शुक्रवार, १५ मार्च, २०२४

958. सगळे इथेच राहते

    काल राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आलेल्या माजी उपमुख्य मंत्री यांना टीव्हीवर पाहिले आणि खूप गलबलून आले. पांढरीशुभ्र दाढी वाढलेली.अतिशय थकलेले, डोक्यावर कानटोपी घातलेली.एकेक पाऊल सांभाळून चाललेले.बोलताना धाप लागणारे. कोणी विचारलेच ,'कसे आहात?' तर फक्त 'ठीक आहे.'इतकेच बोलणारे.विधान भवनात मतदानासाठी जाताना पायऱ्या चढतानाही त्यांना धाप लागली. त्यांनी नाशिक मध्ये नॉलेज सिटी स्थापन केली. याच काळात यांनी जवळ जवळ 8 हजार कोटींची माया जमवली. साखर कारखाना विकत घेतला .परदेशात खाण आहे, मुलाला आमदार बनवले, पुतण्याला खासदार बनवले. त्यांच्या घरात असलेले पोस्टर काही कोटींचे होते, त्यांचे बंगले कोट्यवधींचे आहेत. आज ते आमदार असताना आपल्या मताची किंमत ओळखून ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी आले होते. आणि त्यांचे ते सध्याचे रूप बघून खरोखर गलबलून आले. इतकी वर्षे वैभवात काढलेला माणूस गलितगात्र झालेला पाहून मन खिन्न झाले. ठाकरे यांना आव्हान देणारा हा निधड्या छातीचा माणूस आज हवालदिल झाला होता. तुरुंगातून बाहेर येण्याची केविलवाणी धडपड करतो आहे. सर्वसामान्य कैद्यांसारखे जीवन जगतो आहे. महागड्या गाद्यागिरद्यांवर झोपणारा हा माणूस आज जमिनीवर झोपतो आहे. नाशिक मध्ये मोठमोठे महाल आहेत. पण त्याचे सुख घेऊ शकत नाही. इतकेच काय थोडासा आराम करावा म्हणून दवाखान्यात ऍडमिट झाले तर तिकडून त्यांच्यावर आरोप करून पुन्हा तुरुंगात जमिनीवर झोपायला पाठवले. 
     हे सगळे सांगायचा उद्देश हाच की, आपल्या पदाचा,संपत्तीचा कधी गर्व करू नये. कारण कोणी तरी म्हटले आहे.'कफन ब्रँडेड नही होता.' आयुष्य कितीही श्रीमंतीत काढले तरी मयत त्याच मांजरपाट कपड्यात नेले जाते. मनसेचे तत्कालीन आमदार गोल्डन मन दोन अडीज किलो सोने अंगावर घालायचे. एक क्षणात मृत्यूने त्यांना कवटाळले.सगळे इथेच राहिले. अर्धे जग जिंकलेला ,आणि पूर्ण जग जिंकण्याची जिद्द बाळगलेला सिकंदर आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला,'मी मरेल तेंव्हा माझे प्रेत नेताना माझे हात पेटीच्या बाहेर मोकळे सोडा,जगाला कळू द्या,जिवंतपणी जग जिंकायला निघालेला सिकंदर मेल्यानंतर काहीही घेऊन गेला नाही. 'फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनपार्ट वाटरलूच्या तुरुंगात खंगुन खांगुन मेला. जर्मनीचा शहेनशहा ज्याने दुसरे महायुद्ध घडवले त्या एडॉल्फ हिटलरला सर्व इथेच ठेवून आत्महत्या करावी लागली. इराकचा बादशहा सद्दाम हुसेन याने इराकवर हुकूमत केली. नको इतकी संपत्ती गोळा केली. शेवटी त्यालाही मरण चांगले आले नाही. आपल्या वडिलांना शाहजहानला तुरुंगात टाकून भावांचा खून करून सत्ता मिळवलेल्या,भारतावर साम्राज्य असलेल्या बादशहा औरंगजेबाच्या समाधीकडेही कोणी बघत ही नाही. एकेकाळी दहशत असलेल्या बेनेटो मुसोलिनीला झाडाला टांगून लोक त्याच्या प्रेतावर थुंकले . फ्रांसची हुकूमत ताब्यात असलेल्या 16 व्या लुईला लोकांनी गिलोटिनवर चढवले. कार्ल मार्क्सला डोक्यावर घेणाऱ्या लोकांनीच त्याचे पुतळे फोडून टाकले.जगाला आपल्या अभिनयाने हसवणारा चार्ली चॅप्लिन असाच झटका येऊन मेला. भल्याभल्यांना आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भुरळ पाडणारी अभिनेत्री मर्लिन मंरो ही अति मद्य सेवनाने मेली. मनोरंजनातूनलोकांच्या जीवनावर राज्य करणारे राजेश खन्ना, विनोद खन्ना, भगवान दादा, ए के हँगल,परवीन बाबी,माला सिन्हा यांचे मृत्यू आठवा जरा. इंदिरा गांधी, राजीव गांधी, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, यांचे मृत्यू आठवा जरा. आणखी बरेच उदाहरणे देता येतील.
     काय कमी होती यांच्या कडे? काहीच नाही ना? तरीही सर्व इथेच सोडून जावे लागले. आपल्या कडे जे काही आजे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल. पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देईल. हे लक्षात ठेवा.

कडू डोस
   आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही हे लक्षात ठेवा.जमिनीशी जोडलेले राहा. संपत्ती आणि पदाचा गैरवापर करू नका. समोरच्याची वेळ येईल तेंव्हा तो व्याजासह परत देईल. हे लक्षात असू द्या. सगळे इथेच राहते.हे लक्षात राहू द्या. इतकेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...