शुक्रवार, १४ जुलै, २०२३

430. मृत्यू - एक अटळ सत्य

      मृत्यू  यायचा  असेल तर  तो बरोबर  ठरलेल्या  क्षणालाच येणार. याबद्दल कधीही अति विचार करू नये. नकारात्मकता मनात आणू नये. आपण कोणीही त्याला थांबवू शकत नाही हे  नियतीचे विधान आहे. फक्त ज्या सत्कर्मासाठी आपणाला हा जन्म मिळाला आहे, त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून पंचतत्वात विलीन होणे हे महत्वाचे आहे. अति अहंकार हा सर्वनाशाला कारणीभूत नक्कीच ठरतो. याचे उदाहरण म्हणजे मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचं होतं. कोणाशी हात मिळवायचा असेल तर तो आधी त्याच्या हातात मोजे घालत असे. जेंव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेंव्हा तोंडावर तो आधी मुखवटा (mask) घालत असे.  त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर्स नियुक्त केले होते. हे डॉक्टर्स त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत असत. त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे. त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी १५ लोक तैनात होते.  मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं होतं आणि गोर्‍या आईवडिलांना भाड्याने घेतलं होतं. त्याने मित्र जवळ केले तेही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं तेही गोर्‍या मुलींबरोबरच. दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमीच प्राणवायूच्या बिछान्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे कितीतरी दाते तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे म्हणजेच त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुप्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाते येऊन त्याला देऊ शकतील. त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल. पण हे शक्य झालं नाही आणि दिनांक २५ जून २००९ या दिवशी जेव्हा त्याची हृदयगती बंद पडू लागली तेंव्हा त्यावेळी त्याच्या घरी १२ डॉक्टर्स होते पण कोणीही ती परिस्थिती सावरू शकलं नाही. ही गोष्ट पाहून बघता शहरातले सगळे डॉक्टर्स त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही. त्याने तब्बल २५ वर्षे डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला १५० वर्षे जगायचं होतं पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली होती. आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती, शेवटी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 
         जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो टकला होता,  त्याच्या बरगड्या आणि खांद्याची हाडं तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुया टोचल्याच्या खुणा होत्या. प्लॅस्टिक सर्जरी केल्याने त्याला जो त्याला त्रास व्हायचा, त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच अँटिबायोटिक्सचीअनेक इंजेक्शन्स घ्यावी लागत असत  त्यादिवशी मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा जवळपास २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिली. थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिली गेलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी घटना आहे. मायकल जॅक्सनच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच दिनांक २५ जून २००९ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि एओएलचं इन्स्टंट मेसेंजर हे सगळं क्रॅश झालं होतं. त्याच्या मृत्यूची बातमी येताच ८ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने शेवटी गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं. त्यावेळी पहिल्यांदाच तब्बल अडीच तास गुगल बंद राहिलं.  मृत्यूला चकवा देण्याचा त्यांचाही विचार असतो, त्यांना शेवटी मृत्यूच चकवतो, हेच खरं!
       चार दिवसांचा थाट, ऐश-आराम, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माजकशाला तो? तुम्ही स्मशानात जाणार तेंव्हा तुमच्या हाताची साधी मूठही रिकामीच असणार आहे! हे कधी समजणार लोकांना?कदाचित कधीच नाही! म्हणूनच सिकंदरनं सांगितलं  होतं, "मी  मरताना माझे  दोन्ही  हात  मोकळे ठेवा.  जगाला हे  दिसावे कीमी रिकाम्या हाताने जात  आहे, आणि हेच  जीवनाचे अंतिम  सत्य  आहे. " 
     आनंदात रहा. दुसरऱ्यांनापण आनंद वाटा, आणि आनंदाने जगू  द्या. चला! या पृथ्वीवर आपण आनंदवन फुलवू या!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...