मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

903. मरणं तेवढं बाकी आहे....

 पेला पुरता भरु नकोस.
पिणे थोडे बाकी आहे.
तार सुरांची छेडू नकोस. 
सप्तसुर आळवणे बाकी आहे.

भेट तुझी घडवू नकोस. 
झुरणे विरहात बाकी आहे. 
प्रेम तुझे देऊ नकोस. 
मर्यादा ओलांडणे बाकी आहे.

विरह अग्नी विझवू नकोस.
जळणे थोडे बाकी आहे. 
फुंकर तुझी मारु नकोस. 
कोळसा होणे बाकी आहे.

कोणतेही सुख देऊ नकोस.
दुःख उगाळत बसणे बाकी आहे.
गोड उगीच बोलू नकोस.
आठवणी कडू होणे बाकी आहे.

माझं मन कधी ओळखू नकोस.
आयुष्यभर साथ देणे बाकी आहे.
ताक फुंकून पिऊ नकोस.
गरम दुधाने ओठ जळणे बाकी आहे.

गर्व उगीच करु नकोस.
गर्वहरण होणे अजुन बाकी आहे.
मनावर जखमा करु नकोस.
विस्मृतीचे टाके घालणे बाकी आहे.

बंधनात बांधून ठेऊ नकोस.
ऋणानुबंध जपणे अजुन बाकी आहे.
या जन्मी भेटायचं ठरवू नकोस.
साताजन्मांचं अजुन बाकी आहे.

आयुष्य बाकी आहे अजुन.
कोण दिवस कसा येईल.
खुप सारं काही बाकी आहे.
कमी पडतय असं काही म्हणू नकोस.
मरणं तेवढं बाकी आहे.
   
 -संजय पांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...