ब्रिटिश लोक येथुन गेल्या नंतर त्यांच्या काही गोष्टींचे मोठ्या प्रमाणावर आपले लोक अंधानुकरण करत आहेत व तसे करने भूषण ही मानत आहेत. वास्तविक जे जे भारतीय ते ते अतीव उत्कृष्ट आहे. पण त्याचा हेतु व त्यामागिल व विद्न्यान माहित नसल्याने अंधानुकरण होत आहे असे दिसते . केकवर मेणबत्त्या लावुन त्या फुंकुन विजवने हि वाढदिवसाची पाश्चात्य पद्धति आहे . ति योग्य की अयोग्य याचा कोणिच विचार करत नाही . केक चा व वाढदिवसाचा संबंध काय?? केक च्या एवेजी दुसरा पदार्थ का नको याला काही कारण नाही, त्यावर लावलेल्या मेणबत्त्या विजवायच्या का?? यालाही कारण नाही.या उलट हिंदू धर्मशास्त्राने सांगितलेला विधि किती अर्थपूर्ण आहे ते पहा, ( तमसो मा ज्योतिर्गमय) अंधाराकडे नको , प्रकाशाकडे जा, अशी शास्त्राचा संदेश आहे . म्हणून वाढदिवसा दिवशी घरातील ज्येष्ठ स्त्रीया ओवाळतात( औक्षण करतात ) प्रकाशाकडे जा याचाच ते निदर्शक आहे, युद्धाला जाताना व विजयश्री घेवुन परत आल्यावर आनंदाने व अभिमानाने पत्नी त्या शूर वीराला ओवाळत असे , दिवा समोर नेवून विजवून अपशकुन करत नसे. भाऊबिजेला बहीण भावाला ओवाळते , ओक्षणाने आयुष्य वृद्धि होते . वाढदिवसा दिवशी घरातील ज्येष्ठ स्त्रीया ओवाळतात( औक्षण करतात ) तेव्हा नम्रता पूर्व नमस्कार करायचा , म्हणजे त्या दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतात. आशीर्वाद हा वात्सल्याने द्यायचा असतो, ( वात्सल्यात यत्र मान्येन कनिष्ठस्याभिधीयते ।इष्टावबोधकं वाक्यं आशी: सा परिकीर्तिता।) अशी आशीर्वादाची व्याख्या आहे. वाढदिवस साजरा करण्याचा हेतु: त्या व्यक्तिला नुसते दीर्घायु लाभावे नाही तर आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा आहे, अन्यथा दीर्घायुष्य लाभले पण अर्धांगाने लुळा होउन पडला किंवा रोगग्रस्त झाला तर त्या दीर्घायुष्याचा काय उपयोग? सर्व परिधानताच. आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे , हा हेतुच पाश्चात्य वाढदिवसाच्या पद्धतित दिसत नाही . नुसतेच हा जन्म दिवस तुला सुखाचा जावो (happy birthday to you) एवढेच आहे . आरोग्याची इच्छा दिसत नाही , घरातिल मानसे त्या आनंदात सहभागी दिसत नाहीत. भारतीय पद्धतित आरोग्य व दीर्घायु अशी दोनिही मागणी व ते मिळावे अशी व्यवस्था ही आहे . आरोग्य देने भगवान सूर्यनारायनणाच्या हाती आहे, दोनचार दिवस उन पडले नाही तर आपली अवस्था काय होते हि सर्वांना कल्पना आहे, कोणाला काय मागितले असता तो देतो, म्हणजेच कोणाकडे काय मागावे हे सांगितले आहे .( आरोग्यं भास्करादिच्छेत् धन मिच्छेत् हुताशनात् । द्न्यानं महेश्वरा दिच्छेत् मोक्षमिच्छेत् जनार्दनात्।) ( हुताशन = अग्नि महेश्वर= महादेव जनार्दन = विष्णु ) वास्तविक रोज सूर्य नमस्कार घालावेत, पण निदान वाढदिवसा दिवशी तरी घालावेत व सूर्य नारायणास आरोग्य दे अशी मागणी( विनंती) करावी, असे सांगितले आहे . दुधात तीळ व गुळ घालुन ते ( । सतिलं गुड संमिश्रं अंजल्यर्धमितं पय: । मार्कंडेयात् वरं लब्ध्वा पिबाम्यायुर्विवृध्दये।।) या मंत्राने प्राशन करनेस सांगितले आहे , हे तिन्ही पदार्थ आरोग्यदायक आहेत .हा झाला आरोग्याचा विचार , दीर्घायु करता अश्वत्थामा, बली , व्यास ,हनुमान, बिभीषण, कृपाचार्य , परशुराम व मार्कंडेय असे ८ चिरंजीव सांगितले आहेत . हे सद्ध्याही जिवंत आहेत . अशा चिरंजीवांची प्रार्थना करुन दीर्घायुष्य मागावे असा विधि शास्त्राने सांगितला आहे . (।। अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषन: । कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीवीन:। सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कंडेयमथाष्टमम्। जीवेत् वर्षशतंसाग्रं अपमृत्यु विवर्जित:।।) अशी प्रार्थना आहे .वाढदिवसाची पाश्चात्य पद्धति चांगली का आपली चांगली ते आपणच ठरवा , पाश्चात्यांचे अंधानुकरण नको एवढेच म्हणने आहे . वरिल श्लोकातील ( 'अपमृत्यु विवर्जित: ) 'अपमृत्यु होवु नये ही मागणी सध्या किती महत्वपूर्ण आहे हे पहा. वृत्त पत्रात रोज मोठ्याप्रमाणावर अपघाताच्या बातम्या आपण वाचतो , आपली चुक नसतानाही अपघात होतो , हेही आपण पहातोच.
टंकलेखन - अनिरुद्ध इनामदार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा