मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

894. न्यूरॉनची रचना

     मेंदूचा अतिशय महत्वाचा भाग म्हणजे न्यूरॉन्स, याची एकूण संख्या ही आकाशा मधल्या ताऱ्या एवढी किंवा शंभर अब्ज एवढी असते, प्रत्येक न्यूरॉन इतर अनेक न्यूरॉनशी सिनॅप्स द्वारे जोडलेला असतो, काही जोडण्या जन्मापासूनच तयार झालेल्या असतात. आपली जशी वाढ होते तशाच न्यूरॉन्सच्या जोडण्या वाढत जातात. यापैकी काही आयुष्य भर टिकून राहतात तर काही कमकुवत होतात त्या तुटून नंतर काही जोडल्या ही जातात आणि काही संपून ही जातात. या व्यतिरिक्त त्यांना आधार देणाऱ्या त्यांच्या मधली ऊर्जा सांभाळणाऱ्या पेशी ही असतात त्यांना ‘ग्लिया सेल’ असे म्हणतात. साधारण एका न्यूरॉन सोबत पन्नास ‘ग्लिया सेल’ काम करत असतात. आपल्याला जे विचार येतात किंवा आपण विचार करतो ह्याला ही जबाबदार न्यूरॉन्स असतात, न्यूरॉन्सच्या वाढी मुळेच आपल्याला विचार करणे, कल्पना करणे शक्य होते, प्राण्यापैकी सर्वात जास्त न्यूरॉन्स मानवी मेंदुमध्येच सापडतात.
1. न्यूरॉनची रचना
2. सिनॅप्स
3. ग्लिया सेल
4. न्यूरॉन्सची जोडणी
5. न्यूरॉन्सचा आकार आणि वेग
6. रिसेप्टर्स
7. स्मरणशक्ती
8.न्यूरॉन्सच्या वाढीच उदाहरण

1. न्यूरॉनची रचना :–
न्यूरॉनला सोमा, डेंड्राईट, एक्सॉन, मायलिन, व एक्सॉन टर्मिनल असतात. सोमाला सेल बॉडी ही म्हणतात, सोमाला जे डेंड्राईट असतात ते झाडाच्या फांद्या सारखे दिसतात, डेंड्राईटला ग्रीक भाषेत झाड म्हणतात. डेंड्राईटची संख्या ही खूप जास्त असते ति मोजणे कठीण आहे. सोमाला एक नळी सारखा दांडा असतो त्याला एक्सॉन म्हणतात. हा दांडा लवचिक आणि लांब, आकाराने खूपच बारीक असतो, मायक्रोस्कोप खाली हा मोठ्या कठीणायीने दिसतो, एक्सॉन मधून संदेश 220 मैल दरतासाने वाहतात, याच एक्सॉनवर मायलिनच आवरण असते जेणे करून एक्सॉनने व्यवस्थित काम कराव, मायलिन ह्या ग्लिया पेशी पैकीच एक आहे. मायलिन एक्सॉन मधून विद्युत लहरीच्या संदेशने व्यवस्थित वाहाव याची काळजी घेत असतात, एक्सॉनच्या शेवटला छोट्या छोट्या दांड्या असतात त्यांना एक्सॉन टर्मिनल असे म्हणतात. या टर्मिनलच काम आहे आलेला संदेश दुसऱ्या न्यूरॉनकडे पाठवणे, दुसऱ्या न्यूरॉन तिसऱ्या न्यूरॉन पर्यंत पोहचवतो, एक्सॉन मधून संदेश सोमा मध्ये येतात, सोमा मधून एक्सॉनकडे पाठवला जातो, एक्सॉन तोच संदेश एक्सॉन टर्मिनल पर्यंत पोहचवतो डेंड्राईट मध्ये संदेश रासायनाच्या स्वरूपात असतो, डेंड्राईट मधून सोमा मध्ये आल्यावर त्याच रूपांतर विद्युत लहरीत होते, सोमा मधून विद्युत लहरीच्या स्वरूपाचा संदेश एक्सॉनद्वारे एक्सॉनच्या टर्मिनल पर्यंत पोहचतो, एक्सॉनच्या टर्मिनल मध्ये आल्यावर विद्युत लहरिच रूपांतर पुन्हा रसायना मध्ये होते आणि मग ते रसायन सिनॅप्स मध्ये जाऊन पुन्हा दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राईटला जाऊन मिळते, त्या डेंड्राईट मधून पुन्हा दुसऱ्या न्यूरॉनच्या सोमामध्ये जाऊन त्या रसायनाच विद्युत लहरीत रूपांतर होते. अशी ही प्रक्रिया चालूच राहते.
नेमकं होत अस असते की एक्सॉनच्या टर्मिनलचा भाग फुगून तिथे एक थैली तयार होते या थैलीत संदेशचा रासायनिक साठा असतो. या टर्मिनल मधून ह्या थैल्या रसायनाचा पाझर सोडतात, या रसायनाचा पाझर सिनॅप्स ची दरी पार करून दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राईटच्या सीमेवर पोहचतात, डेंड्राईटमध्ये काही रेणु असतात, रसायन आणि रेणु मिळून तो संदेश न्यूरॉनच्या सेल बॉडी म्हणजेच सोमामध्ये जातात. न्यूरॉन थोडा क्षारयुक्त राहण्यासाठी सोडियम आयनांची पेशी बाहेर टाकली जाते, त्यामुळे न्यूरॉनच्या आत म्हणजे सोमा मध्ये ऋण विद्युत भाराची वाढ होते. ति एका विशिष्ट मर्यादे पलिकडे पोहचली की तो न्यूरॉन उत्तेजित होतो, एक विद्युत लहरी त्यांचाशी जोडलेल्या एक्सॉन वरुण तो संदेश पळत एक्सॉनच्या टर्मिनल वर पोहचतो, तिथे पुन्हा रसायनाच्या थैल्या बनवून सोडल्या जातात आणि संदेश रसायनाच्या स्वरूपात सिनॅप्स पार करून दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राईटला दिला जातो, आपल्या मेंदूत अनगिणित सिनॅप्स आहेत.

