बुधवार, २१ जून, २०२३

407. आज कालचे तरुण मुलं मुली...

 आज कालचे तरुण मुलं मुली.. कोणावर विश्वास ठेवून बाहेर जाऊन. स्वतःचं कुटुंब गमवत आहेत. हे कशासाठी तुम्हाला आई-वडील शिक्षणासाठी बाहेर ठेवतात. अधिकारी म्हणून तुमची निवड होते. तुम्ही घरच्यांना न विचारता. मैत्रीण  मित्र कशाला हवेत हाच धोका टाळायचा असेल तर आपले कुटुंब आई-वडील यांच्यावर विश्वास ठेवा नाहाक. तुमचा बळी जाऊ देऊ नका. आई-वडिलांना आपली मुलगी आपला मुलगा महत्त्वाचा असतो तुम्ही गेल्यानंतर त्यांचे काय हाल होतात ते पाहवत नाहीत.
      मुलीने अधिकारी होण्यासाठी वनवास भोगला. दोन वर्ष अभ्यासासाठी स्वतःला घरात कोंडुन घेतले. संपूर्ण गावाने अधिकारी झाल्यावर तिचा सत्कार केला. पण गुणी मुलगी अर्ध्यावर सोडुन गेली. तीच्या सोबतच मला पण सरणावर जाळा...हे आर्त स्वर आहेत कोपरगावच्या स्व. दर्शना पवारच्या आईचे". नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा राज्यात सहाव्या क्रमाकांने उत्तीर्ण झालेली व वनक्षेञ अधिकारी R.F.O. ची पोस्ट मिळालेली. कोपरगाव जि. अहमदनगर येथील स्व. दर्शना दत्तु पवार वय २६  ही मुलगी पुण्यात वेल्हे राजगडाच्या पायथाशी मिञा बरोबर ट्रेकिंगला गेली आणि परत आलीच नाही. तीचा मृतदेह काल राजगडाच्या पायथाशी आढळला.
        पुण्यात एका संस्थेने सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यासाठी ती पुण्यात मैञिणीकडे सिंहगड रोड येथे राहण्यास गेली. तेथे एका मिञा बरोबर राजगडला फिरायला जाते असे म्हणुण मैञिणीला सांगुन गेली असता तिकडेच तिचा खुन झाल्याचे समजले. तिचा कुजलेला मृतदेह मोबाईल, पर्स राजगडाच्या पायथाशी आढळला.तसेच तो मिञ गायब झाल्याने त्याच्यावर संशय असुन पुढील तपास पुणे ग्रामिण पोलिस करत आहेत. कोपरगावची दर्शना पवार अभ्यासात अतिशय हुशार होती. पण घराच्या बाहेर पडल्यावर मुलींनी कुणावर किती विश्वास ठेवायचा? हा मोठा प्रश्न यानिमित्ताने तयार झाला आहे.
         हल्ली बाहेर मैञीच्या नावाखाली अनेक मुलींची फसवणुक होते आहे. त्या अत्याचाराला बळी पडतात. आपला जीव गमावुन बसतात. आज पुण्या सारख्या शिक्षणाचे माहेरघर असलेल्या ठिकाणी तरूण पिढी मोठया प्रमाणात भरकट चालली आहे. मिञ मैञिणी बरोबर बाहेर फिरायला जाणे.विविध व्यसने करणे. पबच्या नावाखाली तोकडे कपडे घालुन राञभर दारू पिऊन बिभत्स नाचणे. मैञीच्या नावाखाली आपले सर्व शौक पुर्ण करणे. अशा पद्धतीने तरूण पिढी वाया जात आहे. आईवडिल विश्वासाने घराबाहेर पाठवतात पण त्यांच्या मागे काय प्रकार होतात? आपन कोणाबरोबर मैञी करतो हे आपन विसरता कामा नये. नाही तर अनोळखी मिञा बरोबर जास्त विश्वास हा कधी कधी घात केल्याशिवाय राहत नाही हे यानिमित्ताने तरूण पिढीने व मुलीनी लक्षात ठेवले पाहिजे.
       ग्रामीण भागातले आई वडील मुलांच्या शिक्षणासाठी अतोनात कष्ट सहन करून पुण्यासारख्या ठिकाणी मुलांना पाठवतात. या मुलांनी आपल्या आई-वडिलांची तरी कमीत कमी जाणीव ठेवायला पाहिजे. मुले इकडे काय करतात ते आई-वडिलांना कसे काय समजणार? ते बिचारे फक्त पैसे पाठवायचे काम करत असतात . नसती थेरे करायला पूर्ण आयुष्य पडलेले आहे. या वयात शिकायचे सोडून असले धंदे कशाला मुलांनी करायचे . ही पिढी वाहवत चालली आहे हे मात्र अगदी खरे आहे. देव सर्वांना सुबुद्धी देवो.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...