बायकांच्या आणि पुरुषांच्या मनात हा मासिक विधी अपवित्र का मानला जात होता हे समजल असेल पण हे रक्त दुषित असत हे कोणत्या पिढीने मनात भरवलय माहित नाही. गर्भधारणा झाली तर याच रक्तावर हाडामासाचा देह पोसला जातो. तेव्हा मात्र हे रक्त खूप सकस आणि पोषक असतं. गर्भधारणा झाली नाही तर बाहेर पडणारे रक्त हे टाकाऊ असते पण दुषित नसते हे समजून घ्यायला हवाय जस रोज अन्नाचे पोट साफ होते म्हणजे शौच होते कारण ते शरीराला नको असते म्हणजे तो अन्नाचा भाग टाकाऊ असतो. जर काही infection झाले , आव झाली , जुलाब झाले तर ते शौच दुषित झाले असे आपण म्हणतो. टाकाऊ आणि दुषित यात खूप फरक आहे. आता तरी तो समजून घेऊ या.
विज्ञानातील संशोधनामुळे या गर्भपिशवीतल्या रक्यातील stem cells चा वापर करुन नवीन आवश्यक पेशी बनवण्यासाठी उपयोग करतात. नवनिर्माणाची ताकद या भागातील पेशींमधे असते म्हणून या पेशी काही आंतरराष्ट्रीय कंपन्या विकतही घेतात. शरीराच्या या भागात शिवशक्ती तत्वतील शक्तीतत्वाची ताकद आहे. समजून घ्या. नकारासाठी नकार नको. जरा विचार करा.आपण काय चुकतोय हे बघू या. पाप लागणे, दुषित रक्त, अपवित्रता या सर्व संकल्पनांचा नीट विचार करायाला हवा आहे . जुन्या काळात कोणत्या विचारातून , परिस्थितीतून या संकल्पना विचारात आल्या आणि आता हे सगळ आपण कोणत्या आधारावर पाळतोय. का स्वतःला निरर्थक जाच करतोय. मानसिकता बदलण खूप गरजेच आहे. परिस्थितीमुळे पाळल्या जाणाऱ्या किंवा सोईसाठी आखालेले काही उपाय पद्धती होऊन घट्ट झाले आहेत. हिंदू जीवन पद्धती विकसित होणारी, आणि कालानुसार योग्य उपाय शोधून पुढे जाणारी आहे. विकसित होण्याच्या तिच्या दृष्टिकोनाचा आदर करा. करायचं म्हणून करायचं. आम्ही नाही आमच्या आईवडिलांना प्रतिप्रश्न केले. गपचूप ऐका आणि करा. अशी मुस्कदाबी आपल्या हिंदू जीवन पद्धतीच तत्व नाही. मुलांना प्रश्न पडू डे.. तुमच्या कडे उत्तर नससतील तर तुम्ही ती शोधा आणि पुढील पिढीला सांगा. विवेक जागा ठेवा आणि काळानुसार विवेकनिष्ठ बदल करा हा आपला धर्म आहे. एक उदाहरण बघू. पूर्वीच्या काळात toilets नव्हती. घरापासून खूप दूर जाऊन हे विधी पार पाडावे लागत. थोडा काळ बदलला तसं परसदारी या प्रात: विधींसाठी चार भिंती बांधल्या गेल्या. अजून थोड्या काळानंतर घराच्या आतमध्ये टॉयलेट्स बांधली जाऊ लागली. असा बदल होत असताना अर्थातच यासाठी लागणारी वैचारिक बदलाची लढाई त्या त्या वेळेला लढावी लागली. पण बदल झाले. हा जसा प्रात: विधी तसाच स्त्रियांचा मासिक विधी असतो हा विचार का नाही करु शकत आपण.
⭐️स्वच्छता-
पूर्वीच्या काळी स्वच्छता या विचारातून स्त्रियांना बाजूला बसणे आवश्यक होते. रक्तस्त्राव शोषून घेणारी साधने पूर्वीच्या काळी उपलब्ध नव्हती. त्यामुळे हा सगळा पसारा सावरत घरभर फिरणे, काम करणे केवळ अशक्य होते. आपसुकच कोठेही न फिरता एका खोलीत बाजूला बसणे ही गरज बनली होती. थोड्या सोयी उपलब्ध झाल्यानंतरही हे एका खोलीत बसण आवश्यक होत कारण पूर्वीच्या काळात घरची कामं ही खूपच शारीरिक कष्टांची होती. अशा बाजूला बसण्यामुळे स्त्रियांना आरामही मिळू लागला. हा आराम फार काळ मिळाला नाहीच ,हळूहळू अशाही अवस्थेत धान्य निवडण्याची कामं अशा बायकांना देण्यास सुरवात झाली. आणि सोयीस्कर रीत्या या काळात अपवित्र ठरवलेल्या बाईचा स्पर्श धान्याला झाला तरी स्वीकारला जाऊ लागला . माणसाच्या सोईने पाप-पुण्य ,पवित्र - अपवित्र यांच्या सीमारेषा बदलत आल्या आहेत. कारण या संकल्पना मानवनिर्मीत आहेत. त्यामुळे बदलण्याचे copyrights माणसालाच आहेत. बदल करा कारण हा आपल्या हिंदू जीवन पद्धतीचा मुलभूत दृष्टीकोन आहे. फक्त हे बदल विवेकनिष्ठ आहेत का दडपशाही करणारे आहेत हे तपासायला हव. कायम आजही काही आदिवासी पाड्यात स्त्रिया पाण्यात उभ्या राहतात. दिवस अन रात्र. काही ठिकाणी मातीत बसतात. त्या मातीचे थर साचून infections होतात. समाजातील तळागाळापर्यंत आरोग्याच्या मूलभूत सोयी पोचायला हव्या आणि मनातील चुकीच्या संकल्पना स्वच्छ व्हायला हव्या
⭐️देवळात जायला मज्जाव-
थोड्या नंतरच्या काळात थोडी साधनं उपलब्ध झाल्यानंतर या चार दिवसातही बायका हिंडू फिरू शकत होत्या. अशा काळात देवळात न जाणे आणि मग हळूहळू घरच्या देवाच्या कार्यात सहभागी न होणे अशी बंधने बायकांवर आली. देवळात न जाणे ही त्या काळातली गरजेची गोष्ट होती कारण पूर्वी देवळं, मंदिरं घरापासून लांब असत. गर्द झाडी, रानवाटा पार करून मंदिरात जावं लागे. ह्या अशा भागात जंगली श्वापदांचा वावर असे. स्त्रियांना दर महिन्याला होणाऱ्या रक्तस्त्रावा मागचं कारण आपल्याला ठाऊक असलं तरी प्राण्यांसाठी ते केवळ रक्तच असतं. या रक्ताच्या वासामुळे ही श्वापदे माग काढत येत. त्यामुळे स्त्रियांच्या जीवाला धोका निर्माण होत असे. म्हणून या काळात देवळात न जाता घरात, खोलीत राहणं गरजेचे होते. पण घरातील कार्यात सहभागी न होण हा उगाच निर्माण केलेल बंधन होत. परंतु आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. अशा श्वापदांपासून कोणतीही भीती नाही. त्यामुळे सोवळेपणाची कारणं पुढे करून शुभकार्यात किंवा पूजेच्या कामात स्त्रियांना वर्ज्य ठरवणे हे वेगळ्या प्रकारचे अविवेंकी बंधनच आहे. नकारासाठी नकार आहे. देवळातला देव नाही म्हणत हळूहळू घरातल्या देवाजवळ नको, मग पूजा नको करत कोणत्याही कार्यक्रमात सहभाग नको अशी यादी वाढत गेली. विना अर्थाच्या, विना उद्देशाच्या पद्धती पडल्या. ज्या आजही पाळाव्या यासाठी मागची पिढी अतिशय हटवादी वागत आहे. मनातून सगळं पटत. पण बदल करायला जीव होत नाही. कोणताही बदल करताना अस्वस्थता येणारच. पण ती बदलाची वेळ निभावली की बघा कस सोपं होईल सगळं .
⭐️वाईट लहरी-
अजून एक समज असा आहे की या चार दिवसात स्त्रियांच्या शरीरातून वाईट लहरी बाहेर पडतात. हा बिनबुडाचा विचार आहे. सत्य अस आहे की या काळात रक्तस्त्राव होत असल्याने स्रियांचे ऊर्जावलय क्षीण होते, अशक्त होते. शरीरातून ३०-८० मि.ली रक्तस्त्राव झाल्यावर हे होणे स्वाभाविकच आहे. नाही का.? तो अशक्तपणा आहे. वाईट लहरी बाहेर पडतात हा चुकीचा विचार आहे. काही देवळात मूर्ती जागृत असतें. अशा देवळात आल्यावर माणस खूपदा काही ना काही त्रासातून सोडवं असा सांगतात. यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असतें. तसच देवळाभोंवती मृत्युनतंर गती न मिळालेले जीव येतात. गती मिळावी या आशेने तिथल्या वातावरणात थांबतात. त्यांच्या नकारात्मक लहरी त्या वातावरणात असतात. या लहरी अशक्त आणि दुर्बल ऊर्जावलंय असणाऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक होऊ शकतात. मासिक विधीच्या काळात ऊर्जावलंय थोडं क्षीण होत..दिवस राहिलेले नसले तरी शरीरातील बीजांवर आणि गर्भाशयावर त्याचा विपरीत परिणाम होईल जो पुढच्या पिढीला भोगावा लागेल या भीतीने याबाबतीत विचार केला गेला. ऊर्जावलंय सशक्त असेल तर कोणताही त्रास होणार नाही पण हे सशक्त आहे का अशक्त हे कस समजणार म्हणून हा सरसकट नियम केला गेला. म्हणून स्त्रियांनी या काळात या भागात येऊ नये अस बंधन आजही काही ठिकाणी आहे. आपल्याकडे पुरुष हा कायम कणखर मानला जातो. पण हे कथाकदंबरीत वर्णन म्हणून ठीक आहे. प्रत्यक्षात अस नसतं. पुरुषात शारीरिक ताकद आणि स्त्रीमध्ये मानसिक ताकद जास्त असतें आणि दोन्हीच महत्व सामान आहे. त्यामुळे अशक्त आणि दुर्बल ऊर्जावलंय असणाऱ्या पुरुषांनी सुद्धा अशा मंदिरात जाऊ नये. मानसिक आणि शारीरिक सशक्त असणाऱ्या स्त्री किंवा पुरुषांना अशा मंदिरात जाऊन कोणताही त्रास होण्याची शक्यता कमी असतें. पण असे असले तरी बायकांपुरता हा नियम ठसावला गेला आणि पद्धत म्हणून रुजला. स्त्रियांच्या मनात तुम्हाला पाप लागेल या भितीचे खुंट इतके घट्ट केले आहेत की डाॕक्टर ,वकील, CA, इंजिनिअर झालेल्या बायकांची विवेकनिष्ठ विचारशक्ती, Rational thought process संपून जाते. एकंदरीत लादलेल्या सर्व बंधनांच्या कारणांचा विचार करता आता ही बिनबुडाची बंधने संपायला हवीत. अभ्यापूर्वक विचार करुन पूर्वजांनी परिस्थितीवर शोधलेले त्यावेळेस योग्य असणारे पण आता अयोग्य असणारे उपाय पायातल्या आणि बुद्धीच्या बेड्या बनले आहेत. ते तोडायला हवेत. आताच्या काळात स्वच्छता ठेवण्यासाठी अनेक सोयी आहेत. ह्या काळात बायका घरातील सर्व कामे ,नोकरी, प्रवास, खेळ सर्व काही करतात. अशा सर्व गोष्टी करण्यासाठी समाजाने आता मोकळीक दिली आहे. कारण बायका जर चार दिवस बाजूला बसल्या तर ही कामं कोण करणार? समाजाने लगेच इथे copyright वापरलाय. खरंच काय कमाल आहे ना ! देवाने दिलेले निसर्गचक्र मानवनिर्मित गोळ्या घेऊन मोडायचे. का? तर देवाने दिलेल देवालाच आवडणार नाही आणि हे सगळं माणसानीच ठरवायच.
या गोळ्या घेऊन उत्सर्जनासाठी योग्य झालेला भाग पोटात तसाच साठवायचा, दाबून ठेवायचा. तो साठवल्याने होणारा त्रास सहन करायचा आणि सर्व पूजा परंपरा कशाबशा पार पाडायच्या. आणि वर परत म्हणायचे की देवाला चालत नाही म्हणून गोळ्या घेतल्या. उलट निसर्गचक्र विस्कळीत केले हे त्याला मुळीच आवडत नसणार, तो देव रागवत असेल हे लक्षात का येत नाही आपल्या? कोणत्याही देवाने माणसाच्या कानात अस सांगितल्याच ऐकिवात नाही की " मला हे पाळी असताना पुजा केलेल आवडत नाही. तरी बायकांनो गोळ्या घ्या" देवाच्या नावावर आपण वाट्टेल ते खपवतो. पंढरपूरच्या वारीत स्त्रिया पाळी आली तरी वारी सोडत नाहीत. ती नित्याप्रमाणे पूर्ण करतात. अनेक देवदेवतांनी मनुष्य अवतार घेतला अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज, साईबाबा यांनी या विषयात समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न केलेला आहे. सगळं माहिती असत पण डोळेझाक करायचीच म्हणाल्यावर कस होणार. खरंतर देवाचे, अद्वैताचे आपल्या प्रत्येक भक्ताकडे नीट लक्ष असते. तुमची शारीरिक अवस्था ही देवानेच तुम्हाला दिलेली आहे. ती अवस्था जपणे ,त्याची योग्य काळजी घेणे हेच त्याला खरतर आवडेल. या नैसर्गिक विधींमध्ये बदल करणे , त्यांना दुषित मानणे देवाला कधीच आवडणार नाही. आपल्या चार वेदांपैकी एकाही वेदात या पाळीच्या काळात स्त्री दुषित होते, अपवित्र होते असे लिहीलेले नाही.तिने बाजूला बसाव असा सांगितलेलं नाही. वैज्ञानिक, धार्मिक, आणि व्यवहारी सर्वच बाजूंनी विचार केलाय आपण. आता अंगवळणी पडलेली सवय बदलू या. नुसता विचार पटून उपयोग नाही तर तो कृतीत ही यायला हवा. मानवी डोक्यातून आलेल्या पद्धतींमुळे नैसर्गिक प्रवाह दाबणे हा एक घोर अपराध आहे.
या पुढे गोळ्या घेणं बंद, शरीराला त्रास देणं बंद, आणि स्वतःला अपवित्र मानणं ही पूर्णपणे बंद. देवावर मनापासून प्रेम करूया.चार दिवसांचा बाऊ करत पाप लागण्याची भीती डोक्यात ठेवून कॉंट्रासेप्टिव्ह घेऊ नका. शरीराला छळू नका. पाळी चालू असतानाही शुभकार्यात बिनधास्तपणे जा, देवळात जा, मनोभावे पूजा करा. देवाने जे दिले आहे त्याचा आदर करु या. तिरस्कार नको. काही ठराविक देवळात काही अनुभवांचा अभासपूर्ण पद्धतीने विचार मांडलेला असेल तर आजारी असताना, पोटात गर्भ वाढत असताना किंवा काही आजाराने अशक्त अवस्था असणाऱ्या स्त्रीने आणि मनाने, तब्येतीने अशक्त असणाऱ्या पुरुषांनी सुद्धा अशा देवाळात जाऊ नये. चला तर मग
सर्व सण उत्साहात, बंधनमुक्त ,मोकळेपणी साजरे करूया.
गणपती बाप्पा मोरया !
©रेश्मा जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा