बुधवार, २१ जून, २०२३

409. माणुस कधीही बदलू शकतो...

        फक्त स्वत:वरच्या विश्वासाला जिवंत ठेवलं पाहिजे. सोलापुरच्या करमाळा गावचा वडार समाजाचा मुलगा. ज्याला ७ वी च्या आतच दारू प्यायची सवय लागली नंतर गांजा, बिड्या ओढणे, अश्लील चित्रपट पाहणे.. पुर्णतः वाया गेलेला. ७ वीत असतांना ६ वी तील एक मुलगी आवडायला लागली. त्याचा नालायकपणा मुलीला कळेल म्हणून घाबरू लागला.. विचार बदलू लागले. १० वीत नापास झाला.. रिकामा वेळच वेळ.. वाचनाचा नाद लागला.. मिळेल ते पुस्तक. कोणा एकाकडून 'मृत्युंजय' हाती लागलं. त्याच्या कडून कळालं अशी पुस्तके लायब्ररीत मिळतात. तेव्हा गावची लायब्ररी गाठली. सगळी पुस्तके वाचुन काढली. विचारांचा वेग वाढला. स्वतःची तुलना सुरू झाली. अगदी रामायण-महाभारतातल्या राक्षसापर्यंत.. बदलाची गरज तीव्रतेने जाणवू लागली. शिक्षण सुरु झाले. पोलीस भरतीस प्रयत्न. राजकीय पक्षात प्रवेश. अनेक दंगलीत सहभाग.
      पुन्हा वैचारिक बदल..एम.ए.मराठी साहित्य पुर्ण.. पुढे communication studies ची master degree पूर्ण.. कविता लिहू लागला..एक शाँर्ट फिल्म बनवली....नंतर एक सिनेमा बनवला.. दिग्दर्शक बनला. अजुनही प्रवास सूरूच आहे... मी एवढं सगळं ज्या व्यक्तीबद्दल लिहले . ती व्यक्ति म्हणजे "६१ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट- फँड्री" चे दिग्दर्शक "नागराज मंजुळे"
    भविष्यात कुणीतरी मोठं माणूस बनण्यासाठी आपलाही भूतकाळ असाच असावा असे अपेक्षित नाही. "लहानपणी कसे होतो यावरून भविष्याचा अंदाज बांधू नका, बदलाला वाव दिला पाहिजे. माणुस कधीही बदलू शकतो. फक्त स्वतःवरच्या विश्वासाला जिवंत ठेवलं पाहिजे.

- अभिव्यक्तीच्या सौजन्याने.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...