शुक्रवार, २ जून, २०२३

383. पती-पत्नीमधील सुंदर संवाद...

 मी एक दिवस माझ्या पत्नीला विचारले, "मी तुला रोज घालूनपाडून बोलतो, अपमान करतो, तरीही तू नवऱ्याच्या भक्तीत गुंतलेली आहेस. मी मात्र कधीच पत्नी-भक्त होण्याचा प्रयत्न करत नाही!."
मी वेदाचा अभ्यासक आहे आणि माझी पत्नी विज्ञानाची! पण तिची अध्यात्मिक शक्ती माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, कारण मी फक्त वाचतो, आणि ती आयुष्यात तेच पाळते.
माझ्या प्रश्नावर ती फक्त हसली आणि ग्लासात पाणी देताना म्हणाली,
"मला सांग, मुलाने आईची सेवा केली तर त्याला मातृभक्त म्हणतात, पण आईने कितीही सेवा केली तरी तिला पुत्र-भक्त म्हणतं का कोणी?"
आज तिने पुन्हा एकदा मला निरुत्तर केलं होतं.
मग मी विचारलं, "मला सांग, जग निर्माण झाले तेव्हा स्त्री-पुरुष समान होते. मग पुरुष कसा मोठा झाला? स्त्री तर शक्तीचे रूप आहे."
ती हसत हसत म्हणाली, "तू थोडं सायन्स शिकायला हवं होतंस."
मी हादरलो.
ती म्हणू लागली, "जग फक्त दोन गोष्टींनी बनले आहे...ऊर्जा आणि पदार्थ.
पुरुष उर्जेचे प्रतीक आहे आणि स्त्री वस्तूचे प्रतीक आहे.
जर पदार्थांची वाढ व्हायची असेल तर त्याला ऊर्जेचा आधार घ्यावा लागतो.
तसंच...
जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला आपलंसं करते, तेव्हा ती शक्तीचे रूप बनते आणि पुढच्या पिढ्यांसाठी, म्हणजेच तिच्या मुलांसाठी पूजनीय बनते, कारण ती पदार्थ आणि ऊर्जा या दोन्हीची स्वामीनी असते. याउलट, पुरुष फक्त ऊर्जा बनूनच राहतो."
मी पुन्हा म्हणालो, "मग तू माझ्यासाठीही पूजनीय झालीस ना, कारण तू ऊर्जा आणि पदार्थ दोन्हीची मालकीण आहेस."
आता ती लाजत म्हणाली, "तुम्ही सुशिक्षित मूर्खांसारखे बोलत आहात. तुमच्या ऊर्जेचा एक भाग मी घेतला आणि मी ताकदवान बनली, मग ती शक्ती मी परत तुमच्यावरच वापरावी का? ती कृतघ्नता होणार नाही का?"
मी म्हणालो, "मी तुझ्यावर माझ्या शक्तीचा वापर करतो, मग तु का नाही?"
तीचे उत्तर ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले.
ती म्हणाली, "ज्याच्या संपर्काने मला नवे जीवन निर्माण करण्याची क्षमता दिली आहे आणि मला आई नावाचे जे स्थान मिळाले आहे त्याच्याविरुद्ध मी बंड करू शकत नाही."
मग मला चिडवत ती म्हणाली, "मला शक्ती वापरायचीच असेल, तर मला काही करण्याची गरजच काय? मी माता सीतेसारखे लवकुश जन्माला घालीन, जे माझ्या अपमानाचा हिशेब चुकता करतील."
सर्व मातृशक्तींना वंदन, ज्यांनी संपूर्ण सृष्टीला आपल्या प्रेमाने आणि सन्मानाने बांधले आहे.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...