1) OLFACTORY NERVE : –
2) OPTIC NERVE :-
3) OCULOMOTOR NERVE :-
4 ) TROCHLEAR NERVE :-
5 )TRIGEMINAL NERVE :-
6) ABDUCENS NERVE :-
7 ) FACIAL NERVE :-
8) VESTIBULOCOCHLEAR NERVE :-
9) GLOSSOPHARYNGEAL NERVE :-
10 ) VAGUS NERVE :–
11 ) ACCESSORY NERVE :-
12) HYPOGLOSSAL NERVE :-
क्रिनियल नर्व ह्या बारा प्रकारच्या असतात. ह्या नर्व मानवी शरीराचा महत्वाचा भाग आहे, कारण ह्या नर्व आपण स्वतः च करू शकतो आशा बऱ्याच गोष्टीमध्ये भाग घेतात जसे की पाहणे, खाणे आणि या सारख्या बऱ्याच गोष्टी, ह्या नर्व मेंदूत किंवा ब्रेनस्टेम मधून निघतात आणि जोड्यामध्ये अस्थित्वात असतात. ते डोके आणि मानेच्या वेगवेगळ्या अवयवांना रक्त आणि पोषण पुरवतात वॅगस मज्जातंतु वगळता त्यांचे कार्य वेगळे असते. 12 क्रिनियल नर्व मधून सेरेबेलम मधून निघणाऱ्या दोन नर्व असतात. (1) ALFACTORY (2) OPTIC आणि उर्वरित दहा नर्व ह्या ब्रेनस्टेम मधून निघतात. बारा प्रकारच्या नर्व ह्या पुढील प्रमाणे आहेत.
1) OLFACTORY NERVE : –
OLFACTORY NERVE म्हणजे वासाच्या जसे की सुगंध दुर्गंध ह्या संवेदना. ही नर्व वासाशी आणि नाकाशी संबंधित आहे. ही नर्व बाकीच्या नर्वच्या तुलनेत सर्वात लहान आहे. ह्या नर्व मध्ये काही बिघाड झाल्यास आपल्याला वास घेण्यास अडथळा येतो.
2) OPTIC NERVE :-
OPTIC NERVE ही नर्व पाहण्याशी संबंधित आहे. ही नर्व डोळ्याच्या डोळ्यातील पडद्या पासून मेंदू पर्यंत व्हिज्यूअल माहिती ठेवते. डोळ्याच्या मागील बाजूस पेशींचा पातळ थर असतो. जिथे मेंदूत पाठवलेल्या न्यूरोल सिग्नलमध्ये प्रकाश रूपांतरित केला जातो. या नर्वला इजा झाल्यास कायम स्वरूपी दिसणे बंद होऊ शकते.
3) OCULOMOTOR NERVE :-
OCULOMOTOR NERVE ही नर्व डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या पापण्या हलवण्यासाठी असते.
4 ) TROCHLEAR NERVE :-
TROCHLEAR NERVE ही नर्व डोळ्यांना लागून पापणा खालच्या मासाची हालचाल करण्यास मदत करते. जसे की एक डोळा बंद करतांना होते.
5 )TRIGEMINAL NERVE :-
TRIGEMINAL NERVE स्पर्शाच्या संवेदना, जबडयाच्या हालचाली, दाताच्या हालचाली, चवीची जाणीव, तोंड, दात, चेहरा पोकळीला संवेदना प्रदान करते. ही नर्व अप्रत्येक्ष अन्न पचनाला ही मदत करते.
6) ABDUCENS NERVE :-
ABDUCENS NERVE ही नर्व डोळ्याला लागूनच पण डोळ्याच्या थोड्या बाजूला म्हणजे गालाच्या आणि कपाळाच्या मधात डोळ्या जवळ असते. या नर्वला इजा झाल्यास व्यक्तीला अंधक व एका वस्तूच्या दोन – दोन वस्तु दिसू शकतात.
7 ) FACIAL NERVE :-
चेहरा हलवणे, चेहऱ्यावरचे हावभाव, पडजिभेच्या हालचाली, लाळ हे सर्व कार्य FACIAL NERVE च आहे.
8) VESTIBULOCOCHLEAR NERVE :-
VESTIBULOCOCHLEAR NERVE च खास कार्य आहे ऐकणे व संतुलन ठेवणे. ही नर्व आवाज आणि संतुलनाची माहिती मेंदूच्या आतील कानापासून प्रसारित करण्यास जबाबदार असते.
9) GLOSSOPHARYNGEAL NERVE :-
GLOSSOPHARYNGEAL NERVE चव घेण्यापासून गिळण्याच्या संवेदना व हालचाली ही नर्व करत असते. ही नर्व ब्रेनस्टेम पासून सुरू होते आणि कवटीच्या पायथ्या पासून फिरते व तोंडा जवळ MUCOUS GLANDS आणि जिभेच्या तळाशी संपुष्टात येते. या नर्वला वेगवेगळ्या शाखा आहेत ज्यांना टॉन्सिला शाखा, कॅरोटिड सायनस तंत्रीका आणि लिंगभाषा आहेत. हे बऱ्याच शाखामध्ये विभागले गेल्याने त्याचे वेगवेगळे कार्य आहेत. हे जीभ कॅरोटिड्स, टॉंसिल आणि मधल्या कानाच्या भागातून संवेदि तंतु प्राप्त करते. हे पॅरासीम्पेथेटीक फायबर देखील बनवते जे शरीराला अन्न पचन आणि आराम करण्यास मदत करणारे स्टाईलोफॅरेन्जिस स्नायूच्या मोटर तंतूना देखील उत्पन्न करते.
10 ) VAGUS NERVE :–
VAGUS NERVE ही नर्व हृदयाची गती, आतड्यांच्या संवेदना, घाम येणे, तोंडातील स्नायूच्या हालचाली, श्वासोश्वास आतील बाजू खुले ठेवते. ही नर्व क्रिनियल मज्जातंतु सर्व क्रिनियल नर्वस् पैकी सर्वात लांब असते. आणि ब्रेनस्टेम पासून सुरू होते आणि हृदय, फुफुसे आणि अन्ननलिका जात असलेल्या ओटीपोटात जाते. ही क्रिनियल नर्व अनैच्छिक मज्जासंस्थेचा एक भाग बनवते आणि शरीराच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवते जे एखाद्या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली नसतात जसे की हृदयाची गती नियंत्रित करणे. अपस्मार आणि उदासीनता असलेल्या रुग्णासाठी योस मज्जातंतूचा उत्तेजन हा एक पसंत उपचार आहे. शरीराच्या विशिष्ठ उत्तेजनाकडे जास्त प्रमाणात जाण्यामुळे योस मज्जातंतूची उत्तेजनामुळे वासो व्हॅगल सिकोप किंवा अशक्त एपिसोड नावाची स्थिति उध्दभवते कारण या उत्तेजनामुळे रक्तदाब आणि हृदय गती कमी होते.
11 ) ACCESSORY NERVE :-
(A) LARYNX – स्वर यंत्रातील पोकळीच्या हालचाली.
(B) PHARYNX – घश्याची पोकळी.
या दोघांची हालचाल गळा आणि खांदा यांच्या हालचाली यावर नियंत्रण ठेवते. या नर्व मध्ये कोणतीही बिघाड झाल्यास खांद्यावर आणि मानेवर इच्छित हालचाली वर नियंत्रण राहत नाही.
12) HYPOGLOSSAL NERVE :-
HYPOGLOSSAL NERVE ही नर्व जिभेच्या हालचाली जसे बोलणे, अन्न गिळणे यावर नियंत्रण ठेवते. ही नर्व ब्रेनस्टेम मधुन सुरू होते आणि कॅरोटिड धमनी आणि गूळवाहिनितून (JUGULAR VEIN) बाहेर पडते आणि जिभेच्या खालच्या भागाला जाते. HYPOGLOSSAL NERVE ला कोणतीही ही दुखापत झाल्यास जिभेला पूर्णपणे अर्धांगवायू होऊ शकतो. ज्यामुळे व्यक्ति खाण्यास, बोलण्यास योग्य राहत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा