काही मित्रांबाबत मी घेतलेला अनुभव शेअर करत आहे. एका मित्राला वडिलोपार्जित बंगलो मिळाला त्यासाठी त्याला फार काही कष्ट घ्यावे लागले नाहीत अर्थात हे त्याच्या कर्मानुसार.. पण एखाद्या मित्राकडे एक छोटा फ्लॅट आहे आणि त्यासाठी त्याच्या घरुन किवा सासरहुन एकही रुपया मिळाला नाही किवा त्याने घेतला नाही .. पण घर बुक करण्यापासून ते चमचावाटी खरेदी पर्यंत त्याने स्वकष्टाने केले तो त्याचा जो आनंद आहे तो वडिलोपार्जित बंगलो मिळणाऱ्या मित्राकडे नाही.. लहान घर घेताना बॅंकामधे मारलेल्या फेऱ्या असतील किवा हाफ्ते भरताना तोंडाला आलेल्या फेसाचे किस्से सांगताना जो काही आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो ना तो आयता बंगला मिळालेल्याकडे नाही.. ना त्याच्याकडे सांगायला काही किस्से. उलट त्याला सांगावे लागते कि हे घर वडिलांचे आहे.. पण लहान घरवाला अभिमानाने सांगतो कि एकही रुपया कोणाकडून न घेता हे मी घेतले आहे. कधीही कोणाशी तुलना करु नये.. कुठल्याही बाबतीत.. त्याचं घर मोठं म्हणुन लहानघरवाला त्याला घरी बोलवायला बिचकतो आणि तिथे गैरसमज होतात.. त्याला वाटतं कि हा कधीच घरी ये म्हणत नाही.. काही लोकांना इतकी घाणेरडी सवय असते कि फ्लॅट किती बेडरुम आहे विचारयचे.. हे असं कधीही कोणालाही विचारु नये.. स्केअरफीटवर माणसाला कधीही जज करु नये..त्याचे विचार कसे आहेत , त्याची वृत्ती कशी आहे हे महत्वाचे..शिक्षण ,विचारसरणी यात कुठेही किती बेडरुम फ्लॅटची तुलना होवु शकत नाही.. काही ठिकाणी तर बंगलो असतो पण त्यात फार जागाही नसते किवा त्या व्यक्तीच्या मनातही कोणासाठी जागा नसते.
म्हणजेच सगळे बंगलेवाले असे असतात का ?? अजिबात नाही.. गैरसमज कसे होतात तर असे होतात आणि त्यातून नाती फार डेव्हलप होत नाहीत..आपल्याला मिळणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या कर्मानुसार मिळते.. मग ती माणसे असोत.. अगदी कामवाली बाई सुध्दा किवा आपले घर.. ती जागा.. मित्रपरिवार.. नातेवाईक .. मुलं.. नवराबायको सगळं आपल्या कर्मानुसार मिळतात.. नाहीतर भरपूर पैसे असलेला व्यक्ती काहीही विकत घेउ शकला असता किवा कुठेही कधीही जाऊ शकला असता.. अगदी एअरपोर्टवर जाऊन अनेक मंडळी परत आली आहेत.. आज रिटायर झालेला माणूस पुढच्या महिन्यात लेकाकडे अमेरिकेला जाणार असतो पण तो त्याच दिवशी हार्टॲटॅकने जातो. ही ओळखीत घडलेली घटना आहे.. वास्तु मोठी असण्यापेक्षा पॉजीटिव्ह एनर्जी देणारी हवी.. त्यासाठी खर्च केलेला पैसा हा प्रामाणिकपणे मिळवलेला हवा म्हणजे तिथे सुख नांदतं.. आज अनेक मोठ्या घरात सतत आजारी लोकही दिसतात.. याउलट लहान घरात आनंदीही दिसतात.. आपल्या लहान घरात बोलवायची लाज वाटायचं काहीही कारण नाही.. उलट ते नीटनेटकं ठेवून , सजवलेलं असेल तर कोणालाही आवडतं.. अमक्याचं मोठं घर म्हणुन तो आपल्या लहान घरात येणार नाही हा निव्वळ गैरसमज आहे.. आपली मानसिकता कशी आहे त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.. एका कुठल्याही व्यक्तीला सगळं कधीही मिळत नाही.. कोणाकडे सौंदर्य , कोणाकडे बुध्दी, कोणाकडे पैसे.. कोणाकडे पर्स्नॅलिटी.. कोणाकडे आरोग्य.. आपल्याला काय हवं आणि आपली योग्यता यानुसार आपल्याला ते मिळतं.. आहे त्यात आपण समाधानी असु तर नैराश्य येत नाही.. माझ्या एका मित्राचं खुप मोठं घर आहे पण त्याला माझ्या घरी जास्त आनंद मिळतो.. तो नेहमी म्हणतो इथे जे आहे ते माझ्या घरात नाही सोनल.. याला अनेक कारणे आहेत.. एकतर माझ्या घरात कायम हरिनाम सुरु असतं.. मांसाहार येत नाही... घरात भांडणं , चिडचिड नाही.. सतत काहीतरी वाचन किवा अभ्यास सुरु असतोआणि येणारेजाणारे खुप सतत असतात त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घरात असतात.. अनेक माउ येत जात असतात.. सकाळचे कोवळे उन घरात बागडत असतं.. कोणाकडे काय आणि किती आहे हे पहायला मला वेळ नाही आणि स्वभावही नाही.
सतत व्यस्त राहिलो कि फालतु गोष्टी डोक्यात येत नाहीत आणि मानसिक / शारीरिक आरोग्यही उत्तम रहातं..
सतत व्यस्त राहिलो कि फालतु गोष्टी डोक्यात येत नाहीत आणि मानसिक / शारीरिक आरोग्यही उत्तम रहातं..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा