तो : मी तुला एक लिस्ट पाठवली आहे.
मी : हो, पाहिली.
तो : त्यासोबतच एक पावती आहे.
मी : हो.
तो : ती समोरच ठेव.
मी : का बरं?
तो : मला त्यासंबंधी काही शेअर करायचं आहे.
मी : ओके.
तो : तू मागच्या आठवड्यात एक पोस्ट लिहिलेली.
मी : कोणती?
तो : पैसे कुठे खर्च करायचे, हे कळण्यासाठी अक्कल लागते.
मी : हो.
तो : मात्र प्रत्येक मुलगा मुलगी तेवढे समजदार असते, तर..
मी : तर काय?
तो : तर कदाचित कित्येक कुटुंब सुखाने अन् समाधानाने जगले असते.
मी : म्हणजे?
तो : सांगतो, मात्र त्यापूर्वी थोडक्यात माझा परिचय देतो.
मी : चालेल.
तो : मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे.
मी : ओके.
तो : एका नामांकित कार कंपनीत मी जॉब करतो.
मी : ग्रेट.
तो : ३ वर्षांपूर्वी माझं लग्न झालं.
मी : तूझं वय?
तो : मी २९ वर्षांचा आहे.
मी : मिसेसचं वय?
तो : ती २६ वर्षांची.
मी : ओके.
तो : माझे आईवडील गावी असतात.
मी : काय करतात?
तो : आमची बागायती शेती आहे.
मी : ओके.
तो : माझ्या भावाचं लग्न झालंय. तो आईवडिलांसोबत असतो.
मी : ओके.
तो : भाऊ कमी शिकलेला असल्याने, त्याच्या लग्नाच्यावेळी..
मी : काय?
तो : घरचे कमी शिकलेल्या मुलीच्या शोधात होते.
मी : ओके.
तो : मात्र माझी वहिनी कमी शिकलेली असल्याने, तिला स्वतःची काही मतं नाहीत.
मी : मग?
तो : म्हणून मला भावाच्या त्या चुकीची पुनरावृत्ती करायची नव्हती.
मी : मग?
तो : मी घरच्यांना आधीच बजावलं होतं.
मी : काय?
तो : इतर निकष तुम्ही ठरवा, मात्र मुलगी उच्चशिक्षित
हवी.
मी : ओके.
तो : मात्र तोपर्यंत मला माहित नव्हतं.
मी : काय?
तो : शिक्षित आणि सुशिक्षित व्यक्तीत बराच फरक असतो.
मी : कसं समजलं?
तो : सध्या तेच अनुभवतोय.
मी : ओके.
ती : माझ्या बायकोचं मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन झालं आहे.
मी : व्वा!
तो : घरच्यांनी माझ्यासाठी शिकलेली बायको तर शोधली, मात्र सून शोधण्यासाठी त्यांचेही काही निकष होते.
मी : कोणते?
तो : मुलगी गोरी, सुंदर, उंच, सडपातळ आणि नाकेडोळे छान असावी.
मी : ओके.
तो : विशेष म्हणजे स्थळ तोलामोलाचं असावं.
मी : ओके.
तो : माझे सासरे रिटायर्ड सरकारी अधिकारी आहेत.
मी : शेती?
तो : तेही बागायतदार.
मी : तोलामोलाचं स्थळ.
तो : त्यात माझ्या सासऱ्यांना दोनच मुली.
मी : मग?
तो : त्यामुळे दोघीही त्यांच्या लाडक्या.
मी : साहजिकच.
तो : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आल्याने, माझ्या बायकोला तडजोड कधी ठाऊकच नव्हती.
मी : ओके.
तो : मी मात्र वयाच्या १७ व्या वर्षापासुन स्वावलंबी.
मी : बारावीपासून?
तो : हो. मी बारावीनंतर घरच्यांकडून
पैसे घेणं बंद केलं.
मी : मग?
तो : मी माझे गरजेपुरते पैसे स्वतः कमवायचो.
मी : कसे?
तो : माझे चुलते फोटोग्राफर होते. म्हणून मग मी त्यांच्या स्टुडिओत फोटो एडिटिंगचं काम करायचो.
मी : ग्रेट.
तो : इंजिनिअरिंग
पूर्ण झाल्यावर मी जॉबला लागलो आणि मग आर्थिक नियोजन सुरु केलं.
मी : कसं?
तो : मी म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचो.
मी : शेअर मार्केटमध्ये कशात?
तो : इक्विटी.
मी : ओके.
तो : तुही?
मी : मी काहीवर्षे 'इंट्रा डे' ट्रेडिंग केली.
तो : तो भयंकर प्रकार आहे.
मी : अनुभवला.
तो : लग्नाच्या आधी माझं सगळं काही सुरळीत सुरु होतं.
मी : ओके.
तो : लग्नही मी माझ्या साठवलेल्या पैशांनी केलं.
मी : घरच्यांनी काही मदत?
तो : दादा आणि पप्पांनी तशी इच्छा व्यक्त केली होती, मात्र मी नकार दिला.
मी : गुड.
तो : अक्षय मला असं वाटतं की, आपल्या समाजात लग्नाला फार गांभीर्याने
घेतलं जात नाही.
मी : असं का?
तो : कारण लग्न जुळवताना नको त्या विषयांना महत्व दिलं जातं, आणि महत्वाचे विषय..
मी : महत्वाचे विषय?
तो : दुर्लक्षित राहतात.
मी : कसे?
तो : तेव्हा माझ्या लग्नाला जेमतेम महिनाच झाला होता.
मी : मग?
तो : घरखर्च, फ्लॅट आणि कारचा हप्ता जाऊन, दर महिन्याला सरासरी २० हजार रुपये माझ्या खिशात उरायचे.
मी : ओके.
तो : तीच माझी सेव्हिंग.
मी : मग?
तो : लग्नानंतर मी ते पैसे बायकोकडे द्यायला लागलो.
मी : ओके.
तो : मात्र त्यानंतर अजबच प्रकार घडला.
मी : काय?
तो : मी बायकोकडे २० हजार रुपये दिलेले.
मी : हो.
तो : १० हजार रुपयांची गरज असल्याने, मी एकदिवस तिच्याकडे पैसे मागितले.
मी : मग?
तो : तर तिने सांगितलं की, फक्त ४ हजार रुपये शिल्लक आहेत.
मी : च्यामारी.
तो : मीही अवाक झालेलो.
मी : मग?
तो : मग मी उरलेल्या पैशांची तिच्याकडे चौकशी केली.
मी : काय समजलं?
तो : बायकोने एका प्रसिद्ध सलूनचं बिल माझ्या हातावर टेकवलं.
मी : तू मला पाठवलेलं?
तो : हो.
मी : अरे.
तो : वाच बरं एकदा..
मी : हेअर स्ट्रेंथनिंग क्राऊन, इसेन्सिटी ग्लोबल हेअर कलर, फेस थ्रेडींग, परफेक्ट रॅडिअन्स इल्युमिनेट फेशियल, बॉडी मसाज आणि पेडीक्युअर.
तो : फायनल अमाऊंट किती आहे?
मी : १२ हजार रुपये.
तो : त्यानंतर तिने नेलपॉलिश आणि लिपस्टिक ऑनलाईन खरेदी केलेली.
मी : ओके.
तो : त्यामुळेच अखेरीस ४ हजार रुपये उरलेले.
मी : सांगितलं नव्हतं?
तो : सांगितलेलं.
मी : काय?
तो : ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आले.
मी : मग?
तो : माझा असा समज होता की, १ हजार-२ हजार रुपये खर्च झाले असतील.
मी : का बरं?
तो : माझ्या चुलत बहिणींना तर तेवढाच खर्च यायचा.
मी : ओके.
तो : अक्षय मला वाटलेलं असा खर्च कधीतरी होईल.
मी : मग?
तो : मात्र माझा अंदाज चुकीचा ठरला.
मी : म्हणजे?
तो : बायको दरमहिन्याला ब्युटी ट्रीटमेंटसाठी
१०-१२ हजार रुपये सहज खर्च करायची.
मी : बाप रे..
तो : सुरुवातीचे काही महिने मी तो प्रकार सहन केला.
मी : मग?
तो : त्यानंतर धाडस करून मी बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला.
मी : बरं केलं.
तो : मात्र सगळं व्यर्थ.
मी : म्हणजे?
तो : ती एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची.
मी : वाईट.
तो : नाईलाजाने मग मी माझ्या सासऱ्यांच्या कानावर ती गोष्ट घातली.
मी : मग?
तो : त्या महोदयांनी तर बायकोची तुलना थेट कारशी केली.
मी : म्हणजे?
तो : ते म्हणाले की फॉर्च्युनर आणि अल्टो या दोन्ही गाड्या वेगवेगळ्या आहेत.
मी : बरोबर.
तो : म्हणूनच दोन्ही गाड्यांच्या मेंटेनन्समध्ये
जमीन आस्मानाचं अंतर.
मी : करेक्ट.
तो : फॉर्च्युनर गाडी वापरायची इच्छा तर तिच्या मेंटेनन्ससाठी
जसे पैसे खर्च करण्याची लायकी हवी, त्याप्रमाणे..
मी : त्याप्रमाणे?
तो : सुंदर, गोरी बायको करण्याची हौस असेल तर ब्युटी पार्लरचा खर्च सोसायची तयारी हवी.
मी : महान विचार.
तो : अक्षय मी तर डायरेक्ट कपाळाला हात लावला.
मी : काही सुचेना मला.
तो : माझी तीच अवस्था झालेली.
मी : होणारच.
तो : मागच्या वर्षी माझ्या मेहुणीचं लग्न झालं..
मी : मग?
तो : तिच्या लग्नासाठी माझ्या बायकोने ४६ हजार रुपयांची साडी खरेदी केली.
मी : काय?
तो : ती साडी तिने हार्डली आतापर्यंत फक्त दोनदा घातली आहे.
मी : ओके.
तो : हट्ट करून तिने वाढदिवसाला आयफोन घेतला.
मी : मग?
तो : त्याचा डिस्प्ले अवघ्या महिनाभरात फुटला.
मी : दुर्दैव.
तो : अक्षय माझी बायको फक्त आलिशान रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये जेवते.
मी : का?
तो : कारण तिला गर्दी असलेल्या ठिकाणी जेवायला आवडत नाही.
मी : नवाबी शौक.
तो : ती गोष्टी बॅलन्स करण्यात एक्स्पर्ट आहे.
मी : चला एकतरी चांगला गुण आहे.
तो : भावा ती ब्युटी पार्लरचा खर्च कमी झाला, तर ते पैसे शॉपिंगवर खर्च करते.
मी : तुझ्या सहनशीलतेला सलाम.
तो : मला असं वारंवार वाटतं.
मी : काय?
तो : मी घरच्यांच्या इच्छेने लग्न करून आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे
मी : का?
तो : कारण मागील २ वर्षांपासून
माझ्या आयुष्याची वाट लागलेली आहे.
मी : आर्थिक नियोजन चुकतंय.
तो : हो. मी तर आता मनाची तयारीच केली आहे.
मी : कसली?
तो : वरचेवर असे धक्के पचवण्याची.
मी : क्या बात!
तो : म्हणूनच तुझ्या माध्यमातून मला सर्व तरुणांना एकच सांगायचं आहे.
मी : काय?
तो : लग्नाचा निर्णय घेताना, मुलीच्या सौंदर्यापेक्षाही तिच्या विचारांना व व्यवहार ज्ञानाला अधिक महत्व द्या.
मी : का?
तो : कारण सौंदर्य काही वर्षे टिकतं, मात्र समजूतदारपणा
व हुशारी आयुष्यभर साथ देते.
मी : ज्जे बात!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा