालते व्हा.. माझ्या घरातून.. आताच्या आता...".
छोटा चिराग आणि दिव्या, आजी आजोबा मीनल ला घेवून बाहेर पडले. झालेला अपमान गिळत कसेबसे डोंबिवलीला परतले.
" चौधरींच्या नवीन घरात मला स्वातंत्र्य नव्हतं. सगळं काही ते म्हणतील तसेच व्हायला हवं. जरा मनाविरुद्ध झालं तर असहकार.. मग पुढं माझ्यावर चौधरी ओरडू लागले. नव्या नवलाई चे दिवस संपले आणि नजरेत सलू लागला त्यांचा आक्रस्थळे पणा.. क्वचित प्रसंगी मारझोड सुद्धा.. कदाचित ही दुसरं लग्न केलेली बाई... पुरुषाचा आधार हवी असलेली.. कुठं जाणार आपल्याशिवाय असं गृहीत धरलं असणार त्यांनी.." मावशी सांगत असताना चिराग एकत होता.
"चौधरींची पहिली बायको या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना सोडून गेली असणार. माझ्या हे लक्षात आलं तोवर फार उशीर झाला होता. " मीनल म्हणाली.
या नव्या काकाचा राग आला मग चिरागला एकदम. जेमतेम 13.. 14 वर्षाचा होता तो. मोठ्यांच्या गोष्टी त्याला फारशा कळत नसत आणि कळल्या तरी त्यात जास्त नाक खूपसायच नाही अशी त्याच्या आई-बाबांची शिकवण होती.
खरंतर दिव्या परत आजी-आजोबांकडे आली याचा त्याला त्या नकळत्या वयात आनंदच झालेला. दिवाळी तोंडावर आली होती. सहामाही परीक्षा झाली की मग दिवाळीची सुट्टी सुरू व्हायची आणि मग चिराग से आई बाबा त्याला आजोळी पाठवायचे. इतके दिवस दिव्या आजोळी असल्याने त्याला आजोळ चे विशेष आकर्षण होते.
मीनल मावशी चा पण चिराग लाडका होता. दिव्याच्या पाठीवर जर मीनल ला मुलगा झाला असता तर आज चिराग एवढा असता. ज्या दिवशी मावशी दादरच्या चौधरींच्या घराला सोडून आली त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी चिराग - दिव्याला घेवून ती दिवाळीची खरेदी करायला उत्साहानं बाहेर पडली. चिराग ला चांगली नव्या फॅशन ची फुल्ल पँट आणि टी शर्ट... दिव्याला नवीन ड्रेस खरेदी करुन दिला तिने.
दिवाळीचा पहिला दिवस होता. नरक चतुर्दशी. सकाळी साग्र संगीत अभ्यंगस्नान वगैरे करून बाबांनी घेवून दिलेले मोजके फटाके वाजवून झाल्यावर चिराग डोंबिवलीच्या आपल्या आजोळी अंगणात फराळ खात बसला होता. बाजूलाच नवा ड्रेस घातलेली दिव्या त्याच्याशी गप्पा मारत होती. आजी आजोबा, मीनल सगळेच आनंदात होते.
इतक्यात दाराशी मारुती सुझुकी गाडी येऊन उभी राहिली. दिव्याने ओळखलंच की ती गाडी तिच्या नव्याने जीवनात आलेल्या नव्या बाबांची चौधरींची होती. ही गाडी कंपनीने चौधरींना दिलेली. गाडीतून चौधरी उतरले. हातातल्या दोन-तीन मोठ्या पिशव्या सावरत.. ड्रायव्हरला गाडी पार्क करण्याविषयी सूचना देऊन ते गेट उघडून आत आले. आजोबा आजी एकदम गप्प झाले. मगाशी उत्साहात चालू असलेल्या त्यांच्या गप्पा एकदम बंद झाल्या.
" हॅपी दिवाली... सगळ्यांना ..." चौधरी आत येत म्हणाले.
" अरे वा चिराग फटाके उडवले का रे...?? हे घे दिवाळीत चार दिवस- रात्र फटाके वाजवले तरी उरतील एवढे फटाके आणलेत तुझ्यासाठी..." एवढे बोलून हातातल्या फटाक्यांची पिशवी त्यांची चिरागला दिली.
मग दिव्याशी असंच काहीबाही बोलून तिच्याही हातात त्यांनी ड्रेसची पिशवी सोपवली आणि मग ते येताच रागाने तिथून उठून गेलेल्या मीनलच्या पाठून ते आत गेले.
चिराग ने फटाक्यांच्या पिशवीत न राहवून डोकावले.
आत भुईनळे, भुईचक्र, फुलबाजे यांचे मो ठ मोठाले खोके होते. झालं तर लक्ष्मी बॉम्ब, ताजमहाल फटाक्यांच्या मोठयाच्या मोठ्या लडी त्यात होत्या...प्लास्टिकच्या चकचकित आवरणात बंद केलेल्या. ते सर्व पाहून चिराग आनंदित झाला. आतापर्यंत त्याच्या बाबांनी आणून दिलेले मोजकेच फटाके तो चार दिवस दिवाळीचे अगदी पुरवून पुरवून वापरायचा.
आतल्या खोलीत चौधरी मीनल मावशीला विनवत होते. बहुदा पुन्हा घरी चालण्याविषयी.. मीनलचा राग जावा म्हणून कुठल्यातरी सराफा कडून खरेदी केलेला भारी किमतीचा सोन्याचा दागिना सुद्धा देवू केला होता त्यांनी.
पण मीनल मात्र आपल्या निर्णयावर ठाम दिसत होती.
