ती : कालचा लेख उत्तम लिहिलास.
मी : धन्यवाद.
ती : माझ्या एका मैत्रिणीने शेअर केलेला. तेव्हा वाचला.
मी : फेसबुक की इतर ठिकाणी.
ती : व्हॉट्सअप.
मी : ओके.
ती : तू त्या लेखाचा लेखक आहेस. म्हणूनच एक प्रश्न विचारावा वाटतो.
मी : हरकत नाही. विचारा.
ती : तुला काय वाटतं ? कालच्या घटनेत गुन्हेगार कोण ?
मी : मी तो निर्णय वाचकांवर सोडतो. प्रत्येकजण कथेला वेगळ्या अंगाने वाचत असतो.
ती : तरी तुला काय वाटतं ?
मी : लेखक या भूमिकेतून माझं काम आहे, कथा सर्वांपर्यंत पोहचवणं. तेच मी करतो.
ती : माझीही कथा तशीच काहीतरी आहे. लिहिशील ?
मी : नक्कीच.
ती : मी सर्व माहिती मेन्शन करते. त्यातील योग्य वाटेल, ते तू लिखाणात घे.
मी : चालेल.
ती : माझं नाव प्रेरणा. वयवर्ष ३३. मी आयटी कंपनीत जॉब करते.
मी : ओके.
ती : माझं लग्न ९ वर्षांपूर्वी झालं. माझे मिस्टर पण आयटी सेक्टरमध्येच जॉबला आहेत.
मी : ओके.
ती : आम्हाला ७ वर्षांची एक मुलगी आहे.
मी : ओके.
ती : आम्हाला दोघांनाही चांगला पगार आहे. स्वतःचा पॉश एरियात फ्लॅट आहे. १ चारचाकी आणि २ दुचाकी गाड्या आहेत. माहेरी आणि सासरी, दोन्हीकडे कश्याचीच कमी नाही.
मी : ओके.
ती : एकंदर दोन वर्षापूर्वीपर्यंत आमचं सगळं सुरळीत चालू होतं.
मी : मग ?
ती : दोन वर्षांपूर्वी ऑफिसमधून घरी येताना, माझ्या मिस्टरांच्या अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.
मी : शिट.
ती : त्यावेळी त्यांच्या मणक्याला आणि डाव्या पायाला गंभीर इजा झालेली. म्हणून वर्षभर त्यांना सक्तीची बेडरेस्ट सांगण्यात आलेली.
मी : ओके.
ती : वर्षभराने ते चालायला लागले. शिवाय पुन्हा कंपनीत जॉईनदेखील झाले. पण..
मी : पण ?
ती : त्या अपघाताने त्यांना शारीरिक आणि मानसिक अपंगत्व दिलं.
मी : म्हणजे ?
ती : नवरा बायकोचं नातं जगाला दाखवताना जरी भावनिक असलं, तरी सेक्स त्या दोघांना जोडून ठेवणारा नाजूक दुवा असतो.
मी : येस.
ती : आम्ही दोघेही सुशिक्षित आहोत. शिवाय लग्न झालं तेव्हा आम्ही दोघेही मॅच्युअर होतो. त्यामुळे आमची सेक्सलाईफ परफेक्ट होती. मला काय हवं नको ते त्याला आधीच कळायचं. मलाही त्याला काय हवं हे कधी सांगावं लागलं नाही.
मी : ओके.
ती : मात्र वर्षभरानंतर आम्ही एकत्र आलो आणि आम्हाला ती गोष्ट जाणवली जिचा आम्ही कधी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता.
मी : म्हणजे ?
ती : म्हणजे, यावेळी तो एक जोडीदार म्हणून अगदी असमर्थ ठरत होता.
मी : पुढे ?
ती : हा प्रकार त्यानंतर आठवडाभर पुन्हा पुन्हा अंडरलाईन झाला. साहजिक आहे. सरतेशेवटी शारीरिक संबंध ही माणसाची गरज आहे. जशी पोटाची भूक तशी ती शरीराची भूक.
मी : बरोबर आहे.
ती : त्यानंतरचा ६ महिन्यांचा काळ आमच्यासाठी भयंकर मनस्ताप देणारा होता.
मी : साहजिक आहे.
ती : माझ्या आणि त्याच्या चिडचिडीने, आमच्या घरातलं वातावरण अगदी नकारात्मक होऊन गेलेलं.
मी : मग ?
ती : मग, एका संध्याकाळी त्याने माझ्यासमोर लॅपटॉप उघडला आणि मला घाम फुटला.
मी : काय कारण ?
ती : तू जिगोलोबद्दल ऐकलंय ?
मी : हो. पुरुषांसाठी वेश्या, तश्या महिलांसाठी जिगोलो असतात.
ती : हो. माझ्या नवऱ्याने त्यावेळी, त्या पुरुषांचे फोटो माझ्यासमोर ओपन केलेले. तुला कोण आवडतो यातला ? असा त्याचा तो पहिला प्रश्न होता.
मी : अनपेक्षित आहे हे.
ती : हो ना. माझ्यासाठीही अगदी अनपेक्षित होतं. म्हणून मी सरळ त्याचा लॅपटॉप बंद केला आणि त्याला मिठी मारली.
मी : मग ?
ती : त्यानंतर आम्हीही दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून अर्धा तास रडलो. माझी सुरु असलेली घुसमट त्याला नकोशी झालेली. म्हणून त्याने हा पर्याय शोधून काढला होता.
मी : हे स्वीकारणं वाटतं तेवढं सोपं नाही.
ती : हो म्हणूनच मलाही ते स्वीकारायला महिनाभराचा कालावधी लागला.
मी : म्हणजे ?
ती : माणूस आहे रे मीही शेवटी. मी नवऱ्याच्या अपरोक्ष एखाद्या पुरुषामध्ये गुंतू नये म्हणूनच त्याने तो मधला मार्ग शोधला होता.
मी : पुढे ?
ती : ४ महिन्यापूर्वी एका संध्याकाळी, पुन्हा एकदा त्याने तोच विषय काढला आणि नाईलाजाने मी होकार सांगितला.
मी : कठीण आणि धाडसी निर्णय.
ती : नक्कीच.
मी : मग ?
ती : शनिवारी आम्हाला दोघांना सुट्टी असते. त्यादिवशी त्याने त्या जिगोलोला बोलावलं.
मी : नवरा आणि मुलगी ?
ती : तो मुलगा संध्याकाळी ६ वाजता घरी येणार म्हणून, माझा नवरा माझ्या मुलीला ५ वाजताच बाहेर फिरायला घेऊन गेला.
मी : हम्म.
ती : तो मुलगा ६ वाजता आला आणि ९ वाजता निघून गेला.
मी : मग ?
ती : ते एवढं सोपं नव्हतं. मात्र दुसरा कुठला पर्याय मला समोर दिसला नाही.
मी : भयंकर आहे हे सगळं.
ती : नवरा रात्री घरी आला, तेव्हा सगळं सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र एक पुरुष म्हणून त्याला किती त्रास सहन करावा लागला असेल, याचा विचार तुही करू शकतो.
मी : हो ना.
ती : त्यानंतर आमचं दुसऱ्या दिवशी बोलणं झालं, तेव्हा मी त्याला तो तीन शब्दाचा प्रश्न केला. हे सगळं का ?
मी : मग ? उत्तर काय होतं ?
ती : त्याचं उत्तर होतं. तू आणि मी फसवले जाऊ नये म्हणून.
मी : निशब्द.
ती : त्यानंतर दोनदा आम्ही त्या मुलाला घरी बोलावलं आहे. तो पैसे घेऊन ते काम करतो. म्हणून त्यात प्रेम, आपुलकी वैगरे काही नसतं. साहजिक आहे त्याचा तो जॉब आहे. म्हणून त्याच्याकडून इतर कशाची अपेक्षा करणं गैर आहे.
मी : हो ना.
ती : ठाऊक नाही. तू माझ्याबद्दल किंवा माझ्या नवऱ्याबद्दल काय विचार करशील. तुझे वाचक काय विचार करतील. मात्र हा अनुभव शेअर करण्याचा उद्देश एवढाच आहे की..
मी : काय ?
ती : काळ बदलतोय. सोशल मीडियामुळे सगळं जग जवळ आलं आहे. आज ना उद्या माझ्या हातून काहीतरी चूक घडेल, आणि त्याची शिक्षा आम्हाला तिघांना भोगावी लागेल. हे माझ्या नवऱ्याने आधीच ओळखलं असावं. म्हणून त्याला हा मधला मार्ग योग्य वाटला. आपल्या देशात पुरुषाची शारीरिक भूक भागवण्यासाठी वेश्या आहेत. मात्र स्त्रीच्या भावनांचा विचार आपला समाज कधीच करत नाही. आज हे वाचून समाज आम्हाला कदाचित नालायकात जमा करेल. मात्र हे एक वास्तव आहे. जे आज ना उद्या समाजाला स्वीकारावंच लागेल.
मी : हो ना.
ती: मी हा अनुभव शेअर करण्याचं धाडस केलं. तुला आता ते लिहिण्याचं धाडस करायचं आहे. कदाचित तुलाही टीकेला सामोरं जावं लागेल. मात्र तू आधी म्हणाला तसं. तुझं काम आहे, अनुभव वाचकांपर्यंत पोहोचवणं. त्या कथेतील गुन्हेगार कोण ? याचा निर्णय घेण्याचा अधिकार तुझ्या वाचकांचा.
मी : हो. मी माध्यम आहे. समाजात घडणाऱ्या गोष्टी मी, इतर सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. त्यातून काय घ्यायचं आणि काय शिकायचं. हा निर्णय ज्याचा त्याचा.
ती : आमचा अनुभव अपवादात्मक आहे. माझं म्हणणं नाही की, प्रत्येकाने आमच्याप्रमाणे निर्णय घ्यावा. मात्र योग्य तो निर्णय घेऊन संसार मोडण्यापासून वाचवण्यासाठी मधला मार्ग नक्कीच शोधता येऊ शकतो.
मी : पॉईंट है.
ती : बदल घडायला हवा.
मी : अपेक्षा तर तीच आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा