अनिल अंबानी, रतन टाटा व मुकेश अंबानी यांच्याकडून उद्योग, व्यवसाय व व्यापार यामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी शिकायला पाहिजेत? अनिल अंबानी आणि मुकेश अंबाणीची गोष्ट सांगतो नंतर रतन टाटा कडे वळूयात
तर धीरूभाई जिवंत असताना सर्व आलबेल होत परंतु नंतर वाद व्हायला लागले आणि एकमेकांचा हस्तक्षेप वाढायला लागला म्हणून धीरुभाई च्या पत्नीनि कायदेशीर रित्या दोन्ही भावा ना हिस्से वाटप करुण दिल्या आणि जवळपास समान वाटणी केली किंबहुना अनिल लहान असल्या मुळे अनिलला चांगल्या आणि जास्त कंपन्या दिल्या अनिल कडे इन्फ्रास्ट्रक्चर, communication , पॉवर आणि reliance capital सारख्या ग्रोविंग कंपनी दिल्या होत्या. या उलट मुकेश अंबानीकडे ऑइल गॅस आणि पेट्रोल आणि कापड बिजनेस होता पण तरी सुद्धा त्यांनी तो हळू हळू वाढवला आणि नफ्यात आणला पण अनिल कर्जात गेले आणि बिजनेस तोट्यात जायला लागला तरीसुद्धा ते सावरले नाही ते तोट्यात असलेले बिजनेस विकून दुसऱ्या सेक्टर मध्ये बिजनेस करू शकले असते पण त्यांनी तसे केले नाही कुठल्याही उद्योजकांने राजकारणाच्या जास्त आहारी जाऊ नये. सर्वपक्षीय संबंध ठेऊन त्याचा आपल्या व्यवसायाला कसा फायदा होईल हे पाहावे . पण 2004 साली हद्दच झाली जेव्हा अनिल अंबानी राज्यसभेवर गेले आणि संपूर्ण उद्योगाचे पतन झाले. या उलट मुकेश नवीन सेक्टरमध्ये संधी शोधत होते कारण त्यांना माहीती होती की आज नाहीतर उद्या पेट्रोल सेक्टर च वर्चस्व कमी होणार च आहे आणि म्हणून त्यांनी टेलिकॉम सेक्टर मध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु ते इतके सोपे नव्हते कारण 2006 साली एक करार झाला होता दोघा भावानं मध्ये की कोणीही कोणाच्या बिजनेस related बिजनेस करणार नाही म्हणजे उदाहरण : की अनिल पेट्रोल शी related कुठला ही बिजनेस करू शकणार नाही करण पेट्रोल सेक्टर मुकेश चे आहे पुढच्या 10 वर्षा पर्यंत , कारण 10 वर्षा नन्तर करार संपुष्टात येणार होता
म्हणूनच मुकेश अंबानी यांना jio लवकर लाँच करू शकले नाही. म्हणून जसा 2016 साली करार संपला मुकेश नि jio सुरू केले आणि यशस्वी केले आपल्या कोशल्या ने आणि आज ते सर्वात श्रीमंत भारतीय आहेत.
तर मुकेश अंबानी कडून काय शिकू शकतो
चांगली माणसे जोडा आणि त्यांचा कडून काम करून घ्या आणि त्यांना शेवट पर्यंत सोडू नका तेच तुम्हाला पुढे नेतील. एक व्यवसाय नफ्यात आल्याशिवाय दुसऱ्या व्यवसायात हात टाकू नका. जर तो बिजनेज 3 वर्षापेक्षा जास्त काळ तोट्यात असेल तर तो सोडून टाका. जास्त कर्ज घेऊ नका आणि कर्जाची व्यवस्थित नियोजन करा. उद्योजक माणसांनी राजकारण या गोष्टी पासून दूर राहा. इतरांचे म्हनने ऐका.
अनिल अंबानी कडून काय शिकू शकतो
जास्त सेक्टर मध्ये बिजनेस करू नका. हळु हळू एक एक सेक्टर नफ्यात आणा आणि मग दुसऱ्यात वळा. जास्त कर्ज घेऊ नका. इतरांचे ऐका (भावांचे सुद्धा).
आणि रतन टाटा कडून शिकणाऱ्या गोष्टी
नैतिकता, टाटा मिठा पासून ते विमानं पर्यंत सगळं विकते. परंतु ते कधीही दारू, सिगरेट, विकत नाही कारण लोककल्याण उदारता. आज पर्यंत टाटाने जेवढं दान केले तेवढं कोणीचं केले नाही. डाउन टू अर्थ ( अहंकार शून्य पण). अहंकार, रुबाब बिलकुल नाही आणि जेव्हा जेव्हा देशाला गरज पडली तेव्हा धावून आले. रतन टाटा एवढे महान आहेत की भारत रतन हा पुरस्कार खूप लहान आहे त्यांनी केलेल्या कार्यासमोर. आवडल्यास upvote नक्की करा ! ५०० + उपवोट्स साठी मनापासून धन्यवाद !
अनिल/ मुकेश अंबानी - यांच्याकडून (दोघांकडून) शिकण्यासारखे बरेच आहे.
थोडेसे भूतकाळापासून लिहितो म्हणजे अनिल अंबानींच्या आत्ताच्या परिस्थितीचे कारण आपणास आपोआप लक्षात येईल. दोघे भाऊ शिकण्यासाठी परदेशात होते. मुकेश अंबानींचा शिक्षणात जास्त रस होता, कारण त्यासाठीच तिकडे आपण गेलेलो आहे ही विचारधारणा. त्यामुळे ते जरी शिक्षण अर्धवट सोडून आले असले तरी एक लक्षत घ्या की त्यांना एक वेळेस असे वाटले असेल की बस एवढी समजून घेतलं ना आपण, आत्ता पुढं काय करायचं मी पाहतो. म्हणजे त्यांना व्यवसायाच्या यशस्वीतेच गमक लवकर कळलं. जस की आपण वाचन करताना त्याचा अर्थ लावतो, ज्याला इंग्रजी मध्ये 'Reading between the lines' म्हणतो. ते आले कामाला लागले. त्यावेळी अजून धीरूभाई अंबानी होते. नाही म्हणल तरी त्यांना आपल्या व्यवसायातील सर्व सूचना/ खाचाखोचा, सल्ले धीरूभाईंकडून मिळत गेले आणि त्यांची व्यवसायातील पकड मजबूत झाली. प्रत्येक व्यवसायाचा एक महत्वाचा उद्योग असतो ज्यावर त्यांचं साम्राज्य होण्यास सुरुवात झालेली असते. उदा. अंबानींसाठी जामनगर ची रिफायनरी, टाटांसाठी जमशेदपुर ची स्टील फॅक्टरी, महिंद्रा साठी ट्रॅक्टर व्यवसाय इ. हे मुकेश अंबानींनी ओळखले की कुठल्या व्यवसायावर आपले साम्राज्य टिकवता येईल. यावेळी अनिल अंबानी काय करत होत? शिक्षण. आणि याच्या बरोबर त्यांचं अमेरिकीतील प्रतिष्ठित राजकारणी आणि व्यावसायिक यांच्यात उठबस होती. कारण ते पार्टी/ पब/ कॅसिनो इकडे पण वेळ घालवायचे. ज्यावेळी अनिल अंबानी परत आले त्यावेळी त्यांनी पारंपारिक व्यवसायबरोबर नवीन क्षेत्रातील व्यवसाय सुध्दा सुरू केले. जसे की टेलिकॉम, इन्शुरन्स, इन्फ्रा इ. यासाठी लागणारा पैसा त्यांनी आपल्या वैयक्तीक ओळखीवर आणला. जोपर्यंत धीरूभाई होते तोपर्यंत अनिल अंबानींनी आर्थिक उभारणी करायची आणि मुकेश अंबानींनी व्यवस्थापन करायचे. या कारणामुळे अनिल अंबानी