आज अनंत चतुर्दशीला ठिकठिकाणचे श्रीगणेश विसर्जित होताहेत. ‘विसर्जन’ म्हणजे काय, हे काय सांगणारा श्री स्वानंद पुंडशास्त्रीं यांचा अप्रतिम लेख…
सर्जन आणि विसर्जन
हा प्रकृतीचा स्वभाव आहे!
दूरचित्रवाणीवर गणेशविसर्जनाचा सोहळा सुरू होता. चिरंजीवांचा त्यांच्या बालबुद्धीनुसार स्वाभाविक असा प्रश्न होता
“इतके दिवस पूजा केलेल्या बाप्पाला पाण्यात का बुडवायचं?”
पुढचा प्रश्न अधिक सखोल-
“बाप्पा मरणार नाही का?”
प्रश्न हसू येण्यासारखाच होता. आता त्याला, ‘परमेश्वरी सत्तेचं अमरत्व’ वगैरे सांगून उपयोग नव्हता. त्याच्या पातळीवरून सुरू केलं…
आमची प्रश्नोत्तर मालिका सुरू झाली…
“बाप्पाची मूर्ती कशाची बनवली?”
तो म्हणाला, “मातीची.”
“आपण माती कुठून घेतली?”
“शेतातून.”
“आता पाण्यात टाकल्यावर मूर्तीचं काय होतं?”
“ती विरघळते.”
“विरघळल्यावर माती कुठे जाते?”
“पाण्यात.”
“पाण्यासोबत कुठं जाते?”
“सगळीकडे.”
“आता आपला बाप्पा दिसतो का?”
“नाही.”
“पण, त्याची झालेली माती सगळीकडे दिसते की नाही?”
“हो.”
“या मातीत बाप्पाची माती आहे की नाही?”
“हो.”
“म्हणजे ही मातीच आता बाप्पाची माती आहे की नाही?”
“हो.”
“म्हणजे ही मातीच आता बाप्पा आहे की नाही?”
“हो.”
“कालपर्यंत बाप्पा एका मातीच्या गोळ्यातच दिसत होता… बरोबर?”
“हो, बरोबर!”
“आता बाप्पा कसा झाला?”
त्यानं त्याच्या बालसुलभ आनंदासह घोषणा केली-
“बाप्पा मोठ्ठा झाला!”
तो उड्या मारत निघून गेला.
—🌼—
बालशैलीचं एक जाऊ द्या… पण, विसर्जनाचं विज्ञान हेच आहे! मूर्ती कितीही सुंदर असली, तरी ती ‘माध्यम’ आहे. माध्यमात अडकणं, ही मर्यादाच आहे!
मूर्ती ही माध्यम आहे, अमूर्ताच्या उपासनेचं! अमूर्ताला थेट गवसणी घालता येत नाही म्हणून ‘आलंबन’ रूपात मूर्ती घडवली.
लहान बाळाला थेट चंद्र दिसत नाही. मग आई म्हणते…
‘तो पाहा फांदीच्या मागे!’
फांदी ‘माध्यम’ आहे लक्ष केंद्रित करण्याचं. तशीच मूर्ती हे ‘माध्यम’ आहे मनाला केंद्रित करण्याचं!
अनेक स्थानी विखुरलेल्या ‘त्याला’ मूर्तीच्या ठायी केंद्रित करायचं आणि मग मूर्तीच्या द्वारे अमूर्ताकडे न्यायचं’, हेच मूर्तिपूजनाचं रहस्य आहे.
मूर्ती मातीचीच असते. या व्रताला ‘पार्थिव गणेशव्रत’ म्हणतात. पृथ्वीची, मातीची ती ‘पार्थिव’. तिचं विसर्जन जलातच व्हायला हवं.
(प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वा त्यानिमित्ताने होणार्या पर्यावरणाच्या र्हासाच्या ओरड्याशी धर्मशास्त्राचा कवडीचाही संबंध नाही. धर्मशास्त्र प्लास्टरची मूर्ती सांगतच नाही. सांगूही शकत नाही. कारण, धर्मशास्त्र लिहिलं तेव्हा हा पदार्थच नव्हता! मूर्तिकारांच्या सोयीकरिता आलेल्या या विषयाकरिता धर्मशास्त्राला वेठीस धरणं निरर्थक आहे. ३६४ दिवस काहीही न करता एक दिवसच पर्यावरणाचा उमाळा येणंही हास्यास्पद आहे आणि त्याकरिता धर्मशास्त्राला गृहीत धरणं तर सर्वस्वी गैर आहे! भारतीय संस्कृतीही निसर्गपूजक संस्कृती आहे. ती पर्यावरणाला जोपासते. नाशाचा तर प्रश्नच येत नाही.)
मातीची मूर्ती जलात विसर्जित. कारण, जलतत्त्व हे मृत्तिकातत्त्वापेक्षा अधिक व्यापक आहे.
‘भूमी-आपो-अनलो-अनिलो-नभ:’ ही अथर्वशीर्षात वर्णिलेली चढती विकासयात्रा आहे.
'मूर्तिविसर्जन'.
‘भूमी’पासून आरंभ करत ‘भूमा’ अर्थात असीम, अनंतापर्यंत जाणं आहे, 'विसर्जन'!
विसर्जन मूर्तीचं आहे, मूर्ततेचं आहे. मूर्ताचा त्याग करत अमूर्तात परमात्म तत्त्वाचं दर्शन घेणं आहे, 'विसर्जन'!
सान्त मूर्तीला विरघळवून अनंताशी नाळ जोडणं आहे, 'विसर्जन'!
साकाराला द्रवीभूत करत निराकाराला गवसणी घालण्याची मनीषा आहे, 'विसर्जन'!
संतश्रेष्ठ नामदेवरायांना स्वत: पंढरीनाथांनीच तीर्थयात्रा करायला लावत, ‘अणुरेणूत मीच आहे’, हा जो संदेश दिला, तो आचरणात आणण्याची पद्धती आहे, 'विसर्जन'!
सर्जनातून पार्थिवत्त्वापर्यंत आलेल्या निर्मितीला उलट्या दिशेनं फिरवत पुनरपी मूळ आत्मरूपात सुस्थिर होण्याच्या साधकाच्या अन्तर्यात्रेचे प्रतीक आहे, 'विसर्जन'!
कणाकणात ईश्वरी सत्तेच्या विश्वरूपदर्शनाचा मार्ग आहे, 'विसर्जन'!
🌷 जय गजानन! 🌷
~ श्री स्वानंद पुंडशास्त्री

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा