"आज जर त्या बाईचा निकाल लावला नाही तर नावाची 'सरिता' नाही मी! माझ्या लग्नाला दहा वर्षं झाली, कपाळाचं कुंकू जपलं, पण आज माझ्याच घरातून, माझ्याच तिजोरीतून माझ्या सासूबाईंची सोन्याची पाटली गायब झालीया... आणि ती कुणाकडे गेली हे मला चांगलंच माहितीये! त्या नदीकाठच्या 'मंजुळा'साठी माझं सोनं विकणाऱ्या माझ्या नवऱ्याला आज जाब विचारल्याशिवाय ऱ्हायची नाही मी."
सरिताने रागाने डोळे पुसले आणि अंधारात कंदील घेऊन ती घराबाहेर पडली.
कोल्हापूर जवळचं एक सधन गाव. गावात सरपंचांचा मुलगा म्हणून 'प्रतापराव' यांची मोठी इज्जत होती. घरात सरितासारखी लाखमोलाची बायको आणि दोन मुलं. पण गेल्या सहा महिन्यांपासून प्रतापरावांचे वागणे बदलले होते. ते कोणालाही न सांगता अधूनमधून गायब व्हायचे. घरातून कधी पैसे, तर कधी धान्य कमी व्हायचं.
सरिताला संशय होताच, पण आज तर हद्द झाली होती. कपाटातून सासूबाईंची आठवण असलेली सोन्याची पाटली गायब होती. सरिताला पक्की खबर मिळाली होती की, नदीच्या पलीकडे झोपडीत राहणाऱ्या 'मंजुळा' नावाच्या एका परक्या बाईला प्रतापराव भेटायला जातात. लोकांच्या तोंडी चर्चा होती की, ती बाई खूप गरीब आहे आणि प्रतापराव तिच्यावर पैसे उधळत आहेत.
आज राखी पौर्णिमा होती. अख्खं गाव सण साजरा करत होतं, पण प्रतापराव घरात नव्हते. सरिताला समजलं की ते नदीकाठी गेले आहेत. रागाच्या भरात ती नदीकाठच्या त्या पडक्या झोपडीजवळ पोहोचली.
तिथे जे दृश्य दिसलं, ते बघून सरिताच्या अंगाचा तिळपापड झाला.
प्रतापराव त्या बाईच्या (मंजुळाच्या) समोर बसले होते आणि स्वतःच्या हाताने ती सोन्याची पाटली तिच्या हातात देत होते. ती बाई रडत होती आणि प्रतापरावांचे हात हातात घेऊन काहीतरी बोलत होती. सरिताला वाटलं, हेच ते पाप! तिने रागाने दरवाजा लोटला आणि आत घुसली.
"वाह रे कारभारी! घरी बायको पोरांना सोडून या परक्या बाईचे लाड पुरवतायसा? आणि ते ही माझ्या सासूच्या दागिन्यांनी?"
सरिता वाघिणीसारखी ओरडली. ती मंजुळाच्या अंगावर धावून गेली. "ए मे*ली, तुला लाज वाटली नाही का ग? दुसऱ्याचा संसार मोडताना? आज तुझा जीवच घेते बघ."
मंजुळा घाबरून कोपऱ्यात सरकली. प्रतापराव ताडकन उठले आणि त्यांनी सरिताचा हात पकडला.
"सरिता ! खबरदार तिला बोट लावलस तर ! ती परकी नाही... ती माझी सख्खी बहीण आहे!"
प्रतापरावांच्या या वाक्याने सरिता जागीच थिजली.
"काय? बहीण? पण तुमच्या घरात तर कुणीच बहीण नाही, असं तुम्ही सांगितलं होतं."
प्रतापरावांचे डोळे भरून आले. ते बोलू लागले,
"सरिता, ही मंजुळा. माझी धाकटी बहीण. पंधरा वर्षांपूर्वी तिने एका दुसऱ्या जातीच्या मुलाशी प्रकाशशी प्रेमविवाह केला होता. आपल्या बाबांचा (सरपंचांचा) जातीचा अभिमान आडवा आला. त्यांनी मंजुळाला घरातून हाकलून दिलं आणि सांगितलं की, 'आजपासून आमची मुलगी मे*ली'. त्यांनी जिवंतपणी तिचं श्राद्ध घातलं आणि मला शपथ घातली की मी कधीच हिचं तोंड बघणार नाही."
प्रतापराव पुढे म्हणाले, "मी बाबांच्या शब्दापुढे लाचार होतो. पण सहा महिन्यांपूर्वी प्रकाशचा (मंजुळाच्या नवऱ्याचा) कॅ*न्स*रने मृ*त्यू झाला. ही पोरगी रस्त्यावर आली. लहान लेकराला घेऊन ती नदीकाठी या झोपडीत राहू लागली. मला जेव्हा कळलं, तेव्हा भावाचं काळीज राहवलं नाही ग."
मंजुळाने रडत सरिताचे पाय धरले. "वहिनी, दादाचा काहीच दोष नाही. मीच त्याला सांगितलं होतं की कुणाला काही सांगू नकोस, नाहीतर बाबा तुम्हाला पण घराबाहेर काढतील. प्रकाशच्या इलाजात सगळं गेलं ओ... आज माझ्या लेकराला ताप आलाय, दवाखान्याला पैसे नव्हते म्हणून दादाने..." तिने ती सोन्याची पाटली सरिताच्या पायावर ठेवली. "हे घ्या तुमचं सोनं. मला नको. फक्त माझ्या दादाला दोष देऊ नका. आज राखी पौर्णिमा होती, म्हणून दादा आला होता."
सरिताच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ज्याला ती अनैतिक संबंध समजत होती, ते तर र*क्ताच्या नात्याची आर्त हाक होती. एका भावाने बापाच्या भीतीने लपवून ठेवलेलं हे पवित्र नातं होतं. तिला स्वतःच्या संकुचित विचारांची लाज वाटली.
पण खरी कथा इथेच संपत नाही. सरिताचा चेहरा बदलला. ती रडली नाही, तर तिचे डोळे एका वेगळ्याच निश्चयाने चमकू लागले. सरिताने खाली वाकून ती सोन्याची पाटली उचलली. प्रतापरावांना वाटलं ती आता पाटली घेऊन घरी जाईल. पण सरिताने ती पाटली पुन्हा मंजुळाच्या हातात दिली. आणि वरून स्वतःच्या गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र काढून मंजुळाच्या हातात ठेवलं.
"सरिता, हे काय करतेस?" प्रतापराव ओरडले.
सरिता करारी आवाजात म्हणाली,
"हे मंगळसूत्र माझ्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी आहे. आणि माझ्या नवऱ्याचं आयुष्य, त्याचा जीव त्याच्या बहिणीत अडकलाय. जर बहीण उपाशी असेल, तर भावाच्या सुखाला काय अर्थ?"
सरिता मंजुळाचा हात पकडून तिला उठवत म्हणाली, "चल मंजू."
प्रतापराव घाबरले, "अगं पण कुठे? बाबांना कळलं तर..."
सरिताने पदर खोचला आणि म्हणाली,
"कारभारी, बाबांना कळू द्या ! आजवर तुम्ही 'मुलगा' म्हणून कर्तव्य निभावलंत, आता मी 'सून' म्हणून निभावणार. ज्या घरात लेकीला जागा नाही, त्या घरात या सरिताला तरी काय मान मिळणार? आज राखी पौर्णिमा आहे. आज या बहिणीची ओवाळणी इथे या झोपडीत नाही, तर वाड्याच्या मुख्य दरवाजातून होणार."
सरिताने मंजुळाला आणि तिच्या लेकराला सोबत घेतलं.
"जोपर्यंत मंजुळाला तिचा हक्क आणि सन्मान मिळत नाही, तोपर्यंत मी सुद्धा वाड्यात अन्नपाणी घेणार नाही. बघूया गावचे सरपंच आपल्या र*क्ताला नाकारतात की सुनेच्या जिद्दीपुढे झुकतात."
त्या रात्री सरिताने मंजुळाला वाड्यात नेलं. सरपंचांचा राग, गावाचा विरोध, या सगळ्याला ती एकटी पुरून उरली. कारण तिच्या मनात आता संशय नव्हता, तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीसाठी घेतलेला ठाम निर्णय होता. प्रतापरावांनी चोरून जपलेलं नातं, सरिताने उजळ माथ्याने जगासमोर स्वीकारलं होतं.
नाती जपण्यासाठी फक्त र*क्ताची गरज नसते, तर कधीकधी एका खंबीर 'मनगटाची' आणि समजूतदार 'जोडीदाराची' गरज असते. 💯🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा