शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

912. सकारात्मक रस्ते

      गजानन अश्विनी च लग्न 22 एप्रिल 2014 ला झालं, दोन वेळेस गर्भ खराब झाल्यावर तिसऱ्यांदा अश्विनी ला दिवस होते, गजाननचा अभ्यास जोरात चालू होता त्याला वाटायचं आपण खूप माहिती मिळवून आपल्या बाळाला देऊ त्याच स्वप्न होतं माझा मुलगा किंवा मुलगी अलबर्ट आईन्स्टन एवढे हुशार असले पाहिजे त्या साठी तो दररोज तंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, धर्मशास्त्र, माणसशास्त्र, अर्थशास्त्र, न्यूरो सायन्स, संगणाकाचे प्रोग्राम, जगप्रसिद्ध महान लोकांच्या जीवनकथा वाचणे, याचा तो आठ तास अभ्यास करायचा, त्याच म्हणणं होतं मी नाही शिकू शकलो पण माझं लेकरू जगात टॉप मध्ये असेल.
     अखेर ती वेळ आली 21 ऑक्टोम्बर 2018 ला सकाळीच अश्विनी ला पोट दुखत असल्याने तिच्या माहेरच्यानि हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले, अश्विनीला दुपारी 12 : 35 ला डिलीवरी रूम मध्ये नेण्यात आलं. तेव्हा गजानन मेहकरला त्याच्या मेडिकल शॉप मध्ये होता, 12 : 50 ला अल्फ्रेड नोबेल च्या जन्मदिनाच्या दिवशीच अश्विनी ने मुलाला जन्म दिला, सगळीकडे आनंद च आनंद होता, अश्विनीच्या वडलांनी गजाननला कॉल करून ही आनंदाची बातमी सांगताच गजानन ने त्याच्या मित्राला पाच किलो पेढा आणायला पाठविले.
     पण बहुतेक नियतीला हा आनंद मंजूर नव्हता.
  डॉक्टर डिलिवरी रूम मधून बाहेर येउन अश्विनीच्या वडलांना म्हणाले _
    “खूप प्रयत्न करून ही बाळ रडत नाही, बाळाला ताबडतोब मोठ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं लागेल बाळ स्वतःहून ऑक्सिजन ही घेत नाही आणि त्याला त्याला झटके ही मोठ्या प्रमाणात येत आहेत.”
  अश्विनीच्या वडलांनी लगेच गजानन ला कॉल करून ही गोष्ट कळवताच गजानन ने बाळाला घेऊन मेहकर ला घेऊन यायला सांगितले, मेहकर मध्ये बाळाला मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलं, तिथल्या बालरोग तज्ञाने बाळाला तपासून गजाननअश्विनी ला सांगितले_
   “हे बघा बाळ जन्माला येउन एका तासा पेक्षा जास्त वेळ होऊन ही बाळ रडत नाही, त्याला मोठ्या प्रमाणात झटके येत आहेत, झटक्याची तीव्रता खूप जास्त आहे, मी प्रयत्न करून पाहतो पण बाळ राहण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि सरळ सांगायचं म्हणजे बाळ राहण्याची शक्यता काहीच नाही.”
एवढं बोलून डॉक्टर चालल्या गेले पण अश्विनी रडायला लागली गजाननचे क्षणात स्वप्न काचा सारखे तुटले, अश्विनी रडत रडत म्हणाली_
“देवाने आपल्याच सोबत असं का केल असेल, आता मी काय करू”
कपाळाला हात लावून अश्विनी रडत रडत खाली बसली तिला काहीच सुचत नव्हतं, गजानन NICU च्या दरवाज्याच्या काचातुन त्याच्या बाळाला पाहत होता त्याला बाकीचे NICU मधील बाळ काही रडणारे, हातपाय हलवणारे बाळ दिसत होते, मात्र त्याच बाळ हात पाय ही हालवत नव्हतं आणि रडत ही नव्हतं. गजानन विचार करत होता ‘मी गरिबांना मदत केली, माझ्या डोळ्या समोर कधीच कोणाचं लेकरू नाही रडू दिल, मी अनाथ आश्रमात जाऊन लेकरांचे लाड पुरवले, जेव्हा मी मजुरी करत होतो तेव्हा ही आणि आज ही मी अनाथ आश्रमाला जास्तीत जास्त दान करतो, कोणी माझा दारात मागायला आलेल्याला मी कधीच खाली हात नाही पाठवल, देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवल्याचे हेच परिणाम आहेत तर आज पासून देव देवळात आणि जीवन भर मी माझं आयुष्य स्वतःच्या मनगटावर आणि मेंदूवर विश्वास ठेऊनच जगेल. मला देवाची गरज नाही. माझ्या बाळाला मी काही ही होऊ देणार नाही ‘
असं स्वतःलाच म्हणतं त्याने स्वतःचे न कळत आलेले अश्रू स्वतःच पुसले. आणि अश्विनीला म्हणाला_
“रडू नकोस काही नाही होणार आपल्या बाळाला.”
अश्विनी आणि गजानन सोबत आलेला प्रत्येक व्यक्ती दुःखी होता, गजाननचे सर्व मित्र जमा झाले, डॉक्टर गजानन चे एवढे मित्र पाहून गोंधळून गेला, डॉक्टर ला भीती वाटत होती कि बाळाची तब्बेत तर अतिशय नाजूक आहे जर अचानक बाळ दगावल्या गेलं तर हॉस्पिटल मध्ये धिंगाणा होऊ शकतो,
       दुसऱ्या दिवशी सकाळीच मल्टि हॉस्पिटल मधल्या मेडिकलचे मालक गजाननचा मित्रच होते ते गजानन जवळ घाबरत येउन म्हणाले _
“गजू आपल्या बाळाचे झटके वाढतच आहेत.”
गजानन ने लगेच संभाजीनगर ला बाळाला नेण्याचा निर्णय घेतला, मोहनला मेडिकल मध्ये पाठवलं, कैलाशला ऑक्सिजनवाली रुग्णवाहिका बोलवायला सांगितली, श्रीधरला मेडिकल मधून पैसे आणायला सांगितले आणि रवीला त्याच्या सोबत संभाजीनगरला यायला सांगितले. सर्वांनी आप आपले कामं ताबडतोब केले. लगेच गजानन बाळाला घेऊन सोबत रवी,  अश्विनीचे आई वडील संभाजीनगर ला निघाला, कारण मेहकर पेक्षा तज्ञ डॉक्टर संभाजीनगरला आहेत.
     हवेच्या वेगा सारखी ऑक्सिजन सहित ऍम्ब्युलन्स संभाजीनगरच्या दिशेने धावत होती, ऍम्ब्युलन्स ही गजानन च्या मित्राचीच होती, दोन तासात ऍम्ब्युलन्स अमृत हॉस्पिटल च्या गेट समोर उभी करून हॉस्पिटल मध्ये चौकशी केली असतात तिथल्या हॉस्पिटल मधल्या NICU मध्ये एकही बेड रिकामं नसल्याच कळालं, लगेच ऍम्ब्युलन्स तिथून पाच मिनिटात महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल (MGM) च्या गेट समोर उभी राहली गजानन ने चौकशी केली तर कळालं तिथे ही NICU मध्ये एकही बेड खाली नाही, ऍम्ब्युलन्स वाल्याने_ ‘विचारलं आता कुठे”
गजानन म्हणाला “हेडगेवार हॉस्पिटल”
परत ऍम्ब्युलन्स सायरन वाजत हेडगेवार हॉस्पिटल च्या दिशेने धावत होती, थोड्याच वेळात ब्रेक चा आवाज करत ऍम्ब्युलन्स हेडगेवार हॉस्पिटल च्या गेट समोर उभी राहिली, गजानन उतरून पळत हॉस्पिटल मध्ये गेला चौकशी केली तर तिथल्या ही डॉक्टर ने सांगितले_  “सध्या तरी एक ही NICU मध्ये बेड खाली नाही”
परंतु तेवढ्यात टेबल फोन वाजला आणि ‘सांगण्यात आलं कि NICU मधल्या एका बाळाला सुट्टी होतं आहे त्याची डिस्चार्ज ची फाईल तयार करा.’
लगेच त्याच डॉक्टर ने गजाननला दिला – “भाऊ एक बेड रिकामा होतं आहे तुम्ही तुमच्या बाळाला आत घेऊन येऊ शकता.”
गजानन ला थोडं बर वाटल, बाळाला बेडवर टाकून त्याला तपासल्यावर डॉक्टर म्हणाले_
“तुमचं बाळ खूप जास्त सिरीयस आहे, त्याला अतिशय मोठ्या प्रमाणात झटके येत आहेत, झटक्याची तीव्रताही खूप जास्त आहे, बाळ ऑक्सिजन खूप कमी प्रमाणात घेत आहे, सुदैवाने अजून बाळ जिवंत आहे पण वाचायची शक्यता काहीच नाही कारण एक पूर्ण दिवस गेला अजून बाळ थोडं ही रडलं नाही, तुम्ही हॉस्पिटल मध्ये पैसे खर्च करून काही उपयोग होणार नाही कारण या बाळाचं आयुष्य एकदम थोडकच आहे जास्तीत जास्त तीन चार दिवस ते ही हॉस्पिटल मध्ये ठेवलं तर त्या पेक्षा तुम्ही याला घरी घेऊन जा कारण जर आपण याला वाचवून ही काही उपयोग नाही जर हा सुदैवाने वाचला ही तरीही याच्या मेंदूची वाढ होऊ शकणार नाही, आयुष्य भर अपंग राहील, जसे कि कधीच बोलू शकणार नाही, त्याला काहीच समजू शकणार नाही, तो स्वतः वरून काहीच करू शकणार नाही, आणि त्याच आयुष्य हे तुमच्या साठी खूप त्रास दायक राहील आणि सोबतच पैसे ही लाखो रुपये खर्च होतील, तर तुम्ही पाच मिनिटात विचार करून मला सांगा”.
गजाननने खूप कठीण परिस्थितीत स्वतःला सावरले आणि अचानक गजाननला स्टिफन हॉकिंग ची आठवण आली त्याचा मनात विचार आला ‘जर स्टिफन हॉकिंग ला डॉक्टर ने ‘तू फक्त दोन वर्षच जगू शकतो’ सांगून ही तो आणखी तिथून समोर तो 56 वर्ष जगू शकतो आणि आणि अपंग असतांना ब्रह्मांडचे रहस्य उलगडू शकतो तर माझा मुलगा ही अस करू शकतो,’ आणि त्याने निश्चय केला कि माझा मुलगा ही स्टिफन हॉकिंग प्रमाणेच होणार,’
गजानन लगेच डॉक्टर जवळ जाऊन म्हणाला _
“सर मला तुम्ही सांगितलेलं सर्व गांभीर्य कळालं पण तुम्ही माझ्या बाळाला वाचवा, समोर जसं ही माझं बाळ होईल त्याला मी सांभाळायला तयार आहे.”
गजाननच बोलणं ऐकून डॉक्टर नर्स ला म्हणाले_ ” सिस्टर बाळाला ऑक्सिजन लावून NICU मध्ये घ्या”.
बाळाला NICU मध्ये ऍडमिट करण्यात आलं. NICU च्या बाजुला एका डॉक्टर च्या कॅबिनमध्ये अश्विनी आणि गजानन ला बसवन्यात आलं, 10 मिनिटाने एक डॉक्टर आणि एक लेडीज डॉक्टर आत आले. डॉक्टर खुर्चीवर बसत म्हणाले_
“मी तुमच्या बाळाचा डॉक्टर, डॉक्टर परळीकर आणि ह्या लहान बाळाच्या मेंदूच्या डॉक्टर वैद्य मॅडम.”
लगेच वैद्य मॅडम म्हणाल्या_
” आम्ही तुमच्या बाळाला तपासल त्यांची तब्बेत खूप नाजूक आहे, वाचायची शक्यता काहीच नाही तरी ही परळीकर सर प्रयत्न करतील, पण बाळ दगावण्याची जास्त शक्यता आहे, बाळाला उपचारा दरम्यान खूप जास्त खर्च लागणार, बाळाला वाचू ही शकले तरी तुम्ही काही बाळा कडून अपेक्षा ठेऊ नका, कारण तो भविष्यात बोलू शकणार नाही, चालू शकणार नाही, त्याच सर्व तुम्हालाच कराव लागेल, तो स्वतः वरून काहीच करू शकणार नाही.”
एवढं सर्व ऐकत असतांना अश्विनीच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या, कॅबिन मध्ये एका मिनिटात साठी शांतता तयार झाली, ती शांतता डॉक्टर परळीकरने तोडली ते म्हणाले _
“अजून ही तुम्ही बाळाला घरी घेऊन जाऊ शकता, अजून त्याची ऍडमिशन ची फाईल तयार केलेली नाही, पण निश्चित राहा त्यावर उपचार चालू आहेत, बाळ वाचवून तुमचं नुकसान आहे, एक तर खूप जास्त पैसा जाणार, तुम्हाला त्याला आयुष्य भर एखाद्या दोन तीन महिन्याच्या बाळा सारखंच सांभाळावं लागणार, त्याची अवस्था तुम्हाला पाहवल्या जाणार नाही त्या मुळं तुमचं मानसिक नुकसान होणार.”
एवढ्या वेळ गप्प बसलेला गजानन स्वतःच दुःख दाबत म्हणाला_
“मला सर्व डॉक्टर्स हेच सांगत आहेत कि बाळाची तब्बेत नाजूक आहे, पण सर  माझी तुम्हाला विनंती आहे कि तुम्ही माझ्या बाळाला वाचवण्याचे 100% प्रयत्न करा मला खात्री आहे, तुम्ही जर तुमचे 100% प्रयत्न केले तर माझं बाळ वाचू शकते आणि तुम्ही पूर्ण प्रयत्न करून ही माझं बाळ दगावल्या गेलं तर मी तुम्हाला तरी ही धन्यवाद म्हणून मी माझा बाळाचं प्रेत घेऊन जाईल ते ही तुम्हाला कुठला ही प्रश्न न विचारता, न कुठला आरडा ओरडा करता आणि राहिला प्रश्न हॉस्पिटल चार्जसचा तर ते मी दररोज च्या दररोज कॅश कॉउंटर जमा करत राहील,  तुम्ही फक्त माझं बाळ वाचवा सर.”
एवढं ऐकून डॉक्टर परळीकर लंबा श्वास सोडून म्हणले _
“मिस्टर हाडे मी माझ्याकडून तुमच्या बाळाला वाचवण्याचा 100% प्रयत्न करतो, शेवटी जे होईल ते पाहू मग.”
गजानन त्यांना “धन्यवाद ” म्हणून अश्विनी ला घेऊन कॅबिन च्या बाहेर आला.
गजानन अश्विनि कॅबिनच्या बाहेर निघताच अश्विनि रडायला लागते, गजानन पाहतो आस पास चे लोक तिच्याकडे पाहायला लागले, अश्विनिच दुःख गजाननला पाहवल्या नाही गेलं, गजानन अश्विनिच्या एकदम समोरा समोर उभा राहिला, स्वतः दुःखाचा डोंगर गिळत त्याने तिला मिठीत घेतले, तिच्या डोख्यावरून हात फिरवत म्हणाला _
“रडू नकोस, तू असच रडत राहशील तर मला ही राहवल्या जाणार नाही, आपल्या बाळाला काही ही होणार नाही, थोड्याच दिवसात आपलं बाळ ठीक होतं मग त्याला घेऊन आपण आपल्या घरी घेऊन जाऊ, जर त्याच्या अपंगत्वाचा विचार करत असशील तर तो आयुष्य भर अपंग राहणार नाही, मी तुला वचन देतो कि आपलं बाळ बोलेल ही, चालेल ही, आणि नॉर्मल लेकरा सारखं खेळेल ही.”
अश्विनिस्वतःला सावरात म्हणाली _
“असं होऊ शकते “
गजानन तिला आत्मविश्वासाने म्हणाला_
“हो मी असल्यावर काही ही होऊ शकते, विश्वास आहे न तुला माझ्यावर.”
ती दुःख गिळत  “हो”  म्हणाली.
गजानन तिला स्वतः पासून दूर करून तिचे अश्रू पुसत म्हणतो_
“आज पासून रडायचं नाही, जसे संकट येतील त्यांना दोघांन मिळून तोंड देऊ.”
ती मान हलवत हो म्हणाली,
आणि खरंच अश्विनि पुन्हा कधीच रडली नाही, जेव्हा तिला बाळा साठी प्रश्न पडायचे तेव्हा गजानन जवळ येउन उत्तरे मिळावायची.
      गजाननने आजू बाजूला पाहले लोक अजून ही त्यांचा कडेच पाहत होते तेवढ्यात एका आजोबाने गजाननच्या खांद्यावर हात ठेवला गजाननने लगेच वळून पाहाले त्या आजोबांचे डोळे ही पानावलेले होते, आजोबा म्हणाले _
“बाळा तुमच्या दोघांन मधला समजूतदार पणा पाहून मला खूप आनंद झाला, असेच समोर ही रहा, विश्वास ठेवा तुमचं बाळ निश्चितच ठीक तर होईलच पण भविष्यात खूप मोठा व्यक्ती असेल.”
एवढंच बोलून आजोबा तिथून गजाननच्या खांद्याला थापटून चालल्या गेले, गजानन त्यांना पाहताच राहिला.
डॉक्टर परळीकर दिवसभर व्यस्थ असल्याने ते दिवसातून फक्त पाच मिनिटाचा वेळच पेशंट च्या नातेवाईकांना द्यायचे, आपलं सर्व ज्ञान पणाला लावून ते स्टिफनला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले, दुसऱ्या दिवशी ही स्टिफनवर औषधी चा काहीच फरक पडत नव्हता, तिसऱ्या ही दिवशी स्टिफनचे झटके आटोक्यात यायला तयार नव्हते, मग चौथा दिवस उजाडला, चवथ्या दिवशी डॉक्टर ने सांगितले_ “बाळाचे झटके आटोक्यात आले आहेत.”
स्टिफनच्या आई वडालाच्या आनंदाला सीमा नाही राहली, सगळीकडे आनंदाचे वातावरण तयार झाले, पाचव्या दिवशी स्टिफनने आईच दुध ही पिलं, अश्विनीने रडत रडत बाळाच्या डोख्यावरून हात फिरवला, तिच्या साठी तो क्षण स्वर्ग सुखा पेक्षा जास्त आनंद देणारा होता, आज तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते, तिने हळूच स्टिफनच्या कपाळावर होठ टेकवून त्याची पप्पी घेतली. डॉक्टरने आठव्या दिवशी स्टिफनचा एम आर आय केला तर डॉक्टर आश्चर्य चकित झाले, एम आर आय रिपोर्ट खूप खराब असतांना ही स्टिफनच्या तब्बेतीत सुधार होतंच होता, रिपोर्ट नुसार स्टिफनच जिवंत राहणं हे एक मोठं आश्चर्यच होतं, नऊव्या दिवशी स्टिफनच्या कानाची तपासणी केली तर कानाचा रिपोर्ट एकदम नॉर्मल आला,  स्टिफनच्या रिपोर्ट नुसार त्याला ऑक्सिजन ची खूप मोठी कमतरता होती पण स्टिफन त्याला लागतो तेवढा ऑक्सिजन बाहेरच्या हवेतून घेऊ शकत होता, दहाव्या दिवशी डॉक्टर परळीकर ने सांगितले,
“तुम्ही बाळाला नियमित औषधी देत रहा, हळू हळू त्याच्या तब्बेतीत सुधार होत राहील, आता तो ठीक आहे, फक्त रडत नाही, पण जेव्हा त्याच्या मेंदूला पूर्ण पणे ऑक्सिजन पोहोचायला लागेल तेव्हा तो रडेल ही, आता तुम्ही याला प्रत्येक महिन्याला फक्त चेक करायला माझ्या कडे घेऊन यायच, बाळाला उद्या सुट्टी देण्यात येईल.”
एवढं ऐकून गजाननने डॉक्टर परळीकरचे चरण स्पर्श करून ‘धन्यवाद’ म्हणाला.
बाळ सव्वा महिन्याचं झाल्यावर गजाननने बाळाचं नाव स्टिफन ठेवलं, स्टिफन तीन महिन्याचा झाल्यावर डॉक्टर परळीकर ने त्याला डॉक्टर माधवी शेळके कडे न्यायला सांगितलं, शेळके मॅडम संभाजीनगर मधल्या चांगल्या न्यूरो फिजीशियन आहेत, त्यांनी स्टिफनला तपासून झटक्याच्या चाचणी केली तर झटके येणे बंद झालेले होते, त्यांनी झटक्याचं औषध टॅपिंग डोस नुसार बंद करायला सांगितलं, तिथेच फिजिओथेरपी साठी मोना मॅडम होत्या त्या प्रत्येक महिन्याला स्टिफनला बोलावून त्याच्या आई वडलांना काही फिजिओथेरपी च्या पद्धती सांगून घरी करायला सांगायच्या त्याचे फलस्वरूप स्टिफन वस्तू पकडायला शिकला, हातावर रांगायला शिकला, त्याच्या आवडी निवडी तयार झाल्या, आता तो बोट धरून बसू शकतो, उभा राहू शकतो, त्याला भूक लागली कि तो आई कडे जातो, जेवण झाल्यावर खेळायला वडलाकडे जातो, आणि रात्रीला तर झोपायला आजीचं पाहिजे कारण आजी गाणे म्हणत झोपी घालते, थोडक्यात सांगायचं झालं तर आता तो हळू हळू मानसिक रित्या आणि शारीरिक रित्या सक्षम होयाला लागला आहे.
      स्टिफनच्या वडलांनी घेतलेले निर्णय आणि डॉक्टर परळीकर यांनी घेतलेली मेहनत याच्या वरून आपल्याला लक्षात येते कि जेव्हा आपल्याला असं वाटत आपले आशेचे सर्व दारे बंद झालेले आहेत तरी ही आयुष्यात आलेल्या अडचणी वरून हार स्वीकारायची नाही, प्रत्येक गोष्टी जशी नाकारत्मक दिसते तसेच तिला सकारात्मक रस्ते ही असतातच फक्त आपल्याला ते शोधून काढायचे असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...