" कशाला आलात पुन्हा इथं..?? मी एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतला . " शांत आवाजात मीनल म्हणाली.
" कमॉन मीनल... तुला माहित आहे.. चार दिवस मी कंपनीच्या टेन्शनमध्ये होतो. त्याभरात मी तुला आणि तुझ्या आई बाबांना नको नको ते बोललो. मला क्षमा कर आणि आता दादरला परत चल." चौधरी गयावया करत होते.
" अजिबात नाही. झालेला अपमान विसरण्या इतकी मी खुळी नाहीये. बरं झालं.. तुम्ही म्हणत होता तशी माझी बँकेतली नोकरी सोडून बसले नाही. खरंच बाईला एक वेळ नवरा नसला तरी चालेल, पण नोकरी मात्र हवीच." मीनल ने निक्षून सांगितलं.
" अग नोकरीच तर सांगतो तुला... मला आता मॅनेजर पदावरून संचालक पदावर घेतलंय. प्रमोशन झालंय माझं. जन्मभर तुला आणि दिव्याला सुखात ठेवू शकतो मी." चौधरी यांनी आपली बाजू मांडली.
" हे बघा चौधरी मी पुन्हा सांगते आणि शेवटचं सांगते. मी तुमच्यावर घरात मारझोड केली.. घरगुती हिंसाचार आणि छळ केला म्हणून तुमच्यावर खटला दाखल करत नाहीये हा मोठा दिलासा समजा. नाहीतर तुमचं नवे मिळालेलं संचालक पद तर सोडाच नोकरी जाऊन घरी बसायची पाळी येईल तुमच्यावर...." मीनल तिच्या निर्णयावर अगदी ठाम होती.
" तुझा निर्णय अंतिम आहे..??" चौधरींनी निर्वाणीचे विचारलं.
"अगदी शंभर टक्के. माझं आणि दिव्याचं बघायला मी अगदी समर्थ आहे." मीनल म्हणाली.
चौधरी पडक्या चेहऱ्याने खोली बाहेर आले. कोणाकडे न पाहता सरळ तरातरा चालत गाडीत जाऊन बसले आणि ड्रायव्हरला गाडी चालू करायला सांगितली.
आजोबांनी आजीकडे पाहिलं. इतकी वर्ष संसार केल्यामुळे आजीला त्यांना नेमकं काय म्हणायचे ते त्यांची नजर पाहून समजलं. ती लेकीकडे गेली.
" मिने... तुला खरंच तुझ्या निर्णयाचा फेरविचार करायचा नाहीये..??" आईच्या मायला त्यांनी मीनलला विचारलं.
" आई... कोणत्या बाईला आपल्या जीवनात स्थैर्य सुरक्षितता हवीशी वाटत नाही?? मलाही वाटली म्हणून तर चौधरींचा विचार केला मी. अर्थात त्यांचं मोठं पद, देखणं रूप , घरदार, श्रीमंती याची भुरळ पडली मला. ती मी अजिबात नाकारत नाही."
" पण मग लग्नानंतरच्या काही दिवसातच चौधरी नेमके कसे आहेत ते कळू लागलं. अगं रात्री आपला कार्यभाग ओळखून झाल्यावर आपला लंगोट देखील मला उचलायला लावायचा हा. बायको म्हणजे पायपुसणं वाटायचं याला. पैसे मिळवून आणतोय ना... मग मी गुलामा सारखं याच्यासाठी राबावं ही याची अपेक्षा. त्यातूनच पुढे आमचे खटके उडू लागले."
"पहिले काही दिवस नवीन लग्न आहे ,चौधरींच्या स्वभावाशी जोडून घेतलं पाहिजे म्हणून मी गप्प बसले. पण मग नंतर कधी भाजीच मीठ कमी, बटाटे जास्तच करपले, एखाद्या गोष्टीचा विसर पडला या साध्या गोष्टीवरून सुद्धा मला टोमणे मारू लागले... आईबाप काढू लागले. माणूस मोठा झाला की त्याचा अहंकार पण मोठा होतो का...??"
" तुम्ही आलात त्या दिवसाआधी चार-पाच दिवसापासून कंपनीतल्या संचालक पदाचा विचार डोक्यात घेऊन बसलेले चौधरी. त्या गडबडीत त्यांचा अहंकार दुखावला गेला मध्येच अशाच बारीकशा कारणावरून आणि आपल्याला घराबाहेर काढण्याचा प्रकार झाला.... पण झालं हे एका अर्थी बरंच झालं. त्याचा निमित्त झालं आणि त्या माणसाला सोडायचं धैर्य माझ्यात आलं."
" थोड्याच दिवसात माझी बदली होणारे पुण्याला.
दिव्याला घेऊन मी पुण्याला जाईन राहायला.." मीनलने बोलून संपवलं.
इतक्यात गेटवर "कचराय. SSS.. "असा पुकारा झाला. गेटवर त्यांच्या विभागाचा कचरा नेणारा जितू कचरावाला आला होता. कचऱ्याचा डबा देण्याची जबाबदारी चिराग आजोळी असताना स्वतःहून घेत असे.
आजोबांनी कचरा घेऊन जाणाऱ्या जितूला दिलेली दिवाळी जितूला देताना आपल्याकडे असलेली फटाक्यांची पिशवी जितूच्या बरोबर आलेल्या त्याच्या लहानग्या पोराला दिली.त्या लहानशा पोराच्या चेहऱ्यावरचा आनंद चिराग निरखून पाहत होता बराच वेळ.

# योगेश साळवी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा