शुक्रवार, १५ मार्च, २०२४

957. परवा परवा बायकोची

 परवा परवा बायकोची
तब्येत नव्हती बरी,
सर्दी, खोकला, तापाने
फणफणली बिचारी.

मी म्हणालो आराम कर
मी कामाच बघुन घेईन,
एक दिवस का होईना
तुझ आयुष्य जगुन घेईन !

थंड पाण्याचा पट्ट्या
डोक्यावर तिच्या ठेवत होतो,
थोडा थोडा बाम
डोक्याला तिच्या लावत होतो !

स्वयंपाकाची वाटल
करावी आता तयारी ,
बायको अंथरूणावरून
पहात होती सारी...

कणीक भिजवतांना
पडल बरच पाणी,
पातेल्यात भाजीची
करपुन गेली फोडणी !

करपलेल्या पोळ्यामध्ये
बरेच होते नकाशे,
बायको सार पाहून
गालातल्या गालात हसे !

एका दिवसाच्या स्वयंपाकाने
उडाली माझी तारांबळ,
कुठून मिळत असेल बर
स्त्रियांना एवढ बळ !

जेवण घेतल वाढुन
बायको म्हणाली छान झालं,
तिच माझ्यावरच प्रेम पाहून
मन माझ भरुन आलं !

खारट तिखट भाजीसुद्धा
ती आनंदात जेवली,
जळालेल्या पोळ्यावर
तिने, मनातून माया लावली !

किती नाव ठेवतो आपण
तिने केलेल्या स्वयंपाकाला,
काय वाटत असेल बर
खरच तिच्या मनाला !

तीचा चवदार स्वयंपाक
अजुन चवदार लागतो,
आजारी पडली तेंव्हापासुन
मी शहाण्यासारखा वागतो !
* "समस्त पत्नीवर्गासाठी" *

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...