शेवटपर्यंत ग्राउंड रियालिटी किंवा ग्रास रूट ला पोहचू शकले नाही. हे किती महत्वाचे आहे हे मोठं-मोठ्या कंपनीत काम करणारे व्यवस्थापन पदावर (managerial postings) काम करणाऱ्याना किंवा त्यांना सहाय्यक असणाऱ्या लोकांना कळेल. जेवढा व्यवसाय मोठा तेवढं व्यवस्थापन किचकट. एखादा निर्णय सुद्धा तुमची पत बिघडवू शकतो. ताजे उदाहरण आहे दुबईतील बी. आर. शेट्टी, एक ट्वीट मुळे त्यांचा हजारो करोड रुपयांचा व्यवसाय ₹72/- मध्ये विकावा लागला. आणि आज बेपत्ता आहेत. धीरूभाईंच्या नंतर ज्यावेळी व्यवसाय चालवताना कशामुळे वाद झाले असतील. तर वर्चस्व कोणाचे राहणार यावरून. मुकेश यांच्या तुलनेत अनिलना कंपनीत किती लोक ओळखत असणार, फार फार तर वरच्या फळीतील मॅनेजमेंट मधील लोक. पण मुकेश अंबानींना जास्तीत जास्त लोक आणि आपल्या निर्णयामुळे काय होऊ शकेल आणि अस झालं तर काय करायचं इथपर्यंत तयारी असलेने त्यांची बाजू वरचढ ठरली आणि पारंपारिक व्यवसाय जिथून कोणत्याही परिस्थितीत पैसे येत राहणार हे सर्व मुकेश अंबानींना मिळाले. इथसुद्धा कंपनी सिलेक्ट करताना अनिल अंबानी चुकले. खर पहायला गेले तर ही एक पायरी होती जिथे अनिल अंबानी स्वतःला सावरू शकले असते किंवा आज जी परिस्थिती आहे ती अस्तित्वात आली नसती.
रतन टाटा यांच्या बाबतीत मी काही बोलणं म्हणजे काजव्यानं सूर्याचं वर्णन केल्यासारखं आहे. काही घटना त्यांचं व्यक्तिमत्त्व किती महान आहे हे दर्शवतात. त्यांना ऑटोमोबाईल बद्दल प्रचंड आवड आहे आणि त्यामुळेच त्यांनी टाटा मोटर्स सुरू केली. नॅनो, इंडिका, इंडिगो चे उत्पादन केले. पण म्हणावे असे यश मिळाले नाही. फोर्ड सारख्या कंपनी मालकाकडून अपमान सहन करावा लागला. पैसा आहे, लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मनुष्यबळ आहे म्हणून कंपनी चालू केली आणि यश मिळाले असे नाही. ऑटोमोबाईल व्यवसायात यश पाहायला जगवॉर, लँड रोव्हर टेक ओव्हर पर्यंत वाट पहावी लागली कारण त्या त्या क्षेत्रातील तज्ञ लोक आपल्याकडे असले तरच प्रॉडक्ट चांगले बनवू शकतो. जगवॉर, लँड रोव्हर घेताना देखील कंपनीतून, मित्र परिवाराकडून त्यांना विरोध झाला, ज्यावेळी या कंपन्यांची खरेदी झाली त्यावेळी या तोट्यात असणाऱ्या कंपन्या होत्या. या कंपनी घेऊन काय तुम्ही काय करणार हा प्रश्न सर्वांनी विचारला. आत्ता ज्यावेळी टाटा मोटर्स च्या कार पाहताना गाड्यांमधील बिल्ड क्वालिटी, टेक्नॉलॉजी, गाड्यांचे अंतर्बाह्य दिसणे यात फरक जाणवून येईल. त्याचबरोबर जगवॉर, लँड रोव्हर यांच्या व्यवसायात सुद्धा वृद्धी दिसत आहे. संयम, सातत्य, सर्वोत्तम करण्याची ओढ, अपयश आणि अपमानाने खचून न जाता त्यावर मात करणे हे सर्व गुण घेण्यासारखे आहेत.
दुसरी घटना. टाटा समूहाच्या मुख्यस्थपदी सायरस मिस्त्री यांची नेमणूक. सायरस मिस्त्री हे शापुरजी-पलोनजी ग्रुपचे मुख्यस्थ आहेत. आणि टाटा-मिस्त्री मध्ये नातेसंबंध आहेत. तसेच टाटा समूहामध्ये त्यांचे शेयर होल्डींग जास्त आहे. वस्तुस्थिती अशी आहे की टाटा समूहाला प्रगती पथावर येण्याच्या वेळेस शापुरजी-पलोनजी च्या आधीच्या मुख्यस्थांनी आर्थिक मदत केली होती, ज्याची परतफेड म्हणून टाटा समूहाने त्यांना जास्तीचे अधिकार देऊ केले होते. टाटा समूहाचे मूळ उद्दिष्ट हे व्यवसाय चालवणे हे आहे पण यातून नफेखोरी करणे नाही. उद्योग उभारून लोकांना रोजगार देणे, देशाच्या अर्थकारणाला बळकटी देणे, आवश्यकतेवेळी अशा व्यवसायातून देशासाठी सेवा पुरवणे हे मूलभूत तत्व आहेत. बरचसे असे उद्योग आहेत जिथून तोटा होतो पण टाटा ग्रुपने ते व्यवसाय फक्त कामगारांसाठी चालू ठेवलेले आहेत. टाटा ग्रुपमधील सर्व कंपन्यांचे सर्व नफा टाटा सन्स ला जातो. त्यातील काही भाग उद्योग वाढवायला ठेवून बाकी सर्व काही ट्रस्ट द्वारे (टाटांच्या वेगवेगळ्या नावे ट्रस्ट आहेत) समाजसेवी, लोक कल्याणकारी उपक्रमांमध्ये खर्च केले जातात. सायरस मिस्त्रींची नेमणूक झाल्यावर त्यांनी टाटा ग्रुपमधील तोट्यात असलेल्या कंपन्या बंद करणे अथवा विकणे हे धोरण अवलंबले, तेही टाटा सन्स ला विश्वासात न घेता. यामध्ये सायरस मिस्त्रींची आणखीन दूरगामी योजना म्हणजे या सर्व प्रकारची करणे दाखवून टाटा समूह तोट्यात आहे असं चित्र निर्माण करायचे आणि टाटा ग्रुप शापुरजी-पलोनजी मध्ये अधिग्रहण करायचे. या सर्व गोष्टींचा अंदाज आल्यावर टाटा सन्सने तात्काळ सायरस मिस्त्रींना बाहेरचा रस्ता दाखवला. राष्ट्रीय ट्रीब्युनल मध्ये दाद मागून त्याचा रीतसर निवाडा केला. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक मान्यता कधीही स्वार्थासाठी सोडायच्या नाहीत. व्यवसायात नावीन्य/ फायदा आणण गरजेचं आहे पण तत्व पणाला लावून नाही. म्हणूनच टाटा ग्रुप जगभरात प्रामाणिक व्यवसायबद्दल (ethical business) साठी प्रसिद्ध आहेत.
असे अनेक किस्से आहेत रतन टाटांचे आणि त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व प्रत्येक वेळेस झळाळून दिसतं. लिहाल, वाचाल आणि जेवढं विश्लेषण कराल ते कमीच आहे. शतशः नमन या थोर व्यक्तिमत्वाला.
धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा