सून : लंच झाला आई?
सासू : ते राहू दे, तू गोळ्या घेतल्या का?
सून : हो, घेतल्या.
सासू : विकनेस जाणवतोय?
सून : थोडासा.
सासू : अजिबात ताण घ्यायचा नाही. आपलं काही अडलेलं नाहीये त्या जॉबशिवाय.
सून : पहिलाच दिवस आहे ना, म्हणून..
सासू : समजू शकते बाळा.
सून : तुम्ही काय करताय?
सासू : माझ्या लाडूचा अभ्यास घेतेय.
सून : त्रास देतोय?
सासू : अजिबात नाही.
सून : थोडं बोलायचं होतं.
सासू : संध्याकाळी घरी आल्यावर बोल ना.
सून : नाही.
सासू : का बरं?
सून : ते समोरासमोर बोलण्याचं माझं धाडस नाही होणार.
सासू : बरं बोल.
सून : तुम्हाला आठवतंय?
सासू : काय?
सून : मी लग्न होऊन आपल्या घरी आले, त्यादिवशी तुम्ही पहिलं वाक्य काय उच्चारलेलं?
सासू : नाही आठवत.
सून : तुम्ही म्हणाल्या होतात की..
सासू : काय?
सून : तू माझी सुनबाई जरी असलीस, तरी जन्मभर तुला मुलीसारखं वागवेल.
सासू : हो.
सून : आई तुमच्या त्या वाक्यावरून मी तुमची खिल्ली उडवली होती.
सासू : म्हणजे?
सून : म्हणजे मी माझ्या ताईला म्हणाले होते की, सासू फिल्मी डायलॉग मारतेय.
सासू : नाही गं बाई, मी अगदी मनापासून बोलले होते.
सून : आई तेव्हा तर माझ्या डोळ्यावर झापडं होती.
सासू : कसली?
सून : गैरसमजाची..
सासू : का बरं?
सून : माझी ताई कायम तिच्या सासूच्या कागाळ्या आईकडे करायची.
सासू : मग?
सून : म्हणूनच एक सासू कायम व्हिलन असते, असच कायम नकळत माझ्या मनावर बिंबवलं गेलं.
सासू : होतात गैरसमज.
सून : आणि मग लग्नाच्या अवघ्या आठवडाभरातच..
सासू : काय?
सून : मी रंग दाखवायला सुरुवात केली.
सासू : कसले रंग?
सून : ऑफिसला वेळेत पोहचण्यासाठी ह्यांना सकाळी लवकर घराबाहेर पडावं लागायचं.
सासू : बरोबर.
सून : त्यासाठी लवकर उठून त्यांचा टिफिन बनवावा लागायचा.
सासू : हो. सकाळी ५ वाजता उठून.
सून : मी सुरुवातीचे काही दिवस सकाळी लवकर उठले.
सासू : मात्र त्यानंतर काही दिवसांनी तू लवकर उठत नसल्याने..
सून : टिफिन न घेताच हे ऑफिसला जायचे.
सासू : हो. कँटीनमधल्या जेवणाने त्याला पित्ताचा त्रास व्हायचा.
सून : म्हणून मग तुम्ही सकाळी लवकर उठून त्यांना टिफिन द्यायला लागलात.
सासू : तुम्ही दोघं माझीच लेकरं, मग मीच तुम्हाला समजून घेणार ना.
सून : हो. मात्र त्यातही मला दोषच दिसला.
सासू : म्हणजे?
सून : मी आईला सांगितलं की, सासू मुद्दामहून खूप काम करण्याचं नाटक करते.
सासू : तसं नव्हतं.
सून : हो. तेव्हाही तुम्ही आमच्या काळजीपोटी सर्वकाही सहन केलं.
सासू : हेच बोलायचं होतं का?
सून : नाही.
सासू : मग?
सून : तुम्ही कायम मला फास्टफूड खाण्यापासून रोखायच्या.
सासू : हो. कारण तू सतत त्या ॲपवरून काही ना काही ऑर्डर करत असायची.
सून : कधी पिझ्झा, कधी बर्गर, तर कधी पाव भाजी..
सासू : हो. त्यामुळेच तुझं वजन वाढलेलं.
सून : त्यावरून आपल्यात मोठं भांडण झालेलं.
सासू : हो, माझ्या टोकण्याचा तुला खूप राग आलेला.
सून : रागाच्या भरात मी तेव्हा तुम्हाला, सातवी पास अडाणी म्हणाले होते.
सासू : मला अभिमान वाटतो की, माझी सून डबल ग्रॅज्युएट आहे.
सून : आई तेव्हाही तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला.
सासू : राग वाईट असतो बेटा.
सून : ऑफिसवरून घरी आल्यावर, मी कायम हातात मोबाईल घेऊन बसायचे.
सासू : माझी इच्छा असायची की, तू आमच्याशी गप्पा माराव्या.
सून : मला मात्र तेव्हा स्टेटस ठेवणं आणि इतरांना मेसेज करणं अधिक महत्वाचं वाटायचं.
सासू : तुम्हाला दोघांना व्यसनच जडलं होतं त्याकाळात.
सून : त्यावरूनही मी तुम्हाला उलटसुलट बोलले होते.
सासू : आठवतंय.
सून : तुम्ही कायम मला पेपरमधील एखादं कात्रण वाचायला द्यायचात.
सासू : आरोग्यविषयक लेख.
सून : मात्र तेही मी कधी वाचले नाहीत.
सासू : तरी मी बळजबरी ते तुला वाचून दाखवायचे.
सून : आणि मग मी ताईला कॉल करण्याच्या बहाण्याने तेथून निघायचे.
सासू : कळायचं मला.
सून : तुम्ही योगासने शिकवायचा, मात्र मी ऑफिसचं कारण द्यायचे.
सासू : मला टाळण्यासाठी..
सून : माझ्या त्याच वाईट वागण्याची शिक्षा मला देवाने दिली.
सासू : कसली शिक्षा?
सून : ऑफिसमध्ये मला रक्ताची उलटी झाली..
सासू : हो. तुला कॅन्सर असल्याचं आपल्याला समजलं.
सून : आई त्या दिवसानंतर माझं आयुष्यच बदललं.
सासू : म्हणजे?
सून : म्हणजे आज मागे वळून पाहिलं तर जाणीव होते.
सासू : कसली?
सून : आज मी फक्त तुमच्यामुळे जिवंत आहे.
सासू : तुझीही साथ होतीच ना बाळा.
सून : ज्या बाईला मी सातवी पास अडाणी म्हणाले, तिनेच..
सासू : तिनेच काय?
सून : अक्षरशः मला मृत्यूच्या जबड्यातून खेचून आणलं.
सासू : पुरे झालं.
सून : नका थांबवू आई.
सासू : माझं कर्तव्य मी केलं.
सून : आणि मी?
सासू : म्हणजे?
सून : रात्री भांडी घासायला नको, म्हणून मी लवकर जेवण उरकून झोपून घ्यायचे.
सासू : जाऊ दे.
सून : कसं जाऊ देऊ आई?
सासू : मग काय?
सून : मी तुमची खरकटी भांडी घासायचा कंटाळा केला आणि तुम्ही..
सासू : मी काय?
सून : माझ्या लघवी आणि रक्ताने माखलेले बेडशीट, तुम्ही स्वतःच्या हाताने धुतले.
सासू : पोरी..
सून : आई चुकले मी.
सासू : अरे बाळा, झालं गेलं ते सगळं सोडून द्यायचं.
सून : मी तुमच्या पाठीमागे कायम तुम्हाला दूषणं दिली.
सासू : तू बदलली ना आता..
सून : अद्दल घडल्यावर अक्कल आली मला..
सासू : असं काही नाही.
सून : कधी तुम्हाला अडाणी, कधी हेकेखोर तर कधी कपटी म्हातारी म्हणाले..
सासू : बस्स कर.
सून : आणि तुम्हीच मला पोटच्या मुलीप्रमाणे जीव लावला.
सासू : पुन्हा तेच?
सून : दवाखान्यात पाठ थोपटून मला झोपी लावायच्या.
सासू : ट्रीटमेंटचा त्रास व्हायचा ना तुला.
सून : केमोथेरपीनंतर माझे डोक्याचे केस गेले, तर..
सासू : अरे..
सून : तुम्हीही टक्कल करण्याची तयारी दाखवली.
सासू : तुला वेगळं नको वाटायला म्हणून..
सून : ज्या लोकांसाठी मी तुम्हाला टाळलं..
सासू : त्यांचं काय?
सून : ते कुणीच त्या संकटाच्या काळात माझ्यासोबत नव्हते.
सासू : संकटात आपलीच माणसं सोबत राहतात.
सून : मी माणसं ओळखण्यातच चुकले.
सासू : का बरं?
सून : माझ्या आईने आणि बहिणीने..
सासू : काय?
सून : कधीच मला फास्टफूड खाण्यापासून आणि सतत मोबाईल वापरण्यापासून रोखलं नाही.
सासू : का?
सून : कारण त्यांना ते कधीच गरजेचं वाटलं नाही.
सासू : मग?
सून : कारण तुमच्याबद्दल वाईटसाईट माझ्या मनात भरवणं त्यांना महत्वाचं वाटायचं.
सासू : होतात गैरसमज.
सून : सुरुवातीपासून माझ्या भल्याच्या चार गोष्टी जर कुणी मला सांगितल्या असत्या..
सासू : तर?
सून : तर कदाचित मला मरणयातना सहन कराव्या लागल्या नसत्या.
सासू : नियती.
सून : आई मला एक मात्र समजलं.
सासू : काय?
सून : गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा, खरं बोलणारी माणसं आपल्या आयुष्यात असावी.
सासू : त्याने काय होतं?
सून : त्यामुळे आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.
सासू : अनुभव सगळ्यात मोठा गुरु असतो बेटा.
सून : आणि अनुभवाने समृद्ध असलेली माणसं अनमोल असतात.
सासू : खरं आहे.
सून : आई तुम्ही काल म्हणालात..
सासू : काय?
सून : हा माझा पुनर्जन्म आहे.
सासू : आहेच मग.
सून : मग आजपासून मी ठरवलं आहे.
सासू : काय?
सून : तुम्ही आधी हॉलमध्ये जा..
सासू : कशाला?
सून : आधी जा तुम्ही..
सासू : हो पोहचले. इथे काय?
सून : स्टूलवर ती १० पुस्तकं ठेवली आहेत.
सासू : त्यांचं काय?
सून : ती सर्व पुस्तकं मी वर्षभरात वाचून कढणार आहे.
सासू : शाब्बास!
सून : आणि..
सासू : आणि काय?
सून : आता आपल्या अंगणात जा.
सासू : हो.
सून : समोर २ सायकल उभ्या आहेत ना?
सासू : त्या कुणाच्या?
सून : उद्यापासून आपण मायलेकी रोज सकाळी सायक्लिंग करायची.
सासू : हे तू बोलतेय?
सून : हो. आजपासून सतत मोबाईल वापरणं आणि फास्टफूड खाणं बंद.
सासू : व्वा!
सून : मागच्या जन्मात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती, मला या जन्मात करायची नाहीये.
सासू : क्या बात!
सून : आई मी खूप चुका केल्या..
सासू : चुकतो तोच शिकतो.
सून : मात्र मला खात्री आहे की, तुम्ही मला नक्की माफ कराल.
सासू : का बरं?
सून : कारण तुम्हीच म्हणत असता..
सासू : काय?
सून : सुबह का भूला शाम को घर आ जाए, तो उसे भूला नहीं कहते..
सासू : ज्जे बात!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा