एक दोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं
मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं.
मोजक्याच लोकांशी ऋणानुबंध जुळतात, एखाद्याशी नाही पटलं तर बिघडलं कुठं सोडून द्यावं .
मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं.
मोजक्याच लोकांशी ऋणानुबंध जुळतात, एखाद्याशी नाही पटलं तर बिघडलं कुठं सोडून द्यावं .
एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं सोडून द्यावं.
संपत्ती, ज्ञान आणि इतर गोष्टी आपल्या मुठीत आणि डोक्यात जेवढे मावेल तेवढेच घ्यावे
आणि राहिलेले इतरांना दान तसेच सांगून सोडून द्यावं.
स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देऊन टोमणे मारणाऱ्यांच्याकडे लक्ष देणं सोडून द्यावं.
आपल्या हातात काही नाही, हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं.
इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं.
प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं सोडून द्यावं.
आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं सोडून द्यावं.

कोणत्याही एका विनोदावर जास्त वेळ हसता येत नाही. त्यामुळे एकाच दुखण्यावर जास्त वेळ रडत बसणे सोडून द्यावं.
मेंदूवर, हृदयावर कामाचा जास्त ताण पडत असेल, टेन्शन येत असेल तर अति विचार करणं सोडून द्यावं.
चांगल्या गोष्टींचं व्यसन धरून ठेवावं आणि वाईट गोष्टीचं व्यसन वेळेतच सोडून द्यावं.
समजलं तर ठीकच आहे, नाहीतर, हे ही सोडून द्यावं.!
कारण काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्याच धरून ठेवल्या कि पसारा होतो. गोष्टींचाही आणि आयुष्याचाही.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा