ती : व्हेरीफाईड अकाउंट?
मी : हो.
ती : फॉलो केलंय.
मी : थँक यु!
ती : तुझा तो लेख आमच्या फॅमिली ग्रुपवर आलेला.
मी : कोणता?
ती : पालकत्वाचा.
मी : त्याविषयावर
बरेच लेख लिहिले.
ती : इंटेलिजन्स क्वॉशन्ट आणि इतर क्वॉशन्टचं मुलांच्या जडणघडणीतील महत्व.
मी : हो. तो लेख मागच्या महिन्यात लिहिलेला.
ती : मलाही एक मुलगी असल्याने, लेख वाचताना जबाबदारीची जाणीव झाली.
मी : बदल होतोय.
ती : नक्कीच.
मी : अनुभव शेअर करायचा होता?
ती : हो.
मी : टॉपिक?
ती : तू माझी प्रोफाइल चेक केली?
मी : नाही.
ती : मी शासकीय अधिकारी आहे.
मी : ग्रेट.
ती : त्यामुळेच सध्या चर्चेत असलेल्या काही विषयांसंबंधी बोलावं वाटलं.
मी : कोणत्या?
ती : तू ती महिला एसडीएमची बातमी वाचली?
मी : स्वच्छता कर्मचारी नवरा?
ती : हो. त्यासोबतच दुसरी बातमी म्हणजे प्रेमप्रकरणातून तरुणींवर झालेले हल्ले.
मी : पुण्याचं प्रकरण ताजं आहे.
ती : करेक्ट.
मी : तोच टॉपिक?
ती : त्यासंबंधीच
आहे.
मी : ओके.
ती : त्या प्रकरणांमध्ये काहीजण मुलीला दोष देत आहेत, तर काहीजण मुलाला.
मी : हो.
ती : मात्र सर्वांनी एक लक्षात घ्यायला हवं.
मी : काय?
ती : नाण्याला नेहमी दोन बाजू असतात.
मी : म्हणजे?
ती : म्हणजे आपण या घटनांचा रूटकॉज शोधला पाहिजे.
मी : सहमत.
ती : मागील काही लेखांमध्ये तू अगदी महत्वाचा विषय अधोरेखित केला आहेस.
मी : कोणता?
ती : अपब्रिंगिंग.
मी : संगोपन.
ती : हो. एका व्यक्तीचं परिपूर्ण संगोपन त्याला जबाबदार नागरिक बनवतं.
मी : सहमत.
ती : त्यात तू लिहिलेले सर्वच क्वॉशन्ट महत्वपूर्ण ठरतात.
मी : फक्त हुशारी कामाची नाही.
ती : तेच तर. इमोशनल क्वॉशन्ट आणि सोशल क्वॉशन्टही तितकाच महत्वाचा.
मी : अगदी.
ती : माझा भाऊ माझ्यापेक्षा ५ वर्षांनी लहान आहे.
मी : ओके.
ती : मार्च महिन्याच्या एका संध्याकाळी मला त्याचे अनपेक्षित मेसेज आले.
मी : अनपेक्षित?
ती : त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते.
मी : कारण?
ती : कुठली एक व्यक्ती त्याला वर्षभरापासून सतत टॉर्चर करत होती.
मी : कशावरून?
ती : माझ्या वहिनीच्या अफेअरवरून.
मी : एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर?
ती : नाही. लग्नाआधीचं प्रकरण.
मी : काय करायचा?
ती : तो माणूस माझ्या भावाला दर महिन्याला कुरियरने एखादा फोटो, स्क्रिनशॉटची
प्रिंट किंवा मेमरी कार्ड पाठवायचा.
मी : कसले?
ती : माझ्या वहिनीच्या आणि त्याच्या प्रायव्हेट मोमेन्टचे.
मी : बाप रे..
ती : पाठवणारा अगदी हुशार होता.
मी : का बरं?
ती : कारण तो दरवेळी पासवार्ड एन्क्रिप्टेड फाईल पाठवायचा.
मी : टेक्नोसॅव्ही?
ती : हो.
मी : मग?
ती : सुरुवातीला माझ्या भावाने त्याला गांभीर्याने घेतलं नाही.
मी : का?
ती : कारण लग्नाच्या आधी माझ्या वहिनीने त्याच्याशी एका मुलाविषयी गोष्टी शेअर केलेल्या.
मी : ओके.
ती : मात्र फोटो आणि व्हिडीओ पाहून भावाला मानसिक त्रास सुरु झाला.
मी : साहजिकच.
ती : भावाचे मेसेज वाचताच मी परिस्थितीचं गांभीर्य हेरलं आणि मिस्टरांसोबत थेट त्याचं घर गाठलं.
मी : गुड.
ती : सुरुवातीला भावाशी आणि वहिनीशी बोलल्यावर आम्हाला एका मुलाचं नाव समजलं.
मी : मग?
ती : मात्र आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी केल्यावर तो मुलगा तसं काही करणार नाही, अशी आमची खात्री झाली.
मी : ओके.
ती : दरम्यानच्या
काळात मला एक गोष्ट जाणवली होती.
मी : कोणती?
ती : काहीतरी होतं, जे वहिनी आमच्यापासून लपवत होती.
मी : काय?
ती : तेच जाणून घेण्यासाठी मी एकांतात तिच्याशी बोलायचं ठरवलं.
मी : भाऊ आणि मिस्टर?
ती : मिस्टर भावाला बाहेर फिरायला घेऊन गेलेले.
मी : मग?
ती : अक्षय माझा संशय अगदी खरा ठरला.
मी : काय समजलं?
ती : लग्नाच्या आधी वहिनीचे ६ अफेअर होते.
मी : काय?
ती : हो. तिनेच स्वतःच्या तोंडाने कबुली दिली.
मी : च्यामारी.
ती : विशेष म्हणजे सर्वांशी तिचे फिजिकल रिलेशन.
मी : सराईत.
ती : बारावीला पहिला, कॉलेजला असताना तिघे आणि त्यानंतर दोघे, अशी एकूण ६ मुलं तिच्या आयुष्यात आली.
मी : भयंकर आहे.
ती : तुझा कदाचित विश्वास बसणार नाही.
मी : कशावर?
ती : माझ्या वहिनीचा एज्युकेशनल परफॉर्मन्स एक्स्ट्राऑर्डीनरी आहे.
मी : म्हणजे?
ती : दहावीला ९०%, बारावीला ८७% आणि त्यापुढेही सेम..
मी : मग तरीही?
ती : अक्षय जगात जनरली २ प्रकारची माणसं असताना.
मी : कोणती?
ती : इमोशनल आणि प्रॅक्टिकल.
मी : ओके.
ती : माझी वहिनी प्रॅक्टिकल लोकांच्या यादीत येते.
मी : म्हणजे?
ती : म्हणजे ती भावनाशून्य आहे. ती गरजेनुसार नात्यांचा वापर करते.
मी : अरे..
ती : त्या ६ जणांपैकी ५ जणांनी तर तिला माफ केलं..
मी : १ जण कुणीतरी.
ती : त्याचाच मग आम्ही शोध घेतला.
मी : सापडला?
ती : २ महिन्यांनी एका कुरियर ऑफिस बाहेरील सीसीटीव्हीमध्ये
तो सापडला.
मी : मग?
ती : कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याची भावाची अट होती.
मी : का?
ती : बदनामी टाळण्यासाठी.
मी : त्याच्याकडून
काय समजलं?
ती : त्यांचं अवघ्या ३ महिन्यांचं नातं होतं.
मी : ओके.
ती : गरज संपल्यानंतर वहिनीने त्याला टाळायला सुरुवात केली.
मी : वाईट.
ती : तो पोरगा तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला.
मी : आशिक.
ती : त्यामुळेच तर सूड घेण्यासाठी त्याने प्लॅन आखला.
मी : उद्देश?
ती : त्याची इच्छा होती की, माझ्या भावाने बायकोला डिव्होर्स द्यावा.
मी : वचपा.
ती : दहावी आणि बारावीनंतर वयात येणाऱ्या मुलामुलींच्या काही शारीरिक गरजा असतात.
मी : बरोबर.
ती : शोकांतिका म्हणजे, आपल्या समाजात त्याविषयावर बोलणं निषिद्ध समजलं जातं.
मी : लैंगिक शिक्षण दुर्लक्षित.
ती : त्यामुळेच मग भावनांवर एकाएकी शारीरिक गरज वरचढ ठरते आणि सुरु होतं दृष्टचक्र.
मी : अगदी खरं.
ती : म्हणूनच तर मुलांचं योग्य संगोपन व समुपदेशन गरजेचं आहे.
मी : पालकत्व.
ती : आईवडील जर मुलांशी मित्र बनून संवाद साधायला लागले, तर ते त्यांना अचूक मार्गदर्शन करू शकतात.
मी : मात्र जनरेशन गॅप.
ती : अक्षय मी माझ्या प्राथमिक, माध्यमिक शाळेला आणि ज्युनिअर कॉलेजला आवर्जून भेट देत असते.
मी : प्रेरणादायी.
ती : तिथे मी मुलींशी विविध विषयांवर संवाद साधते.
मी : क्या बात!
ती : मात्र तिथे जे काही मला ऐकायला मिळतंय, ते भयावह आहे.
मी : म्हणजे?
ती : गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नसलेल्या मुलामुलींना टोमणे मारण्याचे काही प्रकार मी ऐकले.
मी : आजूबाजूचं वातावरण आणि संगत.
ती : तू म्हणतो ते अगदी खरं आहे.
मी : काय?
ती : मुलांचं वयात येण्याचं वय दिवसेंदिवस घटत आहे.
मी : तोच तर पॉईंट आहे.
ती : मी एका मुलीच्या परवानगीने तिचा मोबाईल चेक केलेला.
मी : मग?
ती : तिला वाटलं होतं की, मी तिचं इंन्स्टाग्राम
अकाउंट चेक करणार नाही.
मी : केलं?
ती : मी थक्क झालेले.
मी : का?
ती : नववीत शिकणारी ती मुलगी, त्यांच्या शाळेतील दहावीच्या मुलाशी सेक्स चॅट करत होती.
मी : डोकं सुन्न झालं.
ती : हे प्रकार आपल्या आजूबाजूला आजकाल सर्रास घडत आहेत.
मी : वास्तव.
ती : कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली बिनधास्त बॉयफ्रेंडला न्यूड फोटो शेअर करतात.
मी : गांभीर्य उरलेलं नाही.
ती : एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकून व्हायरल झाला..
मी : तर क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं.
ती : त्याची तर कुणालाच भीती नाही.
मी : हो.
ती : वहिनीच्या आयुष्यात आलेल्या ६ जणांपैकी कुणीच तिच्याशी लग्नानंतर संपर्क केला नसता..
मी : तर कदाचित या गोष्टी तुम्हाला समजल्याही नसत्या.
ती : म्हणूनच तर लोकांची प्रवृत्ती बळावत आहे.
मी : पूर्ण सहमत.
ती : अक्षय आज आपण तंत्रज्ञानाच्या
युगात जगतोय.
मी : सोशल मीडियाचं युग.
ती : माझ्या वहिनीने तिच्या भूतकाळात केलेली एक चूक..
मी : काय?
ती : तिच्या आयुष्याच्या जोडीदाराच्या आत्महत्येचं
कारण बनली असती.
मी : १००%
ती : मी वेळीच पुढाकार घेतल्याने, आमच्या कुटुंबावरील मोठं संकट टळलं.
मी : खरं आहे.
ती : म्हणूनच या विषयावर आता वारंवार चर्चा होणं गरजेचं आहे.
मी : प्रयत्न करूयात.
ती : पालकांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने निभावली, तर जबाबदार युवक घडतील.
मी : भावना, सृजनशीलता, समाजभान आणि संकटांना ओळखण्याची क्षमता असणारी पिढी.
ती : त्यांना योग्य वयात अचूक मार्गदर्शन केलं, तरच असे गैरप्रकार रोखता येतील.
मी : परफेक्ट.
ती : नाहीतर मॅन्यूफॅक्चर फॉल्ट असणारं प्रॉडक्ट, लग्नाआधी किंवा नंतर असं कधीही बिघडू शकतं.
मी : शक्यता आहे.
ती : बदलणाऱ्या काळानुसार मुलामुलींना आता मुबलक स्वातंत्र्य मिळालं आहे.
मी : हो.
ती : म्हणूनच त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार व्हायला नको.
मी : तीच तर खंत.
ती : नाहीतर..
मी : नाहीतर?
ती : भूतकाळात केलेली तुमची एक चूक..
मी : काय करेल?
ती : भविष्यात मोठा गुन्हा ठरेल.
मी : हो.
ती : आणि त्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आयुष्यभर भोगावी लागेल.
मी : ज्जे बात!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा