शुक्रवार, २२ मार्च, २०२४

988. विकलेलं घर

      इमारतीच्या सहाव्या मजल्यावर येऊन साठी ला आलेल्या इंदिराबाई घाम टिपत उभ्या होत्या. काय बोलायचं? कसं बोलायचं? याची उजळणी मनाशी करून झाली होती. पण या क्षणाला मनाची पाटी पून्हा कोरी झाली होती. सहाशेतीन शुभंकर, ए विंग हा नवा पत्ता अंगवळणी पडे पर्यंत घर बदलावं लागलं होतं. मुलाचे सगळे हट्ट पुरवले त्यात हा एक शेवटचा हट्ट. मनू च्या मनात फार होतं मित्तल टाॅवर सारख्या गगनचुंबी इमारतीत रहायला जायचं. त्याची जागा विकून, लोन काढून ही भागणार नव्हतं तेंव्हा तो लहानपणी मागे लागायचा तसा इंदिरा बाईंच्या मागे लागला होता की रीडेव्हलपमेंट ची जागा हातात आली की आपण ती विकूया आणि मित्तल टाॅवर मधे प्रशस्त जागेत एकत्र राहूया. कधी नाही ते सून सुद्धा चार शब्द आपणहून बोलायला लागली होती. इंदिराबाई त्यालाच भुलल्या. आणि यजमान तयार नसताना त्यानीच यजमानांना भरीस पाडलं. आणि जेम तेम दोन तीन महिने राहून त्यानी ही जागा निव्वळ मुलाच्या हट्टापायी सोडली होती. आणि मित्तल टाॅवर मधल्या प्रशस्त पण भयाण वास्तूत आपलं बाड हलवलं होतं. दहा दिवसात सुनेने न बोलता दाखवून दिलं होतं "तुम्हाला दिलेली रूम इतकीच तुमची जागा. बाकी  घरात तुमचा वावर वर्ज्य. काय बाहेरचं जग बघायचं आहे ते तिसाव्या मजल्यावरच्या  खोली ला असलेल्या काचेच्या तावदानातून बघा. खिडकी उघडायची सोयच नाही. भणाणता वारा सोसायची ना त्याना सवय होती ना त्यांच वय होतं. रोज संध्याकाळी त्या यजमानांना घेऊन टाॅवर च्या पार्कात फेर फटका मारायच्याच म्हणून जरा मोकळीक पाय ही मोकळे मन ही जरा मोकळं.
    इंदिराबाईंच्या लक्षात आपली चूक आली होती. यजमान या वर काहीच बोलत नव्हते. आता काय बोलणार? आणि कुणाशी बोलणार? सून तर खोली कडे फिरकत नव्हती, नातवाला आजी आजोबांची सवय नव्हती. मुलगा आज दिल्ली तर उद्या चंडीगढ कधी चुकून घरी असला तर झोप पूर्ण करण्याच्या मूड मधे किंवा सुने सोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायच्या तयारीत. अशावेळेस इंदिराबाई ना त्यांची कुलदैवता म्हांनदाबाईचाच आधार. म्हांनदाबाई म्हणजे महानंदा देवी. अष्टभूजा असलेली, भक्ताच्या रक्षणार्थ सदैव शस्त्र उपसून उभी असलेली माता. बसल्या बसल्या हात जोडले तरी त्वरीत भक्ताशी जोडली जाणारी माता. वर्षोंवर्ष तिची तसबीर इंदिराबाईंच्या डोळ्या समोर होती. शिफ्टिंग च्या वेळी सूनबाई नेमकी तेवढी तसबीर आणायची विसरली. इंदिराबाई नी नीट शालीत गुंडाळून ती छातीशी कवटाळली होती. पण काय काम निघालं कोण जाणे ती त्यांनी खाली ठेवली आणि तिथेच राहीली. कितीवेळा सुने ला सांगून झालं, मुलाला विनवून झालं पण दोघांना जरा वाकडी वाट करून जून्या घरी जाणं जमेना. सुन तर सरळ म्हणाली ते नवे लोक आलेत त्यानी केव्हाच कबाड मधे काढली असेल हे ऐकून इंदिराबाई अस्वस्थ झाल्या. त्याना कळून चुकलं या लोकांचा आपल्या सुख दुःखाशी, आस्थेशी, श्रद्धेशी काही संबंध नाही. प्राथमिक गरजा भागवणं या पलीकडे त्यांच काही कर्तव्य नाही. या गोष्टी बोलून दाखवण्यात अर्थ नाही. वाद विकोपाला गेला तर आपण करणार काय? जाणार कुठे? त्या पेक्षा आपला आपण उपाय शोधावा. असा विचार करून सूनबाई ऑफीस ला गेल्यावर इंदिराबाई दबेपांव बाहेर पडल्या. जुन्या घरी गेल्यावर काय बोलायचं कसं बोलायचं याची त्यानी मनोमन तयारी केली. एक तर ऐन दूपारचे जातोय याची बाईना जाणीव होती.त्या बद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करायची त्यानी ठरवलं होतं. घराला कुलूप असेल तर वाँचमन जवळ मेसेज ठेवायचा, त्यांचा नंबर मिळवायचा प्रयत्न करायचा. त्यातून त्या लोकांनी तसबीर ठेवली नसेल तर हात जोडून आईची क्षमा मागायची आणि आशीर्वादाची मिळालेली सुपारी देवीची मूर्ती म्हणून ड्रेसिंग टेबल वर ठेवायची हे सर्व बेत जून्या घरी येता येता सतरांदा घोकून झाले होते. पण तरी सहाशेतीन च्या बंद दारा समोर आल्यावर त्यांच्या मनाची पाटी कोरी झाली होती. घशा ला कोरड पडली होती. जगातली कुठलीच भाषा आपल्याला अवगत नाही असं इंदिराबाई ना वाटत होतं. आणि पावलं हार पत्करून मागे वळायच्या तयारीत असताना वेळ ओळखून हातानी घाई केली आणि डोअर बेल वाजवली.  झालं !आता उभं राहण्या शिवाय गत्यंतर नव्हतं.  दार उघडल्यावर कोण सामोरं येईल याची कल्पना नव्हती. आणि दार उघडलं गेलं आणि समोर त्यांच्याच वयाची हसत मुख चेहर्‍याची एक बाई उभी होती. इंदिराबाई ना बघताच त्या बाई च्या डोळ्यात एक ओळख तरळली. 
हसतमुखानं बाईंच स्वागत करत ती म्हणाली "इतक्या उन्हाचं येणं केलत?
म्हणजे काम ही तितकच महत्वाचं असणार.
बोलायला वेगळीच सुरूवात झाल्यावर इंदिराबाई पुरत्या गोंधळल्या. 
घाई ने म्हणाल्या नमस्कार मी इंदिराबाई ओझरकर. 
म्हणजे माहेरच्या सुलक्षणा डबीर? त्या बाई नी इंदिराबाईंच्या डोळ्यात बघत विचारलं इंदिराबाईंची त त प प झाली. त्यांची अपेक्षाच नव्हती अशी.
माफ करा माफ करा असं काहीतरी त्या बोलायला लागल्या तशी त्याना सावरून घेत ती बाई च म्हणाली अगं मी संगीता परूळेकर सासरची संगीता खेर. तू छबिलदास मधेच होतीस ना? आपल्या वढावकर बाई. मग जो बांध फुटला. आपण कधी मांडी ठोकून बसलो हे इंदिराबाईंच्या लक्षातच आलं नाही. त्या आनंदात ही मनोमन म्हांनदाबाईला हात जोडायला विसरल्या नाहीत. संगीता ने महानंदा देवीची तसबीर सांभाळून ठेवली होतीच. शिवाय एक महत्वाचं टपाल ही जपून ठेवलं होतं. ते हवाली करण्या साठी ती ओझरकर परिवाराचा पत्ताच  शोधत होती. पण इंदिराबाईं कडून कर्मकहाणी ऐकल्यावर संगीता त्याना म्हणाली हे रजिस्टर गेल्या आठवड्यात आलं. मी सही करून घेतलं आणि उत्साहाच्या भरात उघडलं. फार महत्वाचा ऐवज आहे.आता माझं ऐक यातला एक शब्द सुद्धा तुझ्या स्वार्थी मुलाला सांगू नकोस. हे टपाल तुझ्याच हवाली करण्या साठी तुझी महानंदा आई मागे राहिली असं समज.
     अगं तुझ्या धाकट्या दिरा ने तुमच्या वाटणीची दहा एकर जमीन तुझ्या यजमानांच्या नावावर केली आहे. त्याने त्याच्या हिश्शाची जमीन सरपंचाला विकली. सरपंच तुमची जमीन सुद्धा विकत घ्यायला तयार आहे. काय तो निर्णय विचार करून घ्या. गाठीशी चार पैसे आले की बंदीखान्यातही रूबाबात राहता येतं. अरे ला का रे करता येतं. अरे ला का रे केलं की समोरच्याला आपला वचक बसतो. जे आपले असतात ते आपण त्यांच काही केलं नाही तरी आपलेच राहतात आणि जे आपले नसतात त्यांच्या साठी किती ही करा ते आपले होत नाहीत. तेव्हा आता स्वतःचा विचार कर, यजमानांचा विचार कर. महानंदेनेच ही कृपा केली आहे त्याचा स्विकार कर. काही व्यवहार करायचा ठरला तर मला सांग माझा धाकटा भाऊ असे व्यवहार लिलया पार पाडतो त्याची स्वतःची मोठी फर्म आहे. हाताशी टीम आहे.
मनाने निवांत झालेला माणूस कशावरच रीअॅक्ट होत नाही तसं इंदिराबाईंच झालं. संगीताने ऊबर बुक केली म्हणून, नाहीतर त्या उडतच मुलाच्या तिसाव्या मजल्या वरच्या प्रशस्त घरी जाणार होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...