2. सिनॅप्स :-
मेंदुमध्ये जरी कोट्यावधी न्यूरॉन्स असतात पण ते एकमेकांना जोडलेले नसतात, त्या मध्ये थोडसं अंतर असते त्या अंतराला सिनॅप्स असे म्हणतात. एका न्यूरॉन कडून आलेला संदेश हे सिनॅप्स नावाच अंतर पार करून दुसऱ्या न्यूरॉनकडे पाठवला जातो. हे काम काही रसायना मिळून केलं जात त्या रसायनाला न्यूरोट्रान्समिटर असे म्हणतात. न्यूरॉन मधून संदेश विद्युत लहरीच्या स्वरूपात प्रवास करतो, त्या विद्युत लहरींना सिनॅप्स पार करून दुसऱ्या न्यूरॉन पर्यंत जाता येत नाही तर मग त्या विद्युत लहरीचं रूपांतर रसायनामध्ये होऊन ते रसायन सिनॅप्स पार करून तो संदेश दुसऱ्या न्यूरॉन पर्यंत पोहचवतो.

3. ग्लिया सेल :-
मेंदू मधल्या एकूण पेशी पैकी दहा टक्के पेक्षा कमी पेशी न्यूरॉन्सच्या असतात. बाकीच्या ज्या पेशी असतात त्या या न्यूरॉन्सनि व्यवस्थित काम कराव म्हणून असतात, त्यांना ग्लिया सेल किंवा ग्लिया पेशी असे म्हणतात. ग्रीक भाषेत ग्लिया म्हणजे इंग्रजी मध्ये ग्लु असा होतो आणि ग्लु म्हणजे चिकटणे किंवा एकत्र राहणे असा होतो, ग्लिया पेशी न्यूरॉनला चिकटून राहतात त्यामुळे त्यांना ग्लिया सेल असे म्हणतात. मेंदूची गुंतागुंत न्यूरॉन्स मुळे वाढत नाही तर त्या न्यूरॉन्सना आधार देणाऱ्या ग्लिया सेल मुळे होते.

4. न्यूरॉन्सची जोडणी :-
न्यूरॉन्सची मुळ संख्या साधारण शंभर अब्जाच्या आस पास असते पण मेंदूतल्या एकंदर न्यूरॉनच्या संख्येपेक्षा मेंदूमध्ये त्यांची जोडणी म्हणजेच कनेक्शन महत्वाचे असतात. मेंदू मधले वेगवेगळे न्यूरॉन्स जेव्हा त्याचं जाळ तयार होतं. तेव्हा त्यातला प्रत्येक न्यूरॉन हा इतर सरासरी 4000 ते 5000 न्यूरॉनशी जोडला जातो. म्हणजे एका मेंदूत मोजता ही येणार नाहीत एवढ्या जोडण्या असतात. समजा एका मोठ्या जंगलात शंभर अब्ज झाडे आहेत. तसेच आपल्या मेंदूत शंभर अब्ज न्यूरॉन्स आहेत आणि त्या जंगलातल्या झाडाला जेवढी पाने असतील त्यापेक्षा ही जास्त जोडण्या आपल्या मेंदुमधल्या न्यूरॉन्स मध्ये असतात.

5. न्यूरॉन्सचा आकार आणि वेग :–
न्यूरॉनची रुंदी फारच कमी असते. एका न्यूरॉनची रुंदी साधारण आठ ते दहा मायक्रोन एवढी असते, त्या मुळे न्यूरॉन आपल्या उघड्या डोळ्याने दिसू शकत नाही, म्हणजे एका पूर्ण विराम चिन्हाचा पन्नास वा भाग एवढा लहान असतो तर काही ह्या पेक्षा ही छोटे व मोठे असतात. वेगवेगळ्या न्यूरॉन्स मधून माहिती वेगवेगळ्या गतीने वाहते, काही न्यूरॉन्स मधून तिचा वेग 0.5 दर सेकंदाला तर काही न्यूरॉन्स मधून तोच वेग दर सेकंदाला 120 मिटर्स म्हणजे दर तासाला 431 किलोमीटर एवढा असतो.

6. रिसेप्टर्स :–
ज्या न्यूरॉन पर्यंत रसायन पोहचणार असते त्यांच्या डेंड्राईटच्या बाहेरच्या बाजूला प्रोटिन्सचे खास रेणु असतात त्यांना रिसेप्टर्स असे म्हणतात. प्रत्येक रसायणासाठी वेगळे रिसेप्टर्स असतात, या प्रोटिन्स च्या मध्ये बरोबर हे रासायनाचे रेणु जाऊन बसतात, या नंतर ति रसायने न्यूरॉनच्या सेल बॉडी म्हणजेच सोमा मध्ये जातात. एकदा का त्या न्यूरॉनला जोडलेल्या सगळ्या न्यूरॉन्स मधून येणारी रसायने न्यूरॉनच्या सेल बॉडी मध्ये आली की त्याच एक परिणामी रसायन बनते आणि त्या पासून एक परिणामी विद्ध्युत सिग्नल बनतो आणि मग तो पुन्हा त्या न्यूरॉनच्या एक्सॉनने वाहायला लागतो.

7. स्मरणशक्ती :-
अल्झायमर्स सारख्या आजारात मेंदूचे न्यूरॉन्स नष्ट होत असतात. मनुष्याच्या स्मरणशक्तीला अंत नाही. स्मरणशक्ती ही प्रामुख्याने या सायनॅप्टीक जोडण्यामुळे निर्माण होते, न्यूरॉन्समध्ये होणाऱ्या आशा हजारो जोडण्यातून आलेले, नोंदलेले अनुभव हे स्मरणशक्तीस कारणीभूत असतात. प्रत्येक वेळा जेव्हा स्मरणातून एखादा प्रसंग किंवा अनुभव जागा केला जातो किंवा आठवला जातो, तेव्हा त्यात काही बदल केला जातो व बदललेली नवीन गोष्ट स्मरणात नोंदविली जाते, जुन्या स्मृतीचे नूतनीकरण करून नवी माहिती स्मरणात ठेवली जाते. आशा प्रकारे जुन्या अनुभवांचे असंख्य नव्या अनुभवात रूपांतर होते.

8. न्यूरॉन्सच्या वाढीच उदाहरण :-
आपण जन्मल्या बरोबर आपल्या मेंदू मध्ये न्यूरॉन्स तयार होणे चालू होतात. त्यामधला एक आपल्या आईचा न्यूरॉन तयार होतो. आपली आई आपल्याला बरंच काही शिकवते किंवा आपल्या आईशी संबंधित जेवढ्या काही गोष्टी आपल्याला कळतात ति आईच्या संबंधित माहिती म्हणजे आईच्या न्यूरॉनची साखळी तयार होते याच साखळीला न्यूरलपाथवे म्हणतात, जसे की आईचे भाऊ आपले मामा, आईच्याच न्यूरॉनच्या बाजूला एक मामाचा ही न्यूरॉन तयार होतो, त्या नंतर मामाच्या संबंधित जेवढी माहिती मिळते तिची ही एक साखळी तयार होते अशाच प्रमाणे आपण जेवढ्या लोकांना किंवा बाकीच्या गोष्टीची माहिती मिळवायला लागतो तेवढ्या गोष्टीचे न्यूरॉन्स आणि त्याचे कनेक्शन म्हणजे जोडण्या तयार होयाला लागतात. काही दिवसाने आपली आई आपल्याला चिंच खायला देते मग एक चिंचेचा ही न्यूरॉन आपल्या मेंदूत बनतो. मग त्या चिंचेची माहिती जसे चिंच आंबट असते, दिसायला वाकडी असते, थोडक्यात चिंचेची मिळालेली सर्व माहितीची साखळी तयार होते. त्या नंतर काही दिवसाने आपल्याला चिंच दिसल्या बरोबर आपल्या मेंदूत असलेली चिंचेची साखळी म्हणजेच चिंचे संबंधित न्यूरलपाथवे मधले रसायन आणि विद्ध्युत सिग्नल द्वारे आपला मेंदू आपल्याला त्या चिंचे ची चव वगैरे तिची आपल्या मेंदूत असलेली सर्व माहिती आपल्याला देतो. 
     थोडक्यात सांगायच तर आपल्या मेंदू मध्ये जो न्यूरॉन तयार होतो त्या बद्दल जी माहिती मिळते ति त्या न्यूरॉनचीसाखळी बनवण्यास मदत होते, ज्या न्यूरॉनची साखळी जेवढी मजबूत म्हणजेच त्या न्यूरॉनच्या ग्लिया सेल तेवढ्या जास्त मजबूत आणि ग्लिया सेल जेवढ्या जास्त मजबूत तेवढ्या जास्त दिवस तो न्यूरॉन मजबूत राहणार. एखाद्या गोष्टीची तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर तो न्यूरॉन जास्त काळ टिकणार नाही, असे आपल्या मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स आणि त्याच्या साखळ्या तयार झालेल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...